Soybean Rate Maharashtra : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम विशेष फायद्याचा राहिलेला नाही. खरं पाहता गेल्या हंगामात सोयाबीनला सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत होता. साहजिकच गेल्या हंगामात विक्रमी दर मिळाला यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. परिणामी शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनची पेरणी वाढवली.
मात्र जागतिक बाजारात भारतीय बाजारापेक्षा स्वस्त सोयाबीन असल्याने भारतातील बाजारात सुरुवातीपासून सोयाबीन दर दबावत आहेत. गत हंगामाशी तुलना केली असता जवळपास दोन ते अडीच हजार रुपयांनी सध्या सोयाबीन स्वस्त आहे. हमीभावापेक्षा मात्र सोयाबीनचे दर अधिक आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्र शासनाने सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव लावून दिला आहे.
सद्यस्थितीला यापेक्षा अधिक दर बाजारात असले तरी देखील हा दर शेतकऱ्यांना परवडत नाहीये. दिवसेंदिवस वाढती महागाई लक्षात घेता कृषी निविष्ठांच्या किमती आकाशाला गवसनी घालत आहेत. बी बियाणांपासून ते खत खाद्यांचे दर हे उत्पादन खर्च वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. अशातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन पिकाला पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसत आहे.
कधी अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट तर कधी कमी प्रमाणात कोसळणारा पाऊस यामुळे सोयाबीन पिकावर विपरीत परिणाम होत असून दिवसेंदिवस सोयाबीनची उत्पादकता घटत चालली आहे. यंदाच्या हंगामात तर निसर्गाच्या लहरीपणाची दाहकता अधिक पाहायला मिळाली. राज्यातील बहुतांशी भागात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात म्हणजेच ऐन सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत असताना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि वावरात गुडघाभर पाणी साचले.
परिणामी सोयाबीन पीक पिवळे पडले. यामुळे उत्पादनात घट ही ठरलेलीच होती. शिवाय अनेक ठिकाणी सोयाबीन पीक काढण्याच्या अवस्थेत असताना पाऊस कोसळला. या अवस्थेत पाऊस कोसळला यामुळे शेंगाला कोंबे फुटू लागली तर काही ठिकाणी सोयाबीनच्या परिपक्व शेंगा गळाल्या. शिवाय या अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करत सोयाबीन पीक जोपासण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत.
मात्र सध्या स्थितीला शेतकऱ्यांचे हे सर्व प्रयत्न निष्कळ ठरले आहेत. तूर्तास सोयाबीन दर साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी आहे. काही ठिकाणी 5000 वर दर आले आहेत. अशा परिस्थितीत आजच्या लिलावात सोयाबीनला काय भाव मिळाला आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
मालेगाव- वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 200 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 6069 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 4950 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5126 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5038 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 34 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1041 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5380 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 110 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 5250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5350 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वरोरा- खांबाडा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 34 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 5025 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5250 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
उमरखेड- डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 420 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 5250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5350 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
राजुरा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 20 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 5180 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5180 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. आणि तसेच सरासरी दर देखील 5180 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
कळंब- यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 40 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5250 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.