Soybean Price : पिवळं सोन चमकलं ! आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात झाली वाढ ; देशांतर्गत होणार का वाढ?

Published on -

Soybean Price Hike International : सध्या पिवळं सोनं आंतरराष्ट्रीय बाजारात धुमाकूळ घालत आहे. पिवळं सोन म्हणजे सोयाबीन दरात जागतिक बाजारात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र जागतिक बाजारात सोयाबीन आणि सोयापेंड भाव खात असला तरी देखील देशांतर्गत दर स्थिरच आहेत.

त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या दरवाढीच्या आशेवर पाणी फिरले आहे. दरम्यान जागतिक बाजारात जी काही दरवाढ झाली आहे त्यामुळे देशाअंतर्गत बाजारात लवकरच भाव वाढ होईल असा तज्ञांचा अंदाज आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात वाढ होण्यामागे तज्ञांनी काही कारणे सांगितले.

तज्ञ लोकांच्या मते, चीनमधून वाढणारी सोयाबीनची मागणी, प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्रात पडलेला दुष्काळ यांसारख्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत आलं आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शिवाय आता त्या ठिकाणी नववर्ष सुरु होणार असल्याने सोयाबीनची मागणी अधिक राहणार आहे.

दरम्यान त्या ठिकाणी सोयाबीनचा साठा देखील नाही या परिस्थितीत चायना मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात करणार आहे. याशिवाय अर्जेंटिना हा प्रमुख सोयाबीन उत्पादक देश. या देशात यावर्षी विक्रमी सोयाबीनचे उत्पादन होईल अशी आशा होती. मात्र त्या ठिकाणी पावसाने हुलकावणी दिली असल्याने सोयाबीन पिकावर गंभीर असा परिणाम झाला आहे.

यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात अर्जेंटिनामध्ये मोठी घट होणार असून काही जाणकारांनी गेल्यावर्षीप्रमाणेच त्या ठिकाणी उत्पादन राहील असा अंदाज बांधला आहे. या दोन परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी वाढली असून दरात वाढत झाली आहे. काल जागतिक बाजारात सोयाबीनचे दर १५.४६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोहचले होते.

सोयाबीनचा हा दर आपल्या भारतीय चलनानुसार ४ हजार ६१७ रुपये प्रति क्विंटल होतो. सोयाबीन समवेतच जागतिक बाजारात सोया पेंड आणि सोया तेल दरातही तेजी आली आहे. देशात मात्र सोयाबीन 5200 ते 5500 दरम्यानचं विक्री होत आहे. तसेच प्रक्रिया प्लांट्स चे दर पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर नमूद केला जात आहे.

जाणकार लोकांनी सोयाबीन दरात थोडीशी तेजी येणार असून साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा तर सोयाबीनला मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत जाणकार लोकांनी सोयाबीनची विक्री साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात करू नये असे आवाहन देखील केले आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe