भारतामध्ये दरवर्षी सर्पदंशाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते व याचे प्रमाण प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते. काही हजारो किंवा लाखो लोकांना दरवर्षी सर्पदंशाने जीव गमवावा लागतो. जास्त करून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटना जास्त प्रमाणात दिसून येतात.
सापांविषयी जर आपण माहिती घेतली तर सापांच्या जेवढ्या प्रजाती आहेत त्यापैकी खूप बोटावर मोजण्या इतक्या प्रजाती या विषारी आहेत. परंतु माणसाच्या मनामध्ये सापाच्या बद्दल इतकी भीती असते की जर सर्पदंश झाला तर भीतीनेच माणूस मरतो. जर आपण एक नियम पाहिला तर कुठलीही गोष्ट घडण्यासाठी काहीतरी कारण असते व त्याशिवाय गोष्ट घडत नाही.

अगदी हीच बाब सर्पदंशाला देखील कारणीभूत आहे. काही कारण असल्याशिवाय साप माणसाला चावूच शकत नाही हे देखील महत्त्वाचे आहे. यामध्ये जर साप विषारी राहिला तर त्याच्या एका थेंबाने देखील माणूस मृत्यूमुखी पडू शकतो. साधारणपणे साप चावल्यानंतर हात पायांना कंपन सुटणे किंवा ऐकायला त्रास होणे, डोळ्यांना कमी दिसायला लागणे इत्यादी प्राथमिक लक्षणे दिसायला लागतात. या सगळ्या दृष्टिकोनातून आपण या लेखात साप कोणत्या कारणांमुळे व्यक्तीला चावू शकतो? याबद्दलची माहिती घेऊ.
या कारणांमुळे प्रामुख्याने व्यक्तीला साप चावतो
1- यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नजर चुकीने जर आपल्याकडून सापाच्या पिलांना त्रास दिला गेला किंवा काही अनावश्यक गोष्ट घडली तर पिल्लांच्या रक्षणासाठी साप चावा घेऊ शकतो.
2- कुठलाही प्राणी किंवा व्यक्ती भित्रा असला तरी जीवावर आली तर तो स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करतो. अगदी हीच बाब सापाला देखील लागू होते. साप जरी माणसांना घाबरणारा प्राणी असला तरी जीवाला धोका आहे हे जर त्याला लक्षात आले तर तो स्वतःचा बचाव करण्यासाठी चावा घेऊ शकतो. बऱ्याचदा नाग आणि नागिणीच्या प्रणय प्रसंगा वेळी जर कोणी व्यतेय आणला तर साप चावा घेऊ शकतो. त्यामुळे जर असा प्रणय चा प्रसंग असेल तर सापां पासून दूर राहणे फायद्याचे ठरते.
3- काही गोष्टींमुळे जर साप चवताळला किंवा पिसाळला तर कुठलेही कारण नसताना देखील तो व्यक्तीला चावू शकतो.
4- एखाद्या वेळेस साप भुकेला असेल तर कारण नसताना देखील तो दंश करू शकतो.
5- चुकून जर सापावर पाय पडला तर सर्पदंशाची शक्यता अनेक पटीने वाढते.
6- बऱ्याचदा विनाकारण सापाला त्रास दिला जातो किंवा छेडले जाते. अशावेळी देखील साप चावण्याची शक्यता काही पटीने वाढते.
दुर्दैवाने सर्पदंश झाला तर तातडीने हे उपाय करावेत
एखाद्या प्रसंगांमध्ये जर सापाने चावा घेतला तर तातडीने चावलेल्या जागेवर रुमाल किंवा कापडाने आवळुन बांधावे. त्यामुळे सापाचे विष शरीरात वेगात पसरत नाही. कुठलेही रिकामे उद्योग किंवा रिकामे उपचार न करता जितके लवकरात लवकर दवाखान्यात पोहोचता येईल त्यासंबंधी प्रयत्न करावा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर सापाने चावा घेतला तर घाबरून जाऊ नये. कारण घाबरल्यामुळे शरीरातील प्रतिकारक शक्ती कमी व्हायला लागते व मृत्यू ओढावू शकतो.