सिंधू बंधूंनी इस्रायल टेक्निकचा वापर करत घरात पिकवले केशर! विक्री करून मिळवले 10 लाख, जाणून घ्या केशर लागवडीचे नियोजन

केशरच्या बाबतीत जर आपण हरियाणातील नवीन सिंधू व प्रवीण सिंधू या दोन भावांची यशोगाथा बघितली तर त्यांनी घरामध्ये केशर पिकवण्याचा प्रयोग यशस्वी केला असून याकरिता त्यांनी इराण आणि इस्रायलचे अत्याधुनिक असे एरोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे व यामध्ये ते लाखोत उत्पन्न मिळवत आहेत.

Published on -

Saffron Farming Success Story:- जीवनातील कुठलेही क्षेत्र बघितले तर त्यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक असे तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील कितीही अवघड गोष्टी असल्या तर त्या सोप्या झाल्या आहेत. याला आता शेती क्षेत्र किंवा शेतीशी संबंधित असलेली क्षेत्र देखील अपवाद नाहीत.

शेतीमध्ये देखील आता पीक लागवडीपासून तर पिकांचे नियोजन ते काढणीपर्यंत अनेक तंत्रज्ञान आल्याने शेतकरी अगदी कमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस उत्पादन मिळवून लाखोत नफा मिळवताना दिसून येत आहेत. तसेच भारताच्या कुठल्याही भागांमध्ये येणारी पीक आता त्या भागाची मक्तेदारी राहिली नसून देशातील कुठल्याही राज्यांमध्ये कुठलेही पीक घेता येणे शक्य झाले आहे.

जसे आपल्याला सफरचंदाचे उदाहरण घेता येईल. सफरचंद प्रामुख्याने हिमाचल प्रदेशसारख्या थंड हवामाना असणाऱ्या राज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादित होते. परंतु याचं सफरचंदाचे आता महाराष्ट्रातील शेतकरी देखील उत्पादन घेऊ लागले असून अनेक ठिकाणी सफरचंदाच्या लागवड यशस्वी केलेले आहेत.

हीच बाब केशरच्या बाबतीत देखील आपल्याला दिसून येते. केशर देखील हिमाचल किंवा जम्मू-काश्मीर सारख्या थंड प्रदेशात उत्पादित होणारे पीक आहे. परंतु आता देशातील अनेक राज्यातील शेतकरी घरामध्ये टेंपरेचर मेंटेन करून केशरची लागवड यशस्वी करत आहेत.

याच केशरच्या बाबतीत जर आपण हरियाणातील नवीन सिंधू व प्रवीण सिंधू या दोन भावांची यशोगाथा बघितली तर त्यांनी घरामध्ये केशर पिकवण्याचा प्रयोग यशस्वी केला असून याकरिता त्यांनी इराण आणि इस्रायलचे अत्याधुनिक असे एरोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे व यामध्ये ते लाखोत उत्पन्न मिळवत आहेत.

सिंधू बंधूंनी कशी केली केशर लागवड यशस्वी?
हरियाणा राज्यातील प्रवीण आणि नवीन सिंधू या दोन भावांनी घरामध्ये इस्रायलचे एरोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घराच्या गच्चीवर काश्मिरी केशर पिकवून लाखो रुपये कमवण्याची किमया साध्य केली आहे.

साधारणपणे 2018 मध्ये या दोन भावांनी घराच्या गच्चीवर पंधरा बाय पंधरा फूट असलेल्या खोलीचे प्रयोगशाळेमध्ये रूपांतर केले व त्या ठिकाणी एरोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केशर लागवड केली व ते केशर वाढवायला सुरुवात केली.

सुरुवातीला यामध्ये त्यांना सहा लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली. दोघा भावांपैकी जर आपण प्रवीण सिंधू यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी एमटेक केलेले आहे व या दरम्यानच त्यांना केशर लागवडीची कल्पना सुचली व त्यांनी ही कल्पना ब्रिटनमध्ये काम करत असलेल्या त्यांच्या भावाला म्हणजेच नवीनला सांगितली. त्यानंतर दोघे भाऊ एकत्र आले व त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली.

सुरुवातीला त्यांनी थायलंडला जाऊन कार्डीसेप्स मशरूम वाढवण्याचे ट्रेनिंग घेतले व त्यानंतर जम्मू-काश्मीरला जाऊन केशर लागवडीचे प्रशिक्षण देखील घेतले. सुरुवातीला त्यांना लागवड व व्यवस्थापनामध्ये खूप अडचणी आल्या.

केशर लागवडीकरिता त्यांनी काश्मीर मधून शंभर किलो केशरचे बल्ब मागवले व पहिल्याच प्रयत्नांमध्ये ते सपशेल अपयशी ठरले. नंतर हार न मानता त्यांनी परत 2019 मध्ये 100 किलो बल्ब खरेदी केले व यावेळी मात्र ते केशर वाढवण्यामध्ये यशस्वी ठरले.

दुसऱ्या प्रयत्नात जेव्हा त्यांना पहिले केशर चे उत्पादन मिळाले ते 500 g इतके मिळाले व त्यापासून त्यांना अडीच लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले व त्यानंतर पुढच्या वर्षी दोन किलो केशर चे उत्पादन त्यांनी घेतले व ते त्यांनी दहा लाख रुपयांना विकले. आज हे दोघे बंधू अमरत्वा ब्रँडखाली केशर विक्री करत असून त्याची निर्यात देखील करत आहेत व केशर शेतीतून आज लाखो रुपयांचे उत्पन्न देखील मिळवत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe