Nippon India Growth Fund:- गेल्या काही वर्षापासून जर आपण बघितले तर म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असून या माध्यमातून चांगला परतावा देखील मिळवत आहेत.
शेअर बाजारामध्ये देखील गुंतवणुकीचे प्रमाण आपल्याला आता वाढताना दिसून येत आहे. अगदी ग्रामीण भागातील गुंतवणूकदार देखील शेअर मार्केट कडे वळत आहेत. शेअर मार्केट मधील गुंतवणुकीत जास्त प्रमाणात जोखीम असते व तुम्हाला जोखीम घ्यायची नसेल तर म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे.

या अनुषंगाने तुम्हाला देखील जर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायचे असेल तर निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडचे स्मॉल कॅप योजना खूप महत्त्वाची असून निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडने परताव्याच्या बाबतीत खूप उत्तम अशी कामगिरी केली असून गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलेला आहे. या म्युच्युअल फंडने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले असून गुंतवणुकीवर शानदार परतावा दिला आहे.
निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडने कसा दिला आहे परतावा?
निप्पॉन इंडिया एएमसीच्या निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड या योजनेने तिच्या लॉन्चिंग पासून दरवर्षी 23.44% वार्षिक एसआयपी परतावा दिला असून एक वेळच्या गुंतवणूकदारांसाठी या योजनेने दरवर्षी लॉन्च झाल्यापासून 23.21% दराने परतावा दिला आहे.
आजपर्यंत या म्युच्युअल फंडने एक, तीन तसेच पाच व दहा वर्ष असो प्रत्येक टप्प्यावर उत्कृष्ट परफॉर्मन्स केला असून यामध्ये पाच वर्षात जवळपास पाच पट तर दहा वर्षात जवळपास आठपट एकरकमी गुंतवणूकदारांनी पैसे कमावले आहेत.
पाच वर्षाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या एसआयपी योजनेने 38.96% आणि दहा वर्षात 26.29% वार्षिक परतावा दिला आहे.या म्युच्युअल फंडाचे रेटिंग पाहिले तर व्हॅल्यू रिसर्चने या फंडाला चार स्टार रेटिंग दिले असून क्रिसिलने तीन स्टार रेटिंग दिले आहे.
कधीपासून सुरू करण्यात आला हा फंड?
हा म्युच्युअल फंडाची सुरुवात 8 ऑक्टोबर 1995 पासून करण्यात आली आहे आणि तेव्हापासून दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीचे 42 लाखापेक्षा जास्त मूल्य झाले आहे. याचाच अर्थ तुम्ही जर या एसआयपीमध्ये महिन्याला पंधराशे रुपये जमा केले असते तर त्याच्याकडे आता चार कोटी रुपयांचा फंड राहिला असता.
निप्पोन इंडिया ग्रोथ फंडने 23 मार्च 2020 ते 23 मार्च 2021 या कालावधीमध्ये तब्बल 95% चा परतावा दिला आहे. फक्त चार एप्रिल 2019 ते 3 एप्रिल 2020 मध्ये या फंडाने फक्त 28% परतावा दिला होता.
या महिन्यात 29 वर्ष या फंडाला पूर्ण झाले असून ही योजना सुरू झाल्यानंतर ज्या गुंतवणूकदारांनी एसआयपीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची गुंतवणूक केली असती तर ते गुंतवणूकदार 3.86 कोटी रुपयांचे धनी राहिले असते.
महिन्याला पंधराशे रुपये याप्रमाणे 29 वर्षात पाच लाख 22 हजार रुपये तुमची गुंतवणूक झाली असती व एसआयपीचे एकूण मूल्य 29 वर्षानंतर तीन कोटी 86 लाख 46 हजार 246 रुपये इतके झाले असते.
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करतो?
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड प्रामुख्याने तंत्रज्ञान, आरोग्य, ऊर्जा आणि उपयुक्तता,औद्योगिक, आर्थिक, साहित्य आणि रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करतो.