LIC Children Plan:- जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीला पैसे लागत असतात व सगळ्यात जास्त जर आपल्या जीवनातील पैशांच्या दृष्टिकोनातून खर्च पाहिला तर तो मुलांचे शिक्षण आणि त्यांचे लग्नकार्य इत्यादी गोष्टींवर होत असतो. त्यामुळे आजकालचे पालक मुलांचा जन्म झाल्यानंतरच त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक तजवीज करायला सुरुवात करतात.
मुलांचे शिक्षण असो किंवा त्यांना व्यवसाय उभारायचा असतो तेव्हा त्याकरिता पैसा मोठ्या प्रमाणावर लागतो व त्याकरिता आजपासूनच मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक केलेली ही फायद्याची ठरते.
या दृष्टिकोनातून बघितले तर अनेक गुंतवणुकीचे पर्याय सध्या उपलब्ध आहेत व त्यामध्ये एलआयसी हा एक विश्वासहार्य गुंतवणूक पर्याय आहे व एलआयसीकडे असे अनेक प्लान्स आहेत जे मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकतात.
त्यातीलच एक म्हणजे एलआयसीची चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन ही एक योजना आहे. मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ही गुंतवणूक योजना खूप महत्त्वाचे आहे. याच योजने विषयाची माहिती या लेखात घेऊ.
काय आहे एलआयसीच्या चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅनचे स्वरूप?
एलआयसीच्या माध्यमातून ही विमा पॉलिसी फक्त लहान मुलांकरिता सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये वय वर्ष शून्य ते बारा वर्षे वय असलेल्या मुलांच्या नावाने पालक या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकतात व यामध्ये या पॉलिसीचा प्रीमियम तुम्ही मासिक, त्रेमासिक, सहामाही आधारावर भरू शकतात.
या पॉलिसीमध्ये तुम्ही वर्षाला किमान 50 हजार ते कमाल 55 हजार रुपये गुंतवण गरजेचे आहे. यामध्ये मुलाचे वय किती आहे यानुसार विम्याची रक्कम ठरत असते.
परंतु सर्वसाधारणपणे दरवर्षी भरायची रक्कम पाहिली तर ती 44 हजार 616 रुपये इतकी येते. यानुसार जेव्हा मुलाचे वय पंचवीस वर्षे होते तेव्हा त्याला मॅच्युरिटी रक्कम व बोनस रक्कम इत्यादी सह जवळपास 19 लाख रुपयांचा फायदा मिळतो.
काय आहे या प्लानचा मॅच्युरिटी कालावधी?
या पॉलिसीचा मॅच्युरिटी कालावधी हा पंचवीस वर्षाचा आहे. म्हणजेच जेव्हा तुमचे मूल पंचवीस वर्षांचे होईल तेव्हा संपूर्ण रक्कम परताव्यासह तुम्हाला परत मिळते. तसेच या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विमाधारक अठरा वर्ष, वीस आणि बावीस वर्षाचा झाल्यानंतर मूळ विमा रकमेच्या 20% रक्कम बोनस स्वरूपात त्याला मिळत असते.
तसेच मुलाचे वय पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर मॅच्युरिटी रक्कम, बोनस सोबत 19 लाख रुपये विमाधारकाला मिळतात व त्यामुळे या पैशात मुलाचे भविष्य सुरक्षित करता येते.
एलआयसीच्या या प्लानमध्ये हे फायदे देखील मिळतात
या व्यतिरिक्त एलआयसीच्या चिल्ड्रन मनी बॅक पॉलिसी प्लानमध्ये अनेक फायदे मिळतात व यामध्ये या पॉलिसीचा लॉक इन कालावधी दोन वर्ष आहे. जेव्हा पॉलिसीला तीन वर्षे पूर्ण होतात तेव्हा विमाधारकाला यावर कर्जाची सुविधा देखील मिळते.
तसेच विमाधारकाचा कोणत्याही कारणामुळे जर मृत्यू झाला तर कुटुंबातील सदस्यांना विम्याची रक्कम व bona रक्कम मिळते. समजा तुम्ही पॉलिसी खरेदी केली व या पॉलिसीचे काही नियम व अटी तुम्हाला मान्य नसतील तर तुम्ही पॉलिसी खरेदी केल्याच्या पंधरा दिवसाच्या आत ती रद्द देखील करू शकतात.