पगार खात्यामध्ये येते आणि लगेच काही दिवसात संपते? कुठे चुकते बर आपले? पैसे वाचवण्यासाठी नेमके काय करावे लागेल?

आर्थिक नियोजना संबंधी काही गोष्टींवर खूप लक्ष केंद्रित करावे लागेल व त्यानुसारच तुम्हाला सगळे नियोजन करावे लागेल. तुमच्या पगारांमधून तुम्ही पैसे वाचवू शकतात व बचत करून चांगली गुंतवणूक करू शकतात.

Published on -

Money Saving Tips:- बऱ्याच जणांना अनुभव आलेला असेल की आपण चातकासारखी पगार मिळण्याच्या दिवसाची वाट पाहत असतो व पगार त्या दिवशी खात्यात जमा होते देखील.

परंतु पुढच्या पगाराची तारीख यायचे तर लांबच राहते परंतु अर्धा महिना संपत नाही तोपर्यंतच खात्यातील पगाराचे संपूर्ण पैसे संपतात आणि आपल्याला अक्षरशः कधी अत्यावश्यक गोष्टींसाठी पैसे उरत नाहीत व गरज पडली तर दुसऱ्याकडे हात पसरावे लागतात.

त्यामुळे नेमके ही समस्या कशामुळे येते? हा देखील एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कारण घराच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये इतका पैसा खर्च होऊन जातो की पैशांची बचत हा तर दूरचा विषय राहतो. परंतु तुम्हाला त्याही परिस्थितीमध्ये पैशांची बचत करणे आणि बचतीची सवय लावून घेणे खूप फायद्याचे ठरेल.

तुम्हाला आर्थिक नियोजना संबंधी काही गोष्टींवर खूप लक्ष केंद्रित करावे लागेल व त्यानुसारच तुम्हाला सगळे नियोजन करावे लागेल. तुमच्या पगारांमधून तुम्ही पैसे वाचवू शकतात व बचत करून चांगली गुंतवणूक करू शकतात. त्यासाठी काही गोष्टी करणे खूप गरजेचे आहे व त्यासंबंधीचीच माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत.

पगार वाचावा म्हणून नेमके काय कराल?
तुमचा पगार महिन्याच्या शेवटी किंवा महिन्याच्या सुरुवातीला जरी जमा होत असेल तेव्हा तो जमा होता क्षणी आपण आवश्यक खर्च करण्यासाठी पैसा खर्च करायला लागतो.

परंतु जेव्हा पगार जमा होईल तेव्हा तुमचा खर्च कितीही असला तरी त्यातील 20% रक्कम तुम्ही दुसऱ्या बँक खात्यात ट्रान्सफर करून ठेवावी. तुमच्या पगारातून जर बचतीसाठी अशाप्रकारे तुम्ही काही भाग बाजूला काढून ठेवला आणि उरलेल्या रकमेतून तुम्हाला उर्वरित खर्चाचे नियोजन करणे देखील सोपे जाते व तुमचे 20 टक्के रक्कम ही बचत म्हणून राहते.

समजा तुम्हाला जर 40 हजार रुपये पगार आहे व यातील 20% म्हणजेच 8000 रुपये तुम्ही दुसऱ्या अकाउंट मध्ये बाजूला ठेवणे गरजेचे आहे. कारण जर आपण आर्थिक नियम बघितला तर त्यानुसार तुमचा पगार कितीही असेल तरी तुम्ही 20% गुंतवणूक त्या माध्यमातून करणे गरजेचे आहे.

तसेच तुम्हाला जर पगारातून पैसे उरत नाहीत असे वाटत असेल तर नको तो खर्च टाळून खर्चात कपात करणे गरजेचे आहे व काही झाले तरी गुंतवणुकीच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड करू नये. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला काही अडचणी येतील.परंतु हळूहळू सवय पडेल व या पद्धतीने पैसा वाचवणे तुम्हाला सोपे जाईल.

पैशांची बचत करा आणि गुंतवणूक करण्यावर भर द्या
तसेच तुम्ही जी काही वीस टक्के रक्कम दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेली असेल ती त्याच आठवड्यात चांगल्या ठिकाणी गुंतवावी. दुसऱ्या अकाउंट असावे असे काही नाही. पगार ज्या खात्यात जमा होते त्या खात्यामधूनच तुम्ही पहिल्याच आठवड्यात जर पैसे गुंतवले तरी चालते. गुंतवणुकीसाठी मात्र पहिल्याच आठवडा निवडावा.

परंतु तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही महिन्याच्या शेवटच्या दिवसात गुंतवणूक कराल तर जवळपास हे अशक्य होते. कारण तोपर्यंत काही कारणास्तव पैसा खर्च होऊन जातो व गुंतवणुकीची रक्कम आपल्याला वाचवायचे असते ती देखील राहत नाही.

त्यामुळे तुम्ही त्याच दिवशी किंवा पगार झाल्याच्या पहिल्या आठवड्यातच गुंतवणूक करणे गरजेचे आहे त्यानंतरच तुमच्या आवश्यक गरजांवर खर्च करावा. गुंतवणुकीसाठी तुम्ही आरडी तसेच पीपीएफ,एसआयपी सारख्या गुंतवणूक पर्यायांची निवड करू शकतात.

तसेच तुम्ही या गोष्टी टाळाव्यात
तुमच्या खर्चावर नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला जर दारू किंवा इतर व्यसन असेल तर ते सोडावेच. महिन्यातून जर दोनदा बाहेर जेवायला जात असाल तर दोनदा ऐवजी एकदा जावे.

क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याचा वापर कमी करावा व मित्रांसोबत पार्ट्यांची सवय असेल तर ते बंदच करावे. बऱ्याचदा एखादी ऑफर्स राहते.तेव्हा आपण अनावश्यक पद्धतीने खरेदी करत सुटतो. अशा पद्धतीची ऑफर्स मध्ये जर अनावश्यक खरेदी करण्याची तुम्हाला सवय असेल तर त्यावर नियंत्रण ठेवावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe