Panjab Dakh News : आज पासून पुढील तीन दिवस म्हणजे 17 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज भारतीय हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला होता. आज राज्यातील तब्बल दहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
भारतीय हवामान खात्याबरोबरच पंजाब रावांनी देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र शेतकऱ्यांनी चिंता करू नये कारण की लवकरच महाराष्ट्रात थंडीची लाट येणार आहे.
महाराष्ट्रात 18 तारखेपासून कडाक्याची थंडी पडेल फक्त 15 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती आहे असा अंदाज पंजाबरावांच्या माध्यमातून समोर आला आहे.
राज्यात कुठे कुठे पडणार पाऊस
आज पासून पुढील तीन दिवस म्हणजे 17 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूरच्या जतकडे, कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यातील पणजी या भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की काल कोल्हापूरमध्ये जोरदार पाऊस झाला होता. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली या ठिकाणी पावसाळी वातावरण असून त्या ठिकाणी काही भागांमध्ये जोरदार पाऊस होत आहे.
मात्र या भागांमध्ये आणखी दोन दिवस म्हणजे 17 नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडेल आणि त्यानंतर हवामान कोरडे होणार आहे. 18 तारखेपासून राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
रब्बी हंगामातील पिकांसाठी थंडी आवश्यक असते अशा परिस्थितीत जर जोरदार थंडीला सुरुवात झाली तर याचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. रब्बी हंगामातील वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या पिकांना याचा फायदा होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडेल अशी आशा आता व्यक्त होत आहे.
मात्र तत्पूर्वी राज्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असेही पंजाबरावांनी आपल्या हवामान अंदाजात यावेळी म्हटले आहे.
पंजाब रावांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी 18 तारखेपासून हवामान कोरडे होईल आणि कडाक्याच्या थंडीला सुरुवात होईल अशी माहिती दिली आहे. खरंतर यावर्षी महाराष्ट्रात थंडीला फारच उशिराने सुरुवात झाली. दिवाळीच्या काळातही यंदा महाराष्ट्रात म्हणावी तशी थंडी पडली नाही.
दिवाळीच्या काळात राज्यातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी लागली होती. मानसूनोत्तर पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसानही झाले. दरम्यान आता राज्यात 17 नोव्हेंबर पर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण अठरा तारखेपासून हवामान कोरडे होणार आहे.