आज आणि उद्या राज्यातील शिक्षकांची शाळा बंद आंदोलन, पण शाळेला सुट्टी राहणार नाही, शिक्षण विभागाचा नवा आदेश

राज्यातील अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी तसेच कर्मचाऱ्यांनी अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर होत नसल्याने आंदोलनाची हाक दिली आहे. यामुळे आज आणि उद्या राज्यातील शाळा बंद राहतील असे बोलले जात होते, पण दुसरीकडे शिक्षण विभागाने या संदर्भात एक वेगळाच आदेश जारी केला आहे.

Published on -

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी शिक्षण विभागाकडून एक नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. खरं तर राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज आणि उद्या म्हणजेच आठ आणि नऊ जुलै 2025 रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील हजारो शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी अनुदान आणि आपल्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी आज आणि उद्या मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन करण्याची मोठी घोषणा केली आहे.

महत्वाची बाब अशी की आंदोलनाला विविध संघटनांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे आज आणि उद्या राज्यातील सर्वच शाळा बंद राहतील असे बोलले जात होते. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद राहतील याचे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन सुद्धा संबंधित संघटनांकडून केले जात होते. पण अशातच राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून या संदर्भात एक नवीन आदेश जारी करण्यात आला आहे.

शिक्षण विभागाचा नवीन आदेश संभ्रम वाढवणारा

आज आणि उद्या नियोजित सुट्टी नसतानाही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शाळांना सुट्टी राहील अशी शक्यता होती. पण राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून काल एक महत्त्वाचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला. या शासन आदेशान्वये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता आज आणि उद्या शाळा सुरूच राहणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील कोणतीच शाळा आंदोलनामुळे बंद ठेवली जाणार नाही असे या आदेशातून स्पष्ट होते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांनी स्वतः हे आदेश काढले आहेत. एकीकडे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये ही गोष्ट विचारात घेऊन राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून आज आणि उद्या शाळा सुरूच राहणार असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे मात्र पालकांसमोर एक वेगळाच प्रश्न उभा राहिला आहे. आज आणि उद्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत. दुसरीकडे आज राज्यातील काही भागांमध्ये विद्यार्थी शाळेत जाताना दिसलें आहेत. परिणामी आता शिक्षण विभागाच्या या आदेशानंतर आंदोलनावर काय परिणाम होणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!