Snake Viral News : साप डोळ्याला दिसला तरी पायाखालची जमीन सरकते. साप हा एक सरपटणारा अन विषारी प्राणी आहे. खरंतर जगभरात सापाच्या शेकडो प्रजाती आढळतात. आपल्या देशातही सापाच्या असंख्य प्रजाती आहेत. मात्र आपल्या देशात आढळणाऱ्या बहुतांशी सापांच्या जाती बिनविषारी वर्गातील आहेत.
तरीही आपल्या देशात दरवर्षी हजारो लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार देशात दरवर्षी सर्पदंशामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 90 हजाराच्या आसपास आहे. आपल्या देशात फक्त बोटावर मोजण्या इतक्यात जाती विषारी आहेत तरी सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या फार अधिक आहे.

यामुळे साप दिसला की भीती वाटाणे स्वाभाविकच आहे. मात्र सापाची भीती वाटणे स्वाभाविक असले तरी देखील सापाला मारणे फारच चुकीचे आहे. साप दिसला की आपण त्यापासून लांब राहिले पाहिजे आणि सापांचे रक्षण करायला हवे.
कारण असे की साप हे पर्यावरणासाठी फारच महत्त्वाचे आहेत. तसेच साप हे आपल्या घरात घुसणार नाहीत यासाठी आपण काही उपाययोजना करायला हव्यात. असं म्हणतात की साप काही झाडांकडे आकर्षित होतात. दरम्यान आज आपण अशाच एका झाडाची माहिती पाहणार आहोत.
या झाडाला म्हणतात सापांचे घर
असं म्हणतात की चंदन हे सापांचे दुसरे घर आहे. चंदनामध्ये असणाऱ्या विशिष्ट गुणधर्मामुळे सापांना चंदनाच्या झाडावर आश्रय घ्यायला विशेष आवडते. चंदनाच्या झाडाखाली तर साप असतातच पण चंदनाच्या झाडावर सुद्धा साप आश्रय घेतात असा दावा केला जातो.
खरे तर चंदन ही एक औषधी वनस्पती आहे. चंदन फक्त औषधी वनस्पतीचे नाही तर हिंदू धर्मात चंदनाला विशेष महत्त्व सुद्धा आहे. हिंदू धर्मातील अनेक लोक चंदनाचा टिळा कपाळावर लावतात. हिंदू धर्मातील लोकांच्या अंत्यसंस्कारावेळी सुद्धा चंदनाचे लाकूड लागते.
याशिवाय चंदनामध्ये असणारे औषधी गुणधर्म पाहता याचा वापर आयुर्वेदातील अनेक औषधे बनवण्यासाठी केला जातो. तसेच चंदन पावडर चेहऱ्यावर लावली जाते. सौंदर्य प्रसाधनांची अनेक साधने बनवण्यात चंदनाच्या लाकडाचा सालीचा आणि पानांचा वापर होतो.
म्हणजेच चंदनाचे सर्व पार्टस महत्त्वाचे आहेत. विशेष बाब अशी की चंदनाच्या लाकडाला बाजारात मोठा भावही मिळतो. यामुळे काही शेतकरी चंदनाची शेती सुद्धा करत आहेत. पण प्रचंड शीतलता देणारे हे झाड सापांना आयतं निमंत्रण देऊ शकतो.
हे झाड डेरेदार असते याची सावली फारच थंडी असते यामुळे साप या झाडाचा आश्रय घेतात. साप या झाडाच्या खाली किंवा झाडावर सुद्धा दिसू शकतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमानात वाढ झाली की असह्य उकाड्यामुळे साप बिळाबाहेर पडतात आणि थंडाव्याच्या शोधात चंदनाच्या झाडाचा आश्रय घेतात.
याशिवाय चंदनाच्या झाडावर पाने आणि फळे खाण्यासाठी पक्षी येतात आणि याच पक्षांची शिकार करण्यासाठी साप तिथे जातात असेही बोलले जाते. त्यामुळे सापांच्या आश्रयाची जागा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची आपल्या घराच्या शेजारी लागवड करू नये असे म्हटले जाते.
तसेच जर याची घराशेजारी लागवड केली तर विशेष काळजी घ्यावी. या झाडाच्या आजूबाजूचा परिसर साफ स्वच्छ ठेवावा. पण शक्यतो याची लागवड घराशेजारी करू नये घरापासून लांब केल्यास काही हरकत नाही.