गेल्या कित्येक दिवसापासून आपण बघत आहोत की,अनेक महत्त्वाच्या स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी बजेटमधील म्हणजेच परवडणाऱ्या किमतीतील स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याचा जणू एक धडाकाच लावलेला आहे.
कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त आकर्षक फीचर्स आणि ग्राहकांचा मागणीचा कल ओळखून उत्कृष्ट असे स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलेले आहेत.
त्यामुळे ग्राहकांना देखील आता स्मार्टफोन खरेदी करताना अनेकविध पर्याय निर्माण झालेले आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण विवो या कंपनीच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कंपनीने देखील आता भारतात नवीन स्मार्टफोन विवो टी 3 प्रो 5G स्मार्टफोन लॉन्च केलेला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन असून यामध्ये अनेक आकर्षक अशी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत.
मिळेल आकर्षक डिस्प्ले
विवो कंपनीच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.77 इंचांचा थ्रीडी AMOLED डिस्प्ले दिला आहे व हा 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 नीट्सच्या बिग ब्राईटनेसह येतो.
तसेच या स्मार्टफोनमध्ये 12 जीबी रॅम( वर्चुअल) आणि 256 जीबी स्टोरेज दिले असून यामध्ये अँड्रॉइड 14 आधारित फनटच ओएस 14 आहे. तसेच या फोनमध्ये इन डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
कसा आहे कॅमेरा?
विवोच्या या स्मार्टफोनमध्ये दोन रियर कॅमेरे देण्यात आलेले असून भारतातील पहिला प्रायमरी कॅमेरा सोनी IMX882 सेन्सरसह 50 मेगापिक्सलचा असून दुसरा कॅमेरा आठ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर आहे. तसेच या फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन म्हणजेच ओआयएस देखील प्रायमरी कॅमेऱ्याच्या सपोर्टसह आहे.
उत्तम व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फी करीता यामध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला असून या फोनमध्ये बॅटरी 5500mAh आहे आणि 80W वायर्ड फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.
भारतात किती आहे या स्मार्टफोनची किंमत?
विवोचा हा फोन भारतामध्ये सॅन्डस्टोन ऑरेंज आणि एमराल्ड ग्रीन या दोन उत्तम रंगांच्या पर्यायामध्ये सादर करण्यात आला असून तो दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे.
त्यातील पहिला आठ जीबी+ 128 जीबी स्टोरेज प्रकारातील असून त्याची किंमत 24999 रुपये तर आठ जीबी+ 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 26 हजार 999 रुपये इतकी असून ग्राहकांना हा फोन तीन सप्टेंबर पासून खरेदी करता येणार आहे.