पुण्यातील ‘या’ भागात विकसित होणार डबल डेकर फ्लायओव्हर ! पुढल्या महिन्यात लोकार्पण होणार

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे ते म्हणजे पुणे शहराला लवकरच एक नवीन फ्लायओव्हर मिळणार आहे. हा नवीन उड्डाणपूल शहरातील मध्यवर्ती भागात विकसित होणार असून या नव्या उड्डाणपुलामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होईल अशी आशा आहे.

Published on -

Pune News : पुण्यातील नागरिकांसाठी एक अगदीच महत्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर, गेल्या काही वर्षात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढलीये. दरम्यान, शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे पुण्यात एक नवा फ्लायओव्हर तयार केला जाणार आहे. दरम्यान आज आपण याच प्रकल्पाच्या बाबत मोठी माहिती जाणून घेणार आहोत.

कसा आहे नवा प्रकल्प? 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे युनिव्हर्सिटी चौकात एक नवीन फ्लायओव्हर विकसित केला जात आहे. दरम्यान, विद्यापीठ चौकात उभारल्या जाणाऱ्या याच फ्लायओव्हरच्या बाबत नवीन अपडेट समोर आली आहे.

हा डबल डेकर फ्लायओव्हर पुढील महिन्यात म्हणजेच जून महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार अशी खात्रीलायक बातमी समोर आली आहे. हा डबल डेकर उड्डाणपूल पीएमआरडीए म्हणजेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या वतीने उभारण्यात येत आहे.

या दुमजली उड्डाणंपूल प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या पुलाच्या गर्डरची लांबी ही सुमारे 55 मीटर इतकी आहे. तसेच, याची रुंदी 18 ते 20 मीटर आहे. या पुलाच्या एकूण 32 आधारस्तंभांचे काम पूर्ण झाले आहे आणि सध्या स्टील गर्डर बसवण्याचे काम सुरु आहे जे की येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार अशी आशा आहे.

यामुळे हा प्रकल्प जून महिन्यात पूर्णपणे कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. जून महिन्यात हा उड्डाणपूल सुरू होऊ शकतो. महत्त्वाची बाब अशी की, यापैकी औंध आणि शिवाजीनगरकडे जाणारे रॅम्प 20 मे 2025 पासून सुरू करण्यात येणार आहेत, तर औंधकडील रॅम्पचे उर्वरित काम जूनमध्ये पूर्ण होणार आहे. म्हणजेच हा संपूर्ण उड्डाणपूल पुढील महिन्यात सुरु होणार आहे.

नव्या उड्डाणपुलामुळे काय लाभ मिळणार 

पुणे शहरातील विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी पाहता हा नवा उड्डाणपूल विकसित करण्याचा निर्णय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून घेण्यात आला असून या प्रकल्पामुळे गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर, औंध, बाणेर, पाषाण आणि हिंजवडी या भागातील वाहतूक सुरळीत होईल अशी आशा जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

या पुलामुळे सदर भागातील वाहतूक सुरळीत होणार असून, यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर या नव्या उड्डाणपुलामुळे इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे आणि वायू प्रदूषण देखील नियंत्रणात राहिल अशी आशा आहे.

शहराच्या वाहतूक व्यवस्थेला गती देणारा हा प्रकल्प पुणेकरांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार असून पुढील महिन्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी याचे लोकार्पण होणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News