अरे वा ! वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणेच आता वंदे मेट्रो देखील सुरु होणार ; रेल्वेमंत्र्यांची घोषणा

Vande Bharat Ticket

Vande Bharat Express : सध्या संपूर्ण भारतात वंदे भारत एक्सप्रेसची मोठी चर्चा रंगत आहे. पूर्णपणे स्वदेशी बनावटीची ही एक्सप्रेस ट्रेन अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. केंद्र शासन या महत्त्वाकांक्षी अशा वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर लवकरच वंदे मेट्रो सेवा देखील संपूर्ण भारतभर विस्तारणार असल्याची माहिती हाती येत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत घोषणा केली आहे.

रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील प्रवाशांचा प्रवास सुलभ करण्यासाठी पीएम मोदी यांच्या विजन अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या वंदे मेट्रो लवकरच संपूर्ण देशात सुरू केल्या जाणार आहेत. वंदे मेट्रो ट्रेन मोठ्या शहरांमध्ये धावणार असल्याचे रेल्वेमंत्री यांनी स्पष्ट केले आहे. या मेट्रोच्या मदतीने कमी वेळात प्रवाशांना प्रवास करता येणे शक्य होणार आहे.

हेही वाचा :- Mumbai-Shirdi Vande Bharat Express : मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठ अपडेट ! आता ‘या’ ठिकाणी पण मिळणार थांबा?

 

या वंदे मेट्रो ट्रेन कमी अंतर असलेल्या शहररांदरम्यान देखील सुरु केल्या जातील असं देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. या वंदे मेट्रो ट्रेनच्या मदतीने प्रवासी कमी वेळात लांबचे अंतर गाठण्यास सक्षम होणार आहेत. निश्चितच यामुळे लोकांना कामाच्या ठिकाणाहून घरी ये-जा करण्यासाठी सोयीचे होणार आहे. विशेष बाब अशी की या वंदे भारत मेट्रो ट्रेनचे यावर्षी डिझाईन आणि उत्पादन पूर्ण होणार आहे.

एवढेच नाही तर पुढील आर्थिक वर्षात ट्रेनच्या उत्पादनाचा रॅम्प अप देखील केला जाणार आहे. विशेष म्हणजे या गाड्या आठ डब्यांच्या राहणार असून मेट्रो ट्रेन प्रमाणेच राहतील असे देखील यावेळी मंत्री महोदय यांनी स्पष्ट केले. निश्चितच वंदे भारत एक्सप्रेस नंतर वंदे भारत मेट्रो देखील आता भारतीय रेल्वेच्या ताफ्यात येणार आहे.

त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक आनंदाची पर्वणीच राहणार आहे. दरम्यान वंदे मेट्रो स्वदेशी बनावटीनेच विकसित होणार असल्याने अल्पावधीतच वंदे मेट्रो देखील वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणेच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

बातमी कामाची ! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस विषयी ए टू झेड माहिती एका क्लिकवर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe