हिवाळ्यात राजस्थान मधील फक्त ‘या’ 2 ठिकाणी जा फिरायला! एकाच ट्रिपमध्ये पहाल अनेक ठिकाणे, कायम अविस्मरणीय राहील ट्रिप

महाराष्ट्रातीलच काही ठिकाणी फिरायला जातील तर काही जण बाहेरील राज्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणाचा पर्यटनाचा आनंद घेण्याचा प्लॅनिंग करत असतील. अगदी याच प्रमाणे तुम्हाला देखील महाराष्ट्र सोडून बाहेर राज्यात दोन ते तीन दिवस फिरायला जायचा प्लॅन बनवायचा असेल तर तुम्ही राजस्थान हा पर्याय निवडू शकतात.

Published on -

Winter Tourist Places In Rajasthan:- हिवाळा ऋतूला सुरुवात झाली असून वातावरणामध्ये काहीसा गारवा जाणवायला लागला आहे. त्यामुळे बरेच जण आता या गुलाबी थंडीत कुठेतरी बाहेर फिरायला जायचा प्लान बनवत असतील.

मग कोणी महाराष्ट्रातीलच काही ठिकाणी फिरायला जातील तर काही जण बाहेरील राज्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणाचा पर्यटनाचा आनंद घेण्याचा प्लॅनिंग करत असतील. अगदी याच प्रमाणे तुम्हाला देखील महाराष्ट्र सोडून बाहेर राज्यात दोन ते तीन दिवस फिरायला जायचा प्लॅन बनवायचा असेल तर तुम्ही राजस्थान हा पर्याय निवडू शकतात.

हिवाळ्यामध्ये राजस्थान फिरायला खूप छान असून या ठिकाणी असलेले राजवाडे तसेच सुंदर किल्ले आणि वाळवंटाचे स्वरूप डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. राजस्थानला राजांची भूमी असे म्हटले जाते व या ठिकाणी तुम्हाला सर्वत्र किल्ले आणि राजवाडे पाहायला मिळतात.

तुम्हाला जर राजस्थानला जायचे असेल तर प्रत्येक शहर सार्वजनिक वाहतुकीने आता जोडले गेल्यामुळे तुम्ही कुठूनही आरामात राजस्थानला पोहोचू शकतात. तसेच त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला वाहतुकीच्या अनेक सोयी सुविधा उपलब्ध होऊन तुम्ही हव्या त्या ठिकाणी कमी वेळेत पोहोचू शकतात.

स्वतःची कार असेल तर मात्र उत्तमच. जर तुम्हाला राजस्थान जायचे असेल तर त्या ठिकाणी फक्त दोन स्थळांना भेट दिली तरी राजस्थानची ट्रिप तुमची कायम स्मरणात राहील.

राजस्थान मधील या दोन ठिकाणांना भेट द्या

अ)- जयपुर- आपल्याला सगळ्यांना जयपूर माहिती असून या जयपूरला पिंक सिटी म्हणजेच गुलाबी शहर असे म्हटले जाते. जयपुरला गेल्यावर तुम्हाला पाहण्यासारखी अनेक ठिकाणी आहेत. तुम्ही जर जयपूरला गेले तर खालील ठिकाणे पाहणे गरजेचे आहे…..

1- हवा महल- हवा महल हे जयपूरचे एक प्रसिद्ध ठिकाण असून हे महाराजा सवाईसिंग यांनी बांधले होते. हा राजवाडा त्याच्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे व या महलमध्ये साधारणपणे 953 खिडक्या आहेत. यामधून तुम्ही आजूबाजूचा निसर्ग सौंदर्य आणि उत्कृष्ट असा नजारा पाहू शकतात.

2- सिटी पॅलेस- जेव्हा तुम्ही हवा महल पाहायला जाल त्याच्या जवळच सिटी पॅलेस देखील आहे. असे म्हटले जाते की सिटी पॅलेस पाहिल्याशिवाय जयपुरची ट्रीप पूर्ण होतच नाही. सिटी पॅलेस हा इतिहासाचा आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट आणि अनोखा नमुना आहे.

3- नाहरगड किल्ला- जयपुर शहरापासून हा किल्ला थोडा दूर आहे. तुम्ही जर नाहरगड किल्ल्यावर गेला तर या ठिकाणी तुम्हाला जयपूर आणि आमेरचे विहंगम असे दृश्य पाहायला मिळते. नहारगड किल्ल्याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी रात्रीच्या वेळेला लाईट एंड साऊंड शो देखील असतो.

4- जयगड किल्ला- जेव्हा तुम्ही नाहरगड किल्ला पाहाल तेव्हा तो पाहून झाल्यानंतर जयगड किल्ला त्याच्या जवळच आहे. जयगड किल्ल्याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी राजांची शस्त्र पाहायला मिळतात व जगातील सर्वात मोठी तोफ देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे.

5- जलमहाल- जल महाल हे मानसागर तलावाच्या अगदी मध्यभागी बसलेले असून हा महाल महाराजा जयसिंग द्वितीय यांनी बांधला होता व हा दूरवरूनच दिसतो.
या ठिकाणांशिवाय तुम्ही जयपुरला गेल्यावर इतर अनेक ठिकाणे पाहू शकतात व तुमची ट्रिप व तुमच्या वेळेनुसार तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकतात.

आ)- पुष्कर- जयपुर बघितल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी पुष्करला जाऊ शकतात. जयपुर पासून साधारणपणे 140 किलोमीटर अंतरावर पुष्कर असून अजमेर देखील तुम्हाला रस्त्यातच लागते. जयपुर वरून पुष्कर जाताना तुम्ही अजमेर मधील प्रसिद्ध दर्गा शरीफ देखील पाहू शकतात. पुष्करला गेल्यावर तुम्ही खालील स्थळे पाहू शकता….

1- ब्रह्मा मंदिर- पुष्कर हे जगातील असे एकमेव ठिकाण आहे की जिथे ब्रह्माचे मंदिर आहे. हे मंदिर हिंदूंसाठी पवित्र मानले जाते. त्यामुळे तुम्ही नक्कीच पुष्करला गेल्यावर ब्रह्मा मंदिरला भेट देणे गरजेचे आहे.

2- पुष्कर तलाव- पुष्करला गेल्यानंतर पुष्कर तलाव हेदेखील पाहण्यासारखे पर्यटन स्थळ असून या तलावाच्या काठावर पुष्कर शहर वसले आहे.
याशिवाय पुष्करला गेल्यावर त्या ठिकाणी एक वाळवंट असून तिथे दरवर्षी हिवाळ्यामध्ये यात्रा भरते व त्यावेळी पुष्करचे सौंदर्य खूपच खुलून दिसते.

पुष्करला गेल्यावर काय खाल?
पुष्करला गेल्यावर फिरून झाल्यानंतर तुम्हाला जर काही खायचे असेल तर तुम्ही पुष्करला अनेक स्थानिक खाद्यपदार्थ खाऊ शकतात. कारण पुष्कर हे ठिकाण स्थानिक खाद्यपदार्थांसाठी खूपच प्रसिद्ध आहे.

उदाहरणच घ्यायचे झाले तर पुष्करला गेल्यानंतर तुम्ही पुष्करच्या मालपुआची चव चाखू शकतात. ही चव तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. याशिवाय त्या ठिकाणी तुम्ही दाल बाटी चुरमा, घेवर आणि फलाफेलही खाऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe