महाराष्ट्रासाठी शिफारशीत तुरीच्या सर्वोत्कृष्ट जाती आणि त्यांच्या विशेषता वाचाच !

Ajay Patil
Published:
Tur Farming

Tur Farming : सोयाबीन, कापूस, तूर, मका, भात या पिकाची खरीप हंगामामध्ये आपल्याकडे सर्वाधिक लागवड केली जाते. याव्यतिरिक्त कांद्याची देखील खरिपात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेती होते. मात्र या सर्वांमध्ये तूर लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.

सोयाबीन आणि कापूस या दोन नगदी पिकांनंतर तूर या डाळवर्गीय पिकाची आपल्या राज्यात सर्वाधिक शेती केली जाते. विशेष बाब म्हणजे सध्या तुरीला 11000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा विक्रमी दर मिळतोय. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रमुख एपीएमसी मध्ये तूर दहा हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दरात विक्री होत आहे.

सरासरी बाजार भाव 10000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत येऊन ठेपला असल्याने यंदा तूर लागवडीखालील क्षेत्रात निश्चितच वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे सोयाबीन आणि कापूस या नगदी पिकांमधून शेतकऱ्यांना फारसे उत्पादन मिळाले नाही तर दुसरीकडे तुरीच्या पिकातून कमी उत्पादन मिळाले असतानाही चांगली कमाई होण्याचे चित्र आहे.

अशा परिस्थितीत यंदा सोयाबीन आणि कापूस लागवडीमध्ये घट येऊ शकते तर तूर लागवडीमध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज काही बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान कृषी तज्ञांनी शेतकऱ्यांना तूर लागवड करताना तुरीच्या सुधारित आणि महाराष्ट्रासाठी शिफारशीत केलेल्या जातींच पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे.

अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्रासाठी शिफारशीत करण्यात आलेल्या तुरीच्या सुधारित आणि प्रगत जाती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तुरीच्या सुधारित जाती खालीलप्रमाणे

राजेश्वरी :- महाराष्ट्रासाठी शिफारशीत करण्यात आलेल्या या जातीची राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात लागवड केली जाते. मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख तूर उत्पादक पट्ट्यामध्ये या जातीची सर्वाधिक शेती होते. ही एक लवकर पक्व होणारी जात आहे. साधारणता 130 ते 140 दिवसात या जातीपासून हेक्टरी 30 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो. या जातीची तुर लाल रंगाची असते.

एकेटी 8811 : ही देखील महाराष्ट्रासाठी शिफारशीत करण्यात आलेली एक मुख्य जात आहे. या जातीची देखील राज्यातील विविध जिल्ह्यात लागवड केली जाते. हा वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. 140 ते 150 दिवसात या जातीचे पिक पक्व होत असून यापासून हेक्टरी 16 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. उत्पादनाच्या बाबतीत ही जात राजेश्वरीपेक्षा कमी आहे.

आय सी पी एल 87 : आपल्या राज्यात या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड पाहायला मिळते. ही तुरीची हळवा जात आहे. ही जात खोडवा घेण्यासाठी उत्तम असल्याचा दावा केला जातो. या जातीपासून हेक्टरी 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचे सांगितले जाते.

आय सी पी एल 87119 :- या जातीची महाराष्ट्रात लागवड केली जाऊ शकते. या जातीला आशा या नावाने ओळखले जाते. उशिरा पक्व होणारी ही जात शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय बनले असून विदर्भात याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. ही जात साधारणता 180 ते 200 दिवसात पक्व बनते आणि यापासून हेक्टरी वीस क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.

पीकेव्ही (तारा) :- महाराष्ट्रात या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. साधारणता 170 ते 180 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनते. या जातीपासून वीस क्विंटल पर्यंतचे हेक्‍टरी उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.

विपुला :- साधारणता 150 ते 160 दिवसात पक्व बनणारा हा वाण शेतकऱ्यांमध्ये अलीकडे विशेष लोकप्रिय बनला आहे. या जातीची लागवड राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील तूर उत्पादक पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. या जातीपासून साधारणतः 25 ते 26 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो. निश्चितच या जातीची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकते. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe