Soybean Rate : शेतकऱ्यांमागची साडेसाती काही संपेना…! सोयाबीन दरात झाली ‘इतकी’ घसरण ; वाचा आजचे बाजारभाव

Published on -

Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक. राज्यात दिवसेंदिवस सोयाबीन लागवडीखालील क्षत्रात वाढत होत आहे. गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला विक्रमी दर मिळाला होता यामुळे यंदा देखील शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगला दर मिळाला आणि पदरी चार पैसे अधिक शिल्लक राहतील अशी आशा होती.

मात्र तसं काही झालं नाही. अगदी हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीनला नगन्य असा दर मिळत आहे. खरं पाहता सुरुवातीपासूनच सोयाबीनला हमीभावापेक्षा म्हणजे चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दर मिळत आहे.

मात्र यंदा उत्पादनात मोठी घट झाली असल्याने आणि उत्पादन खर्च अधिक करावा लागला असल्याने शेतकऱ्यांना किमान सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर सोयाबीनला मिळणे अपेक्षित आहे. मात्र, एवढा दर यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत मिळालेला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मध्यंतरी सोयाबीन सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दरात विकला जात होता. मात्र आता त्यामध्ये देखील मोठी घसरण झाली असून सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात विकला जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 5000 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5480 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5375 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 699 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5570 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5285 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 135 क्विंटल नं.१ सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5451 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 584 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली-खानेगाव नाका कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 474 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5350 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

केज कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 382 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5350 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5501 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5450 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

उमरखेड -डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 170 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

मुरुड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 458 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4699 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5701 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5450 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

बार्शी -टाकळी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 300 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5475 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 240 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News