महाराष्ट्रातील ‘या’ गावाचे कांदे बियाणे आहे सर्वात प्रसिद्ध! कांदा बीजोत्पादनामुळे शेतकऱ्यांचे झाले टुमदार बंगले तसेच घरासमोर आहेत चारचाकी

भारत हा देश मुळातच विविधतेत एकता असलेला देश असून आपल्याला भारतामध्ये अनेक बाबतीत प्रत्येक राज्यात विविधता दिसून येते. राज्यामध्येच नाहीतर जिल्हा जिल्ह्यामध्ये आपल्याला काही बाबतीत विविधता दिसते. तसेच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रात देखील प्रत्येक जिल्हा हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विविधता जपणारा आहे.

Ajay Patil
Published:
onion seeds

Onion Seed Production:- भारत हा देश मुळातच विविधतेत एकता असलेला देश असून आपल्याला भारतामध्ये अनेक बाबतीत प्रत्येक राज्यात विविधता दिसून येते. राज्यामध्येच नाहीतर जिल्हा जिल्ह्यामध्ये आपल्याला काही बाबतीत विविधता दिसते. तसेच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रात देखील प्रत्येक जिल्हा हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विविधता जपणारा आहे.

तसेच शेती क्षेत्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये देखील काही जिल्ह्यांची वेगळी अशी ओळख आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर जळगाव जिल्हा म्हटला म्हणजे केळी हे पीक समोर येते व केळीच्या आगार म्हणून जळगाव जिल्ह्याला ओळखतात व त्यासोबतच नाशिक जिल्ह्याला द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखले जाते.

परंतु यासोबतच महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असे एक गाव आहे की ते गाव कांदा बियाण्यासाठी सर्वदूर असे ओळखले जाऊ लागले असून त्या गावाचे नाव आहे आसनगाव हे होय. अगदी पंधराशे लोकसंख्येचे असलेले अगदी छोट्याशा या गावाने मात्र कांदा बीजोत्पादनातून खूप मोठी आर्थिक प्रगती केलेली आहे. याच गावाची माहिती आपण थोडक्यात बघू.

आसनगावाचे कांदा बियाणे आहे सर्वदूर प्रसिद्ध
सातारा जिल्ह्यात आसनगाव असून पंधराशे लोकसंख्या असलेले छोटेसे गाव आहे. या संपूर्ण गावाचे शेत जमिनीचे क्षेत्र बघितले तर ते साडेचारशे हेक्टर आहे व यातील जवळपास 200 हेक्टर जमीन बागायती आहे. या गावाचे प्रमुख पिके बघितली तर ती प्रामुख्याने आले तसेच कांदा व ऊस ही आहेत.

परंतु या गावाची ओळख आता कांदा बीजोत्पादन करणारे गाव म्हणून केली जाऊ लागली आहे व यामधील प्रमुख कारण जर शोधायचे झाले तर आपल्याला १९९५ सालापर्यंत मागे जावे लागेल. साधारणपणे या गावामध्ये 1995 पासून कांदा बीजोत्पादनाला अगदी छोट्या स्वरूपामध्ये सुरुवात झाली व 2005 पासून मात्र व्यावसायिक रूपात कांदा बीजोत्पादन केले जाऊ लागले.

या गावचे शेतकरी साधारणपणे नोव्हेंबर महिन्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रमाला सुरुवात करतात. कांदा बीजोत्पादनासाठी परागीभवन खूप महत्त्वाचे असते व या परिसरात मधमाशांचे प्रमाण खूप जास्त असल्याने मधमाशांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणचे शेतकरी वेगवेगळ्या फुलांची लागवड देखील करतात व परागीभवनाच्या दृष्टीने जेव्हा कांदा बीजोत्पादनासाठी लावलेले पीक फुलोरा काळात असते तेव्हा कीटकनाशकांची फवारणी बंद केली जाते.

या ठिकाणचे शेतकरी जेव्हा बियाणे तयार करतात तेव्हा त्याची प्रतवारी केली जाते. एका एकरमध्ये साधारणपणे तीन ते पाच क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते व बियाण्याचा दर हा कांद्याच्या दरावर अवलंबून राहतो.

सरासरी प्रतिकिलो 600 रुपये पासून तर एक हजार रुपयांपर्यंत व सर्वाधिक दोन हजार रुपयापर्यंत दर आतापर्यंत कांदा बियाण्याला या ठिकाणी मिळाला आहे. एकरी अडीच लाख रुपये भांडवली खर्च येतो व खर्च वजा जाता चांगले उत्पन्न या ठिकाणच्या शेतकऱ्यांना मिळत आहे.

कांदा बीज उत्पादनातून मिळवली आर्थिक समृद्धी
सुरुवातीला सातारा जिल्ह्यातील शेतकरी आसनगावचे कांदा बियाणे खरेदी करायचे. परंतु येथील कांदा बियाण्याची ख्याती पसरायला लागली तशी पुणे जिल्हा तसेच पुरंदर परिसरातून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली. आता तर नाशिक जिल्ह्यापर्यंत आसनगावचे कांदा बियाणे येते याशिवाय मध्य प्रदेश तसेच आंध्र प्रदेश व कर्नाटकापर्यंत इथले बियाणे पोहोचले आहे.

या ठिकाणाच्या दर्जेदार बियाण्यामुळे आसनगावची ओळख आज दुसऱ्या राज्यांपर्यंत देखील पोहोचली आहे. या ठिकाणी जवळपास 500 ते 600 क्विंटल बियाणे निर्मिती प्रत्येक वर्षी केली जाते व यातून काही कोटी रुपयांची उलाढाल होते. गेल्या पंधरा वर्षांमध्ये कांदा बीजोत्पादन क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली आहे.

साधारणपणे रब्बी हंगामात 70 ते 80 शेतकरी 120 ते 130 एकर क्षेत्रावर ही लागवड करतात व एकूण व्यावसायिक पद्धतीतून पूर्ण गावाचे अर्थकारण सुधारले आहे. कांदा बियाण्याच्या माध्यमातून आज इथल्या शेतकऱ्यांनी टुमदार बंगले तर बांधलेच,परंतु घरापुढे चार चाकी व ट्रॅक्टर दिसतात.

तसेच आसनगाव परिसरामध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण व्हायची व टँकरवर अवलंबून राहावे लागायचे. कायमचा या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी इथल्या ग्रामस्थांनी सन 2017-18 मध्ये जलसंधारणाची कामे हाती घेतली

व पाणी फाउंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत भाग घेतला या माध्यमातून नाला बंडिंग तसेच डीप सीसीटी, बांधबंधिस्ती तसेच ओढ्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण इत्यादी कामे केली व या प्रकारचे अनेक कामे करून पाणीटंचाईवर देखील मात केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe