UPSC Success Story:- यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याकरिता नियोजनबद्ध अभ्यास आणि जिद्द, अफाट कष्ट करण्याची तयारी इत्यादी गुण असणे खूप गरजेचे असते. अभ्यास करताना तो दिशाहीन अभ्यास न करता व्यवस्थित परीक्षेच्या दृष्टिकोनातून नियोजन करून त्या पद्धतीनेच अभ्यास करणे खूप गरजेचे असते. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे ही वाटते तेवढी सोपी बाब नाही.
परंतु मनामध्ये जिद्द असेल व आपले ध्येय निश्चित झाले असेल तर त्यानुसार मेहनत घेतली तर यश मिळतेच याच पद्धतीने अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी या परीक्षांमध्ये यश मिळवतात. अगदी याच पद्धतीने जर आपण उत्तर प्रदेश राज्यातील गाजियाबाद येथील कृष्णकुमार सिंह यांचा आयएएस होण्याचा प्रवास पाहिला तर तो खूप प्रेरणादायी असा आहे.

पाच वेळा यूपीएससीची परीक्षा दिली व दोन वेळा या परीक्षेमध्ये यश मिळवून पहिल्यांदा आयपीएस म्हणून नियुक्ती झाली. परंतु आयएएस होण्याचे स्वप्न असल्यामुळे परत यूपीएससी परीक्षेची तयारी करून परीक्षा दिली व कष्टाच्या जोरावर ते आयएएस झाले.
अशा पद्धतीने पूर्ण केला आयपीएस पर्यंतचा प्रवास
मूळचे गाझियाबाद येथील असलेले कृष्णकुमार सिंह हे यूपीएससी या परीक्षेमध्ये नापास झाले व त्याच्यानंतर अनेक वेळा त्यांचे धैर्य डगमगले पण त्यांनी या अपयशाच्या माध्यमातून हार न मानता नोकरी सोबत यूपीएससी परीक्षेची तयारी करत राहिले व मेहनत व कष्टाच्या जोरावर त्यांनी एकदा नाही तर दोनदा यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली व त्याखेरीस आयएएस अधिकारी बनले.
जे व्यक्ती किंवा विद्यार्थी छोट्या छोट्या अपयशामुळे पराभूत होतात व धैर्य खचवतात अशा विद्यार्थ्यांसाठी कृष्णकुमार सिंह हे एक प्रेरणा आहेत. पराभवाचा स्वीकार करण्याऐवजी या तरुणाने प्रत्येक अपयशातून धडा घेतला व वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये खूप संघर्ष केला. पण आईएएस अधिकारी होताच त्यांच्या सर्व कष्टांना यश मिळाले व मेहनत केल्याचे सार्थक झाले. कृष्णकुमार यांनी यूपीएससी परीक्षेमध्ये एकूण पाच प्रयत्न केले.
कृष्णकुमार यांचा परीक्षेचा प्रवास कसा होता?
बारावी झाल्यानंतर कृष्णकुमार सिंग जेईई परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात नापास झाले होते व तरीदेखील हार न मानता दुसऱ्या प्रयत्नाची तयारी सुरू केली. जेईई परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले परंतु रँक चांगली नव्हती व त्यामुळे आयआयटीमध्ये त्यांना प्रवेश मिळाला नाही. तरी देखील हार न मानता त्यांनी नेताजी सुभाष तंत्रज्ञान विद्यापीठात संगणक विज्ञान शाखेत प्रवेश घेतला व बी टेक पूर्ण केल्यानंतर कृष्णकुमार सिंगने कॅम्पस प्लेसमेंट मध्ये भाग न घेता बीटेकच्या चौथ्या वर्षी असतानाच नागरी सेवेमध्ये रुजू होण्याचा निर्णय घेतला होता व हा प्रवास तसा कठीण होता.
सन 2015 मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी पहिला प्रयत्न केला व पूर्व परीक्षेत नापास झाला व दुसऱ्या प्रयत्नात देखील पूर्व परीक्षेत अपयशी ठरला. या परीक्षांच्या आणि यूपीएससी परीक्षांच्या तयारीमध्ये कृष्णकुमार हे व्यस्त असताना मात्र त्यांचे मित्र काही ठिकाणी नोकऱ्या करत होते व काही विदेशामध्ये स्थायिक झालेले होते.
तरी देखील मनाला कुठल्याही प्रकारची निराशा वाटू न देता त्यांनी रिझर्व बँकेत नोकरीसाठी परीक्षा दिली व त्यामध्ये यश मिळाले व शिमल्याला त्यांचे नियुक्ती झाली. बँकेत नोकरी लागल्यानंतर देखील नागरी सेवा परीक्षेचा ध्यास त्यांना सतावत होता व त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवलेले होते. ज्याचं नोकरी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी अशा दुहेरी बाजूने ते काम करत होते. त्यानंतर ही नोकरी करत असताना यूपीएससी परीक्षेचा तिसरा प्रयत्न केला व यामध्ये मुख्य परीक्षेत नापास झाला.
त्यामुळे यूपीएससी न देता आता रिझर्व बँकेमध्येच काही नोकरीच्या चांगल्या संधी आहेत का ते कृष्णकुमार शोधू लागले. परंतु 2019 मध्ये परत यूपीएससी परीक्षेसाठी चौथा प्रयत्न केला व 181 रँक सह ते यशस्वी झाले व आयपीएस मध्ये त्यांना नोकरीची ऑफर मिळाली. नंतर ती ऑफर स्वीकारली व ट्रेनिंग सुरू केली.
परंतु तरीदेखील मनामध्ये आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. आयएएस झाल्यानंतर देखील त्यांचा प्रवास थांबला नाही व शेवटचा प्रयत्न म्हणून 2020 मध्ये त्यांनी आयपीएसचे ट्रेनिंग सुरू असताना सुट्टी घेतली व परीक्षेचे अंतिम तयारी सुरू केली. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये कोरोनामुळे परीक्षा आणि मुलाखत यांच्या तारखा पुढे लांबल्या.
परंतु त्यांची आधीच आयपीएस मध्ये निवड झाल्यामुळे कुठल्याही प्रकारचे दडपण कृष्णकुमार यांच्यावर न होते. परंतु याहीमध्ये त्यांची मेहनत कामाला आली व ते पाचव्या प्रयत्नात 24व्या रँकने आयएएस अधिकारी बनले.
अशा पद्धतीने मनामध्ये जिद्द आणि ध्येय असेल व ते पूर्ण करण्याची उर्मी असेल तर व्यक्ती यशापर्यंत पोहोचू शकतो हे कृष्ण कुमार यांच्या उदाहरणावरून दिसून येते.