Pune Bangalore Expressway : मुंबई आणि पुणे म्हणजेच देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी या दोन शहरातून बेंगलोर पर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता, सद्यस्थितीत मुंबई बेंगलोर या महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना अधिक वेळ खर्च करावा लागतो.
अशा परिस्थितीत आता प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी केंद्र सरकार एक नवीन महामार्ग विकसित करण्याच्या तयारीत आहेत. केंद्र सरकार लवकरच पुणे बेंगलोर महामार्ग तयार करणार असल्याचे मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून पुणे बंगळुरू महामार्ग तयार करण्यासाठी 50,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा सदर होऊ घातलेला महामार्ग एकूण बारा जिल्ह्यातून जाणार असल्याचे प्रस्तावित आहे. या बारा जिल्ह्यांपैकी तीन जिल्हे महाराष्ट्रातील आहेत.
मित्रांनो पुणे बेंगलोर हा महामार्ग तयार झाल्यानंतर मुंबई ते बंगळुरू हे अंतर केवळ पाच तासात पार करता येणे प्रवाशांना शक्य होणार आहे. यामुळे निश्चितच महाराष्ट्रातील दळणवळण अजूनच प्रभावी होणार असून यामुळे उद्योग जगताला एक नवीन उभारी मिळणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पुणे ते बेंगलोर हे अंतर 842 किमी अंतर आहे. एवढे अंतर पार करण्यासाठी सध्या 14 ते 15 तास प्रवास करावा लागतो.
मात्र आता नव्याने विकसित केल्या जाणाऱ्या पुणे बेंगलोर या महामार्गामुळे हे अंतर जवळपास 95 किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे साहजिकच प्रवाशांचा वेळ देखील वाचणार आहे. शिवाय पुणे बेंगलोर हा प्रवास अधिक गतिमान होण्यास मदत मिळणार आहे. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या मदतीने तयार केल्या जाणाऱ्या पुणे बेंगलोर महामार्ग हा पुणे रिंगरोडवरील कांजळे ते बेंगळुरूमधील सॅटेलाइट रिंग रोडवरील मुथागडहल्लीपर्यंत बांधण्यात येणार आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की हा सदर होऊ घातलेला महामार्ग एकूण 12 जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. कर्नाटकातील एकूण नऊ आणि महाराष्ट्रातील एकूण तीन अशा एकूण बारा जिल्ह्यातून हा सदर होऊ घातलेला महामार्ग जाणार आहे.
बंगळुरू ग्रामीण, बेलागावी, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर (बल्लारी), दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमाकुरू, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. मित्रांनो मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे या महामार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या महामार्गाच्या प्रकल्पाला मंजुरी देखील देण्यात आले आहे.
या महामार्गाची अंतिम ब्लू प्रिंट 2022 मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर केले जाणार आहे. अर्थातच या महामार्गाच्या निर्मितीनंतर प्रवाशांना खूपच सोयीचे होणार आहे. यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला अजूनच गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.