रेशन कार्डधारकांसाठी कामाची बातमी ! आता राज्यात ई-रेशन कार्ड सुरु होणार; असे होतील ‘या’ कार्डचे फायदे

Published on -

Ration Card News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. याच्या मदतीने गरिबांना स्वस्तात धान्य उपलब्ध करून दिले जाते. दरम्यान आता रेशन कार्ड मध्ये मोठा बदल होणार आहे. लवकरच रेशन कार्डचे देखील डिजिटल स्वरूप महाराष्ट्रात पहावयास मिळणार आहे. यासाठी शासन, प्रशासनदरबारी जोरात तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

या ई-रेशनकार्डची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या संबंधित असलेल्या सर्व नोंदी कार्डधारकांना घरबसल्या करता येणे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की गरीब कुटुंबांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार स्वस्तात धान्य दिले जाते. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना हे धान्य दिले जाते. शिवाय राज्यातील काही जिल्ह्यात अंत्योदय शेतकरी म्हणूनही धान्य वितरित केले जात आहे.

ही मात्र राज्याची योजना आहे. सध्या स्थितीला ईपॉस मशीन चा उपयोग करून लाभार्थी कुटुंबाला धान्य वितरण सुरु आहे. दरम्यान आता सध्या अस्तित्वात असलेले रेशन कार्ड हद्दबाहेर होऊन नवीन ई-रेशन कार्ड येणार आहे. रेशन कार्ड नवीन असलं तरीदेखील या योजनेअंतर्गत मिळणारे रेशन सध्या ज्या पद्धतीने वितरित होत आहे त्याच पद्धतीने वितरित होणार असल्याचे समजत आहे. मात्र या नवीन ई रेशन कार्ड मुळे नागरिकांना काही फायदे मिळणार आहेत. जसे की आता नागरिकांना हे नवीन रेशन कार्ड कुठेही आणि हव्या त्या वेळी डाऊनलोड करता येणे शक्य होणार आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे रेशन कार्ड हे केवळ धान्य मिवण्यासाठी वापरलं जातं असं नाही तर याचा उपयोग अनेक शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये देखील होतो. हे एक प्रमुख सरकारी कागदपत्र आहे. याचा उपयोग अगदी शाळेत ऍडमिशन घेण्यापासून ते लोकहिताच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यापर्यंत सर्वच ठिकाणी होतो. म्हणजे हे नवीन ई-रेशन कार्ड नागरिकांना कुठेही डाऊनलोड करता येणार असल्याने शासकीय कामांमध्ये नागरिकांचा मोठा फायदा होईल.

याशिवाय या ई-रेशन कार्ड मुळे ज्या काही नोंदी लाभार्थ्याला करावयाच्या असतात त्यां देखील नोंदी ऑनलाइन करता येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यासाठी मात्र काही शुल्क संबंधित लाभार्थी व्यक्तीला भरावी लागणार आहे जे की ऑनलाईनच भरले जाईल. सध्या स्थितीला या ईरेशन कार्ड बाबत विस्तृत माहिती उपलब्ध झालेली नाही मात्र यावर काम सुरू असून येत्या काही दिवसात याबाबत सविस्तर माहिती समोर येणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News