ग्रामीण भागात सुरु करू शकता ‘हा’ युनिक व्यवसाय ; कमी भांडवलात होइल जास्त कमाई

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- ग्रामीण भागात बांबूचा वापर शक्यतो भाजीपाला, बागायती वनस्पतींना आधार देण्यासाठी केला जातो. याशिवाय बांबूचा उपयोग अनेक प्रकारे केला जातो.

त्याचबरोबर बांबूने बनवलेल्या क्रॉकरी, कप प्लेट, बाटली, चमचा, प्लेट, यासह अनेक उत्पादनांना प्रचंड मागणी आहे. लोकांना ते विकत घ्यायला देखील आवडते कारण ते दिसण्यात खूपच आकर्षक असते. बांबूची विविध उत्पादने कशी बनवायची याचा व्यवसाय कसा करावा ते जाणून घ्या-

प्रशिक्षण कुठे घ्यावे :- बांबूची उत्पादने तयार करुन शेतकरी जादा उत्पन्न मिळवू शकतात. बांबूची उत्पादने बनवण्याचे एक युनिट अगदी खेड्यातही सहज स्थापित केले जाऊ शकते. त्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोगदेखील आपल्या वतीने पुढाकार घेत आहे.

आयोगाने स्वतःची बांबूची उत्पादनेदेखील सादर केली आहेत. त्याचबरोबर बांबू मिशन अंतर्गत आयोग लोकांना बांबूच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देत आहे. त्याचबरोबर ज्यांना कर्ज घेऊन बांबूची उत्पादने बनवण्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे,

अशा लोकांना कर्ज मिळवून देण्यासही आयोग मदत करत आहे. अधिक माहितीसाठी आपण खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वेबसाइट www.kvic.gov.in/kvicres/index.php वर भेट देऊ शकता.

 बांबूच्या बाटलीची मागणी :- बांबूच्या बाटल्यांना बाजारात आज चांगली मागणी आहे. 750 एमएलची बाटली सुमारे तीनशे रुपयांना विकली जाते. तुम्हालाही बांबूच्या उत्पादनांचे प्रशिक्षण घ्यायचे असेल तर कृपया राष्ट्रीय बांबू मिशनची वेबसाईट www.nbm.nic.in पहा.

किती रुपयांत व्यवसाय सुरू होईल ?:-  बांबूपासून अनेक प्रकारची उत्पादने तयार केली जातात. अशा परिस्थितीत त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वेगवेगळे खर्च करावे लागतात. जर तुम्हाला बांबूचे दागिने बनवण्याचे युनिट सुरू करायचे असतील तर यासाठी सुमारे 15 लाख रुपये खर्च येतो. आपण apps.mpforest.gov.in/MPSBM/ वर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.

बांबूची इतर उत्पादने साधारणत:- तुम्ही बांबूपासून बनवलेल्या काठ्या , फर्निचर, आणि टोपल्या पाहिल्या असतील, पण आता दागदागिने, पाण्याच्या बाटल्या, हस्तकलेच्या वस्तू आणि लॅम्प सेट तयार करण्यासाठी बांबूचा वापर केला जातो. लोकांना बांबूपासून बनवलेल्या लॅम्प सेट आवडतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe