लायकी नव्हती, तरी उद्धव साहेबांनी पाठीवर थाप मारली; शिवसेनेची धैर्यशील मानेंवर टीका

कोल्हापूर : बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर कॉलनीमधील निवासस्थानावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्चा धडकणार आहे. मोर्चाला प्रारंभ होण्यापूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी धैर्यशील माने यांच्यावर कडाडून हल्ला चढवला, बाळासाहेब माने यांचे नातू असाल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हानच त्यांनी … Read more

हे सरकार बाळासाहेबांच्या आशिर्वादामुळेच; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला मुख्यमंत्र्यांच्या सडेतोड उत्तर

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष संघटनेतील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत कागदोपत्री सिद्ध करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. यावरुन ठाकरे गटाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना, ‘वडील आणि पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे तर दरोडेखोर’ असा टोला लगावला … Read more

निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना म्हणाले, मला पुष्पगुच्छ नको पण…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष न्यायालयानंतर आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्यानंतर शिवसेना पक्ष संघटनेवरील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत सिद्ध करा, असे निर्देश निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्देशानंतर … Read more