नवीन वर्षात पीएफशी संबंधित ‘हे’ पाच नियम बदलणार! तुम्हाला काय होईल याचा फायदा किंवा तोटा? जाणून घ्या माहिती

खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते असते. पीएफ अर्थात प्रॉव्हिडंट फंड हे प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाचे बचतीचे साधन मानले जाते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या या ईपीएफ अर्थात पीएफ खात्याचे नियमन केले जात असते या विषयी नियम देखील ईपीएफओच्या माध्यमातून केले जातात.

Ajay Patil
Published:
epfo rule

Change Rule Of PF:- खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते असते. पीएफ अर्थात प्रॉव्हिडंट फंड हे प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाचे बचतीचे साधन मानले जाते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या या ईपीएफ अर्थात पीएफ खात्याचे नियमन केले जात असते या विषयी नियम देखील ईपीएफओच्या माध्यमातून केले जातात.

जसे आपण बघितले की 2024 मध्ये देखील नोकरी करणाऱ्या लोकांना लक्षात घेऊन काही बदल करण्यात आले होते व आता नवीन वर्ष सुरू होणार आहे व या पार्श्वभूमीवर काही बदल होणे अपेक्षित आहेत.साहजिकच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये जर पीएफच्या संबंधित काही बदल केले गेले तर त्याचा थेट परिणाम हा तुमच्यावर होत असतो.

या बदलांमुळे ईपीएफमध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुलभ होईल आणि नोकरदार व्यक्तींना अगोदर पेक्षा काही चांगल्या सोयी यामध्ये उपलब्ध होऊ शकतील.त्यामुळे नवीन वर्षात पीएफ खात्याशी संबंधित असलेल्या नियमात काय बदल होऊ शकतात याची माहिती थोडक्यात बघू.

नवीन वर्षात पीएफच्या संदर्भात बदलतील हे नियम?

1- एटीएम मधून काढता येतील पीएफचे पैसे- आपल्याला माहित आहे की, माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यानुसार बघितले तर लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून एक एटीएम कार्ड जारी केले जाणार आहे व ज्याद्वारे लोकांना त्यांच्या ईपीएफ खात्यातून कधीही पैसे काढता येणे शक्य होणार आहे.

वर्षापासून हा बदल लागू होण्याची शक्यता आहे व या नवीन नियमामुळे पीएफ खात्यातून पैसे काढण्याचे प्रक्रिया अतिशय सोपी आणि जलद होणार आहे.

2- योगदान मर्यादेत वाढ- आतापर्यंत जर बघितले तर पंधरा हजार रुपयापर्यंतचे मूळ वेतन ईपीएफ खात्यात जमा केले जात होते. परंतु आता सरकारचा प्लॅनिंग आहे की लोकांना त्यांच्या संपूर्ण पगारानुसार त्यांच्या ईपीएफ खात्यात पैसे जमा करता आले पाहिजेत.

जेणेकरून अशा व्यक्तींना भविष्यासाठी अधिक पैसा वाचवण्यासाठी मदत होईल. जर एखाद्याचा मूळ पगार एक लाख रुपये असेल तर तो नवीन वर्षात दरमहा 24 हजार रुपये( कर्मचारी आणि नियोक्ता मिळून ) जमा करू शकेल.

3- इक्विटी लिमिट वाढेल- दर महिन्याला कर्मचारी आणि त्यांच्या कंपनीकडून जे काही पैसे जमा होतात ते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ वेगवेगळ्या प्रकारे गुंतवत असते. या माध्यमातून गुंतवलेल्या रकमेवर व्याज मिळते आणि पैसा वाढत राहतो. या गुंतवणुकीच्या प्रकारांपैकी एक्सचेंज ट्रेडेड फंड अर्थात ईटीएफ मधील गुंतवणूक फायद्याची ठरते.

या बाबतीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून विचार केला जात आहे की, ईटीएफ विकून पैसे कमवतात तेव्हा त्या पैशांचा काही भाग शेअर्समध्ये आणि इतरत्र पुन्हा गुंतवावा. असे केल्यामुळे ईपीएफओ तुमच्या पैशावर अधिक व्याज मिळवू शकेल अशी एक अपेक्षा आहे.

4- कोणत्याही बँकेच्या शाखेतून काढता येईल पेन्शन- तसेच देशातील जवळपास 78 लाख इपीएफ पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन काढण्याची सुविधा मिळेल. परंतु ही प्रणाली लागू करण्यापूर्वी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पेन्शनधारकांना पेन्शन काढण्यासाठी विशिष्ट बँकेच्या शाखेत जावे लागते.

परंतु आता येणाऱ्या वर्षापासून बदललेल्या नियमानुसार पेन्शनधारकांना देशाच्या कोणत्याही भागात राहून पेन्शनचे पैसे कोणत्याही बँकेच्या शाखेतून काढता येऊ शकतील.

5- उच्च पेन्शनच्या शेवटच्या तारखेबद्दलचा नियम– कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून माहिती जारी करण्यात आली आहे की,सर्व कंपन्यांनी ईपीएफओ पोर्टलवर 31 जानेवारी 2025 पर्यंत त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची माहिती अपलोड करावी.

तसेच आता ईपीएफओने जर कोणतीही माहिती मागितली तर कंपन्यांना ती 15 जानेवारी 2025 पर्यंत द्यावी लागेल. ज्यांनी जास्त पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत त्यांच्या अर्जावर लवकर कार्यवाही करता यावी यासाठी या प्रकारचा नियम केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe