Skoda Kaylaq SUV:- भारतीय कार बाजारपेठ जर बघितली तर यामध्ये प्रामुख्याने महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्सचे वर्चस्व मोठ्या प्रमाणावर दिसून येते. या दोन्ही कंपन्यांचे अनेक कार मॉडेल्स भारतीय ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय असल्याचे आपल्याला दिसते.
परंतु या दोन्ही कार उत्पादक कंपन्यांच्या खालोखाल टोयोटा, मारुती सुझुकी आणि स्कोडा इंडिया या कंपन्यांची वाहने देखील खूपच लोकप्रिय आहेत. यामध्ये जर स्कोडा इंडियाचा विचार केला तर या कंपनीने भारतीय बाजारपेठेमध्ये आतापर्यंत अनेक वैशिष्ट्येपूर्ण असे कार मॉडेल लॉन्च केलेले आहेत.

याच्याही पुढे जात मात्र आता स्कोडा इंडियाने भारतीय बाजारपेठेत एक धमाका केला असून कंपनीने परवडणाऱ्या किमतीमध्ये नवीन स्कोडा कायलाक लाँच केली असून ही एक बोल्ड आणि मॉडर्न एसयूव्ही असून तिच्या आकर्षक डिझाईन आणि टॉप टायर फीचर्स ग्राहकांना नक्कीच आकर्षित करतील.
या कारचे बुकिंग दोन डिसेंबर पासून सुरू होणार आहे व डिलिव्हरी साधारणपणे 27 जानेवारी 2025 पासून सुरुवात होईल. विशेष म्हणजे या कारला फाइव स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले असून 25 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह ही कार डिझाईन करण्यात आलेली आहे.
कसे आहे स्कोडा कायलाकचे इंजिन?
स्कोडा लाईनअप मधील ही एक अतिशय परवडणारी एसयूव्ही असून फक्त पेट्रोल व्हर्जनमध्ये उपलब्ध असणार आहे. या गाडीला एक लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे आणि मॅन्युअल, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन अशा पर्यायांमध्ये ती सध्या उपलब्ध आहे.
या कारचे इंजिन 114 बीएचपी आणि 178 nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच टर्बो पेट्रोल इंजिन सहा स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड आटोमॅटिक टॉर्क कन्वर्टर ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.
काय आहेत स्कोडा कायलाक मधील महत्वाची वैशिष्ट्ये?
या कारमध्ये दहा इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, आठ इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले तसेच सिंगल पॅनल सनरूफ, एक वायरलेस फोन चार्जर, तसेच फ्रंटच्या दोन्ही सीट तुम्हाला तुमच्या पद्धतीने इलेक्ट्रिकली ऍडजेस्ट करता येतील अशा स्वरूपाचे आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कारमध्ये सहा एअरबॅग, ट्रॅक्शन व स्टॅबिलिटी कंट्रोल,
अँटी लॉक ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्यूशन म्हणजेच ईबीडी, ब्रेक डिस्क वाइपिंग, रोल ओव्हर प्रोटेक्शन, मोटर्स स्लिप रेगुलेशन आणि इलेक्ट्रॉनिक डिफरेन्शिअल लॉक, पॅसेंजर एअरबॅग सह ऍक्टिवेशन,
मल्टी कोलिजन ब्रेकिंग आणि आयसोफिक्स सीट्स यासारखी 25 प्रकारची सुरक्षा विषयीची महत्त्वाची वैशिष्ट्ये यामध्ये देण्यात आलेली आहे.तसेच या कारमध्ये 17 इंच डुएल टोन अलॉय व्हील देण्यात आलेले आहेत. तसेच 446 लिटर बुट स्पेस असून यामध्ये इलेक्ट्रिक सनरूफ देखील दिले आहे.
किती आहे स्कोडा कायलाकची किंमत?
स्कोडा इंडियाने ही कार भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केली असून याची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7 लाख 89 हजार रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे.