देशात सर्व प्रथम इंटरनेट आणणाऱ्या ‘ह्या’ कंपनीचे वाजपेयींनी केले होते खासगीकरण; आता मोदी सरकार विकणार पूर्ण हिस्सेदारी

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडमधील (पूर्वीचे व्हीएसएनएल) संपूर्ण हिस्सा मोदी सरकार विकणार आहे. 20 मार्च 2021 पूर्वी हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.

सरकारकडे सध्या कंपनीत 26.12 टक्के हिस्सा आहे. 2002 मध्ये तत्कालीन वाजपेयी सरकारने या कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. आता 19 वर्षांनंतर सरकार त्यातील आपला संपूर्ण हिस्सा विकणार आहे. सध्याच्या किंमतीनुसार सरकार त्याद्वारे 8000 कोटी रुपये मिळवू शकते. व्हीएसएनएल 2002 पर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी होती.

या कंपनीची स्थापना 1986 मध्ये झाली आणि देशात इंटरनेट आणण्याचे श्रेय या कंपनीला जाते. ही सेवा 1986 मध्ये रिसर्च कम्युनिटीसाठी सुरू केली गेली आणि 15 ऑगस्ट 1995 रोजी सार्वजनिकपणे व्हीएसएनएलने देशातील पहिली इंटरनेट सेवा सुरू केली.

सध्या देशात 72 कोटीहून अधिक एक्टिव इंटरनेट यूजर्स आहेत. इंटरनेटच्या जगात त्यावेळी व्हीएसएनएलची मनमानी सुरू होती आणि खासगी क्षेत्राला त्यात व्यवसाय करण्याची परवानगी नव्हती.

1439 कोटींमध्ये झाले होते खासगीकरण:-  त्यावेळी इंटरनेट सेवा GIAS म्हणून ओळखली जात असे आणि 9.6 kbit/s स्पीडसाठी कंपनी एका व्यक्तीकडून 250 तासांसाठी 5200 रुपये आकारत असे. कंपनीचे खासगीकरण 2002 मध्ये 1439 कोटींवर झाले होते.

टाटा समूहाची गुंतवणूक करणारी कंपनी पॅनाटोन फिनवेस्ट लिमिटेडने व्हीएसएनएलमध्ये 25 टक्के हिस्सा घेतला. तसेच, त्याला व्यवस्थापन नियंत्रणात स्थानांतरित करण्यात आले. स्ट्रैटिजीक डिस-इन्वेस्टमेंटनंतर ही कंपनी टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडमध्ये बदलली गेली.

 20 मार्च पर्यंत भागभांडवल विक्रीची तयारी :- व्हीएसएनएल (आता टीसीएल) मधील संपूर्ण हिस्सेदारी विक्रीबाबतच्या ताज्या माहितीनुसार, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड (टीसीएल) मधील 26.12 टक्के हिस्सेदारी विक्रीचे व्यवस्थापन करण्यासाठी गोल्डमन सेक्स, जेएम फायनान्शियल आणि अ‍ॅक्सिस कॅपिटलसह 11 व्यापारी बँकर्स स्पर्धेत आहेत.

टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडमधील (पूर्वीचे व्हीएसएनएल) आपला संपूर्ण हिस्सा 20 मार्च 2021 पर्यंत विक्री ऑफर आणि स्ट्रॅटेजिक सेल्सच्या माध्यमातून विकला जाईल.

व्यापारी बँकर्स 9 फेब्रुवारी रोजी निवेश आणि यासंदर्भात सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या (DIPAM) अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण करतील. DIPAM च्या संकेतस्थळावर टाकलेल्या नोटिशीत ही माहिती देण्यात आली आहे.

 2002 मध्ये झाले होते खाजगीकरण :- आयसीआयसीआय सिक्युरिटीज, क्रेडिट सुइस सिक्युरिटीज, आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स, कोटक महिंद्रा कॅपिटल, एसबीआय कॅपिटल मार्केट्स, , IIFL सिक्युरिटीज, येस सिक्युरिटीज आणि इलारा कॅपिटल हे या शर्यतीत सहभागी इतर व्यापारी बँकर्स आहेत. 2002 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील व्हीएसएनएलचे खाजगीकरण करण्यात आले.

कोणाचा किती शेअर ? :- टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेयरहोल्डिंग मध्ये प्रमोटर्सचा 74.99 टक्के हिस्सा आहे, त्यापैकी भारत सरकारचा हिस्सा 26.12 टक्के, पॅनाटोन फिनवेस्टचा 34.80 टक्के, टाटा सन्सचा 14.07 टक्के आणि उर्वरित 25.01 टक्के हिस्सा जनतेकडे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe