Soybean Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन दर दबावात आहेत. गेल्या दीड महिन्यांपूर्वी सहा हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सरासरी दरात विक्री होणारे सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात विक्री होत आहेत. मात्र अशातच तज्ञ लोकांनी सोयाबीन दरात वाढ होण्याची आशा असल्याचे सांगितले आहे.
तज्ञांच्या मते एकीकडे ब्राझील आणि अर्जेंटिना जे की सोयाबीन उत्पादनासाठी संपूर्ण जगात ओळखले जातात त्या ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली असल्याने सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार आहे. तर दुसरीकडे चीन आणि चीनप्रमाणेच इतर सोयाबीनचे प्रमुख ग्राहक असलेल्या राष्ट्रात सोयाबीनची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेता सोयाबीन दरात वाढ ही अटळ आहे.
खरं पाहता चीनमध्ये नववर्षाचा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पशुखाद्य इंडस्ट्री कडून मोठ्या प्रमाणात सोयापेंडची मागणी वाढणार आहे. परिणामी, सोया पेंड दरात विक्रमी वाढ होईल आणि यामुळे सोयाबीनच्या बाजार भावाला आधार मिळणार आहे. तसेच चीनमध्ये कोरोना निर्बंध देखील शिथिल केले जात आहेत. अशा परिस्थितीत सोयापेंड निर्यात वाढणार आहे.
निश्चितच, या सदर परिस्थितीमुळे सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजारभाव.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 5550 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5275 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
जळकोट कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 545 क्विंटल पांढरा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5275 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 6 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5135 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5135 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. आणि तसेच सरासरी दर देखील 5135 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.