Sweet City Of India:- भारतामध्ये अनेक महत्त्वाची अशी शहरे आहेत व अनेक शहरांची वेगवेगळी अशी वैशिष्ट्ये आणि वेगळेपण आहे. त्यामुळे अशी शहरे संपूर्ण भारतातच नाही तर जागतिक पातळीवर देखील ओळखले जातात. मुळातच आपला भारत देश हा विविधतेत एकता असलेला देश म्हणून ओळखला जातो व ही विविधता आपल्याला लोक संस्कृती तसेच इतिहास, परंपरा तसेच बोलीभाषा, भौगोलिक व नैसर्गिक संपदा इत्यादी बाबतीत दिसून येते.
त्यामुळे भारताच्या प्रत्येक राज्याचे काहीसे वेगळेपण इतर राज्यांपेक्षा दिसून येते. तसेच भारताला मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती लाभली असल्यामुळे देखील भारताचे महत्त्व हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिले की शहरांमधील विशेषता व त्यावरून त्या शहरांची ओळख हे देखील खूप महत्त्वाचे आहे.
अगदी शहरांची विविधता किंवा शहरांच्या विशेषता या दृष्टिकोनातून बघितले तर भारतातील मुजफ्फरपुर हे बिहार राज्यात असलेले शहर त्या ठिकाणी केल्या जात असलेल्या लीची लागवडीमुळे खूप प्रसिद्ध आहे
व या लीची फळ लागवडीमुळेच या शहराला स्वीट सिटी म्हणजेच भारताचे गोड शहर म्हणून ओळखले जाते. एकंदरीत बिहार राज्यामध्ये लिचीचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते. मुजफ्फरपुर हे भारताचे गोड शहर म्हणून ओळखले जाते.
काय आहे मुजफ्फरपुरचा इतिहास?
गंडक नदीच्या काठावर हे शहर वसले असून 1875 मध्ये या शहराला जिल्ह्याचा दर्जा मिळण्यापूर्वी ते तिरहुत जिल्ह्याचा एक भाग होते. या ठिकाणी बज्जीका नावाची भाषा बोलली जाते. या ठिकाणी मोठा असा थर्मल पावर प्लांट असून तो या सर्व परदेशाला वीज पुरवठा करतो.
मुजफ्फरपुर शहराच्या ठिकाणाचे हवामान आणि त्या ठिकाणी असलेली सुपीक आणि उत्पादनक्षम माती यामुळे लीची लागवडी करीता हे आदर्श केंद्र ठरले आहे. भारतामध्ये महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध असलेल्या लीची उत्पादन घेणाऱ्या शहरांपैकी मुजफ्फरपुर एक आहे. लिचीचा जर एक उत्तम असा प्रकार पाहिला तर तो शाही लिची हा आहे.
हा प्रकार प्रामुख्याने मुजफ्फरपुर येथे पिकवला जातो. विशेष म्हणजे या ठिकाणांच्या शाहि लीचीला जीआय नामांकन देखील मिळाले आहे.जेव्हा लिचीचा हंगाम असतो तेव्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लीचीच्या बागा बहरतात.
त्यामुळे त्या ठिकाणाचे वातावरण स्वर्गासमान वाटायला लागते. मुजफ्फरपुर येथील लिची उद्योग आज स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना तर देतोच परंतु एक शहराची नवीन ओळख मिळवून देण्यासाठी देखील महत्त्वाचा आहे. लिचीची जर गोड चव चाखायची असेल तर मुजफ्फरपुर हे अनेकांचे आवडीचे ठिकाण आहे.