Agri Related Business:- शेतकऱ्यांनी आता नुसते शेतीवर अवलंबून न राहता शेतीशी निगडित असलेले व्यवसाय सुरू करणे खूप गरजेचे आहे. कारण शेती व्यवसायामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो व आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते.
या पार्श्वभूमीवर शेतीशी निगडित इतर व्यवसाय शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून फायद्याचे ठरू शकतात. या व्यवसायांमध्ये विविध शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग व तसेच इतर शेतीशी संबंधित असलेले उद्योग उभारून त्या माध्यमातून आर्थिक समृद्धी साधणे गरजेचे आहे.

या अनुषंगाने जर आपण कोल्ड स्टोरेजचा व्यवसाय बघितला तर हा शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो. कारण आपल्याला माहित आहे की शेतीमध्ये जो काही भाजीपाला आणि फळे पिकतात ते नाशिवंत असल्यामुळे त्यांना साठवण्याची सुविधा असणे खूप गरजेचे आहे व हीच मोठी संधी ओळखून कोल्ड स्टोरेज व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकतो.
कसा सुरू कराल कोल्ड स्टोरेजचा व्यवसाय?
तुम्हाला देखील हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला अगोदर तुमच्या परिसरातील मार्केटचा चांगला अभ्यास करणे गरजेचे असेल. तसेच तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्यापासून दहा ते पंधरा किलोमीटर पट्ट्यामध्ये कुठल्या फळांचे व भाजीपाला पिकाचे उत्पादन घेण्यात येते? तसेच दुग्ध व्यवसायाचे स्वरूप कसे आहे किंवा एखादे मच्छी किंवा चिकन/ मटन मार्केट जवळपास आहे का या गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास करून मग निर्णय घ्यावा.
तसे पाहायला गेले तर कोल्ड स्टोरेजचा उपयोग हा भाजीपाला व फळे जास्त दिवसापर्यंत उत्तम पद्धतीने साठवता याव्यात याकरिता होतो. बऱ्याचदा एखाद्या शेतीमालाचे एकाच वेळी जास्त उत्पादन निघून बाजारपेठेत आवक वाढते व भाव पडतात.
या परिस्थितीमध्ये जर कोल्ड स्टोरेज असेल तर त्यामध्ये शेतीमाल ठेवून बऱ्याच दिवसांपर्यंत शेतीमाल टिकवता येतो व जेव्हा दर वाढतील तेव्हा बाजारपेठेत नेऊन वाढीव दराचा फायदा मिळवता येतो. त्यामुळे कोल्ड स्टोरेज व्यवसाय हा आर्थिक दृष्टिकोनातून खूप फायद्याचा व्यवसाय आहे.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता भासेल?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर कोल्ड स्टोरेजचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला फायर अँड पॉल्युशन डिपार्टमेंट आणि हॉर्टिकल्चर बोर्डाचे परमिशन घेणे आवश्यक राहील व त्यासोबत फॅक्टरी लायसन्स, जीएसटी नंबर आणि उद्योग रजिस्ट्रेशन करणे गरजेचे राहील.
तसेच तुम्हाला कोल्ड स्टोरेज उभारताना त्याची क्षमता पाच मॅट्रिक टन इतके ठेवायचे असेल तर त्याकरिता 50 ते 60 स्क्वेअर फुट जागा लागेल. याशिवाय 24 तास विजेचा अखंडित पुरवठा राहणे यासाठी खूप महत्त्वाचे असते. कोल्ड स्टोरेजसाठी साधारणपणे तीनशे ते चारशे एचपी इलेक्ट्रिसिटी असणे गरजेचे असून याकरिता तुम्हाला बारा लाख रुपये साधारणपणे खर्च येतो.
तसेच दहा ते बारा कामगारांची आवश्यकता तुम्हाला यामध्ये राहते. या व्यवसायामध्ये तुम्ही इतर शेतकऱ्यांचे शेतीमाल भाड्याने तुमच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवू शकता व त्या माध्यमातून चांगली कमाई करू शकतात.
कोल्ड स्टोरेज व्यवसायाचे थोडक्यात स्वरूप?
कोल्ड स्टोरेजचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला लागणारा पैसा बघितला तर यामध्ये तुम्हाला दहा ते बारा लाख रुपये टाकावे लागतील. तसेच या व्यवसायात प्रामुख्याने कोल्ड स्टोरेज साठी आवश्यक यंत्रसामुग्रीची गरज भासते. ही यंत्रसामुग्री तुम्हाला अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत मिळते. कमीत कमी पाच ते सहा मनुष्यबळाची आवश्यकता तुम्हाला या व्यवसायात भासते.
कोल्ड स्टोरेज व्यवसायासाठी ग्राहक कसे मिळवाल?
तुमच्या कोल्ड स्टोरेज साठी तुम्हाला ग्राहक हवे असतील तर त्याकरिता तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना तुमच्या कोल्ड स्टोरेज बद्दलची आवश्यक माहिती द्यावी लागेल. तसेच दूध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून स्टोरेजसाठी तुम्ही त्या ठिकाणाचा माल भाड्याने तुमच्या कॉल स्टोरेज मध्ये ठेवू शकता.
इतकेच नाही तर वेगवेगळे भाजीपाला आणि फळे पिकवणारे शेतकरी तसेच मॉल्स यांच्याकडून देखील तुम्हाला ऑर्डर मिळू शकते. व्यवस्थित प्लॅनिंग करून जर तुम्ही हा व्यवसाय वाढवला तर या माध्यमातून आयुष्यभर तुम्हाला लाखोत पैसा मिळू शकतो.