Snake Species: नागापेक्षा पंधरा पटीने विषारी असते ‘या’ सापाचे विष! व्यक्तीला चावतो तरी समजत नाही, वाचा माहिती

Published on -

Snake Species:- संपूर्ण जगाचा विचार केला तर सापांच्या सुमारे अडीच हजार जाती आहेत व विशेष म्हणजे या अडीच हजार जातींपैकी 340 जाती भारतामध्ये आढळून येतात. त्यातल्या त्यात या 340 जातींपैकी 69 जाती या विषारी आहेत. हा झाला एकूण जगाचा आणि भारताचा आकडा. परंतु महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये 52 सापांच्या जाती असून त्यातील बारा जाती विषारी आहेत.

साप हे प्रामुख्याने उबदार तापमानामध्ये तसेच गवताळ व सुपीक प्रदेशात जास्त प्रमाणात आढळून येतात. जमिनीवर व पाण्यात देखील त्यांची वास्तव्य असते. जर आपण सापाच्या काही प्रसिद्ध जातींचा विचार केला तर यामध्ये नाग, मन्यार, घोणस, अजगर, तस्कर, कवड्या, गवत्या, धामन तसेच धूळ नागिन, डुरक्या घोणस इत्यादी नावे सांगता येतील.

त्यामध्ये जर बिनविषारी सापांचा विचार केला तर यामध्ये मांजरय्या आणि हरणटोळ यासारख्या सापांचा समावेश होतो. तसे पाहायला गेले तर बिनविषारी साप जास्त प्रमाणात आढळून येतात. एखाद्या वेळेस  हे साप चावल्यानंतर माणसाचा मृत्यू होत नाही. लवकर वैद्यकीय उपचार केल्यामुळे व्यक्ती ताबडतोब बरे होते. परंतु यामध्ये नागापेक्षा पंधरा पट विषारी साप देखील या प्रजातींमध्ये असून त्यातील सगळ्यात प्रसिद्ध आणि सर्वात जास्त विषारी म्हणजे मन्यार जातीचा साप होय.

 मन्यार जातीचा साप असतो नागापेक्षा 15 पट विषारी

मन्यार जातीचा साप हा जास्त करून रात्रीच्या वेळेस बाहेर निघतो. म्हणजेच तो निशाचर आहे. रात्रीच्या वेळेस बऱ्याचदा जमिनीवर झोपलेल्या लोकांच्या अंथरुणामध्ये शिरून चावण्याच्या अनेक घटना आपल्याला घडल्याचे ऐकण्यात येते किंवा माहिती पडतात.

यामध्ये प्रामुख्याने मन्यार जातीचा साप असतो. या जातीच्या सापाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा जेव्हा दंश घेतो तेव्हा तो दंश इतका बारीक असतो की आपल्याला समजत देखील नाही किंवा त्याची किंचित देखील आपल्याला जाणीव होत नाही. या जातीचा साप हा प्रामुख्याने शहरी व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. मुख्यतः पावसाळ्यामध्ये हा जास्त आढळतो. निळसर काळा रंगाचा साप असून त्याच्या अंगावर पांढरे खवले असतात व ही खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी कमी होत जातात.

जर मन्यार जातीच्या सापाच्या लांबीचा विचार केला तर ती दीड मीटर पर्यंत असते. मण्यार जातीचा साप हा घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो कारण तो अन्न आणि थंडाव्याच्या शोधामध्ये असतो व त्यामुळे घरांमध्ये शिरतो. जर मन्यार व्यक्तीला चावला तर त्याचा विपरीत परिणाम हा शरीराच्या न्युरल सिस्टम अर्थात संवेदन प्रणालीवर होतो.

बऱ्याचदा या जातीच्या सापावर जर पाय पडला तर चावण्याची घटना जास्त प्रमाणात घडतात. हा साप चावल्यानंतर आपल्या लक्षात देखील येत नाही की साप चावला की नाही. परंतु जर असा साप चावला तर प्रचंड प्रमाणात तहान लागायला लागते तसेच पोटात दुखायला सुरुवात होते व श्वास घ्यायला देखील त्रास व्हायला लागतो.

काही कालावधीनंतर मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसनप्रणाली देखील बंद पडते व व्यक्तीचा मृत्यू होतो. अशाप्रकारे हा साप खूप धोकादायक व विषारी असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खास करून स्वतःची सुरक्षा करणे खूप गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News