Eapro चा 2kW चा सोलर सिस्टम घ्या आणि घरातील विजेच्या गरजा पूर्ण करा, विज बिल येईल शून्य, वाचा या सोलर पॅनलची किंमत

Ajay Patil
Published:
solar panel

सध्या मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्यात येत असून केंद्र सरकारच्या काही योजनांच्या माध्यमातून सौर पॅनल किंवा सोलर सिस्टम बसवण्यासाठी अनुदान देखील देण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये अनेक आघाडीच्या कंपन्या सौर ऊर्जेसाठी आवश्यक असणारे पॅनल तसेच उपकरणे बनवत आहेत.

यामध्ये जर बघितले तर अनेक कंपन्यांची नावे आपल्याला घेता येतील व यामध्ये Eapro ही कंपनी देखील आघाडीची कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून उच्च दर्जाचे सौर पॅनल तसेच इन्व्हर्टर आणि बॅटरी बनवले जातात. तसेच या कंपनीची 2kW ची सोलर सिस्टम पाहिली तर ती घरगुती वापराकरिता खूप योग्य असा पर्याय आहे. या सोलर सिस्टिम च्या मदतीने दररोज सुमारे दहा युनिट विजेची निर्मिती करता येऊ शकते. या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरातील विजेची गरज भागवू शकता व विज बिलापासून मुक्तता मिळवू शकतात.

 कशी आहे Eapro 2kW ची सौर यंत्रणा?

या कंपनीची सर्व उपकरणे त्यांच्या विश्वासार्हतेसाठी आणि उच्च कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात. या उपकरणाच्या माध्यमातून आपल्याला कार्यक्षम अशी सौर यंत्रणा उभी करता येते आणि विजेच्या गरजा सहजरित्या पूर्ण करता येतात. सोलर पॅनल सिस्टम ही आजच्या काळाची मुख्य गरज असून सौर ऊर्जेचा वापर आपले ऊर्जेच्या बाबतीतले भविष्य सुरक्षित करू शकतो.

Eapro मुख्यत्वे करून पॉली क्रिस्टलाईन आणि मोनोपर्क प्रकारच्या सोलर पॅनलचे उत्पादन करते. यापैकी पॉली क्रिस्ट लाईन प्रकारातील सोलर पॅनल चा वापर सोलर पॅनलमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे या प्रकारच्या सौर पॅनलची किंमत कमी आहे. मोनो पार्क सोलर पॅनलची किंमत जास्त असली तरी हे आधुनिक प्रकारचे सोलर पॅनल आहेत व त्यांचा वापर करून कमी प्रकाशात देखील विजेची निर्मिती करता येऊ शकते व ते जास्त कार्यक्षमतेने जास्त वीज तयार करू शकतात.

Eapro 2kW सर्व प्रणालीमध्ये पॉली क्रिस्टलाईन सौर पॅनलचे स्वरूप

या सौर यंत्रणेमध्ये प्रत्येकी 250W चे आठ पॅनल बसवलेले आहेत व या प्रकारच्या 2kW पॉलीक्रिस्टलाइन सोलर पॅनलची किंमत 60000 रुपये आहे. त्याचप्रमाणे..

Eapro 2kW मोनोक्रिस्टलाईन पर्क सौर पॅनल

यामध्ये प्रत्येकी 335W चे सहा मोनो पार्क पॅनल सौर यंत्रणेमध्ये इन्स्टॉल केलेले असतात व या सोलर सिस्टम मध्ये बसवलेल्या सोलर पॅनलचे एकूण किंमत 70 हजार रुपये आहे.

Eapro 2kW सौर प्रणालीमध्ये सौर इन्वर्टर कसे असते?

या कंपनीच्या सोलर सिस्टममध्ये सौर पॅनलद्वारे डीसीच्या स्वरूपामध्ये विजेची निर्मिती केली जाते. सोलर इन्वर्टर डीसीचे एसीमध्ये रूपांतर करण्याचे महत्त्वपूर्ण काम करते. सध्या प्रामुख्याने पीडब्ल्यूएम आणि एमपीपीटी तंत्रज्ञानाचे दोन सोलर इन्वर्टर बाजारात आपल्याला पाहायला मिळतात व त्यापैकी पीडब्ल्यूएम हे एक पारंपारिक तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचे इन्व्हर्टर पॅनल मधून मिळालेल्या विजेच्या होल्टेजवर नियंत्रण ठेवतात तर एमपीपीटी तंत्रज्ञानाच्या इन्वर्टरद्वारे विजेचा होल्टेज आणि करंट दोन्ही नियंत्रित करता येते. Eapro च्या सोलर सिस्टममध्ये खालील इन्व्हर्टर बसवता येतात.

1-Eapro 2750VA PWM सोलर इन्व्हर्टर हा इन्वर्टर 2500 VA चा लोड सहजपणे चालवू शकतो व याला 24 वोल्ट बॅटरी सपोर्ट आहे. या इन्व्हर्टरला दोन बॅटरी जोडणे शक्य आहे. या सोलर इन्वर्टरची किंमत वीस हजार रुपये आहे.

2-Eapro 3kVA/24V MPPT सोलर इन्वर्टर हे आधुनिक एमपीपीटी तंत्रज्ञानाचे इन्वर्टर असून या माध्यमातून 2400 वॉट्सचे लोड चालवणे शक्य आहे. या इन्व्हर्टरला दोन बॅटरी जोडल्या जाणे शक्य आहे व या इन्वर्टरची किंमत 24 हजार रुपये आहे.

Eapro 2kW सौर प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सौर बॅटऱ्या

तुमच्या विजेच्या गरजेनुसार पावर बॅकअप साठी सोलर सिस्टममध्ये सौर बॅटरी जोडल्या जाऊ शकतात. जर तुम्हाला कमी बॅटरी बॅकअपची आवश्यकता असेल तर तुम्ही 100 Ah सोलर बॅटरी जोडू शकतात व एका बॅटरीची किंमत 9000 रुपये आहे. तुम्हाला जर जास्तीच्या पावर बॅकअपची गरज असेल तर तुम्ही तुमच्या सोलर सिस्टममध्ये 150 Ah बॅटरी स्थापित करू शकतात व या दोन सोलर बॅटरीची किंमत 26 हजार रुपये आहे.

Eapro 2kW सौर यंत्रणेची एकूण किंमत

1-Eapro 2kW पॉली क्रिस्टलाइन प्रणाली त्यामध्ये सौर पॅनल 60 हजार रुपये, सोलर इन्वर्टर( पीडब्ल्यूएम) वीस हजार रुपये, सोलर बॅटरी(100Ah) अठरा हजार रुपये आणि अतिरिक्त खर्च दहा हजार असे मिळून एक लाख आठ हजार रुपये याला खर्च येतो.

2- मोनोक्रिस्टलाईन पर्क सौर प्रणाली सौर पॅनल 70 हजार रुपये, सोलर इन्वर्टर( एमपीपीटी) 24 हजार रुपये, सौर बॅटरी(150Ah) 20000 रुपये आणि इतर खर्च दहा हजार असे मिळून एक लाख तीस हजार रुपये खर्च येतो.

 किती मिळू शकते अनुदान?

भारत सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान देखील तुम्हाला मिळू शकते. साधारणपणे प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून घरगुती वापरकर्त्यांना सौर पॅनल बसवण्यावर अनुदान मिळते व यामध्ये दोन किलो वॅट सोलर सिस्टम ऑन ग्रिड बसवण्यावर 60 हजार रुपयांची सबसिडी मिळू शकते. म्हणजेच तुम्ही अवघ्या साठ हजार रुपयांमध्ये सोलर सिस्टम बसू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe