Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव गेल्या काही महिन्यापासून सोयाबीन दरात वाढ होईल या हेतूने सोयाबीनची साठवणूक करून आहेत. मात्र सद्यस्थितीला दरात अपेक्षित अशी वाढ पाहायला मिळत नाहीये. बाजारातील मंदी पाहता शेतकरी बांधव अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान जाणकार लोकांनी या हंगामात सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. सद्यस्थितीला मात्र जाणकारांच्या अंदाजापेक्षाही कमी दर बाजारात पाहायला मिळत आहे. आज सोयाबीनला सर्वाधिक दर देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला.

या बाजारात सोयाबीन 5 हजार 383 रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमाल दरात विकला गेला तर सरासरी दर पाच हजार 241 नमूद झाला. तर सर्वात कमी दर आष्टी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नमूद करण्यात आला. या एपीएमसी मध्ये आज सोयाबीनला 5000 चा सरासरी दर मिळाला. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 30 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4400 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5324 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5287 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 23 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5382 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5241 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
आष्टी- कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 150 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4650 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5120 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.