Soybean Rate Hike : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक. खरं पाहता या पिकाची संपूर्ण भारत वर्षात मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. मध्यप्रदेश आणि आपले महाराष्ट्र या दोन राज्यात या पिकाची सर्वाधिक पेरणी पाहायला मिळते.
एका आकडेवारीनुसार देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी मध्य प्रदेश राज्यात 45% सोयाबीनचे उत्पादन होतं तर महाराष्ट्रात 40% एवढ उत्पादन होत. साहजिकच या पिकाच्या शेतीवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र यंदा सोयाबीन उत्पादकांना बाजारातून मोठी निराशा हाती आली आहे.
शेतकऱ्यांना किमान सात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर यंदा मिळेल अशी आशा होती. परंतु या हंगामात तसं काही झालं नाही. हंगामाचा जवळपास निम्म्याहून अधिक कालावधी उलटत चालला आहे पण सोयाबीन दर सोयाबीन उत्पादकांच्या अपेक्षेप्रमाणे नाहीत.
अशातच शेतकरी बांधवांसाठी जागतिक बाजारातून तसेच देशातील बाजारातून एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. पुढील आठवड्यापासून सोयाबीन दर वाढीसाठी पूरक स्थितीचे बाजारात चित्र पाहायला मिळत असल्याचं जाणकार लोकांचे म्हणणं आहे. जागतिक बाजारात या आठवड्यात सोयापेंडच्या दरात मोठी वाढ झाली. तसेच देशातील बाजारात देखील सोयापेंडच्या दरात वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे पुढील आठवड्यात दरात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोयाबीन दरात मात्र जागतिक बाजारात चढ-उतार पाहायला मिळाली. मात्र असे असले तरी सोयाबीनच्या दरात वाढ होत असल्याने आणि पुढील आठवड्यात यामध्ये अजून वाढ होणार असल्याचा तज्ञांचा अंदाज पाहता सोयाबीन दरवाढीसाठी पूरक स्थिती असल्याचे तज्ञ लोक नमूद करत आहेत.
जागतिक बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार संपूर्ण आठवडाभर कायम राहिली. परंतु सोयापेंडच्या दरात जागतिक बाजारात वाढ झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोयापेंडच्या दरात टनमागे तब्बल 1000 रुपयांची वाढ नमूद करण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत सोयाबीन दरात थोडीशी वाढ झाली आहे.
सोमवारी देशांतर्गत सोयाबीनला 5300 ते 5500 पर्यंतचा दर मिळाला तर शनिवारी मात्र हा दर पाच हजार चारशे ते पाच हजार 700 च्या घरात पोहोचला. म्हणजे सोयाबीन दरात 100 ते 200 रुपयांची वाढ झाली. अशा परिस्थितीत जाणकार लोकांच्या मते जागतिक बाजारात सोयाबीनचे दर एक भाव पातळीवर स्थिर झाले आहेत.
परंतु सोयापेंडच्या दरात दिवसेंदिवस तेजी येत आहे. आजवरचा सोयाबीन बाजाराचा जर इतिहास पाहिला तर जागतिक बाजारात सोयापेंडच्या दरात तेजी आल्यानंतर शंभर टक्के देशांतर्गत सोयाबीन बाजार भाव वाढतात. यामुळे येत्या आठवड्यात देशांतर्गत सोयाबीन दर शंभर रुपये प्रति क्विंटलप्रमाणे वाढण्याची शक्यता तज्ञ लोकांकडून वर्तवण्यात आली आहे.