तुमच्यामुळे भविष्यात वारकऱ्यांना चंद्रभागेत स्नान करणे देखील होईल मुश्कील : शेतकऱ्यांनी ‘त्या’ कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोडला घाम

अहिल्यानगर : भीमा नदीच्या काठी भागायत भागातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करुन सुमारे ४९ गावांना बाधीत असणाऱ्या डालमिया भारत ग्रीन व्हिजन लिमिटेड या सिमेंट कंपनी विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हरकती नोंदविताना शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घाम फोडला. यावेळी शेतकऱ्यांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांना देता न आल्याने कंपनीचे अधिकारी व प्रशासकिय अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील निमगावखलू येथे डालमिया … Read more

अहिल्यानगर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसात गुन्हा दाखल !

Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नुकताच पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आलेत. … Read more

Ahilyanagar News : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल शनिचरणी ! म्हणाले, शनिशिंगणापुरात येऊन…

सोमवार दि. 28 रोजी सकाळी अकरा वाजता शनिशिंगणापूर येथे मल्याळम चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल विश्वनाथन यांनी पत्नी सुचित्रा यांच्यासह सहकुटुंब शनि दर्शन घेतले. केरळच्या मल्याळम चित्रपट सृष्टी मध्ये कार्यरत असलेले अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक मोहनलाल विश्वनाथ यांनी दोनशेच्यावर मल्याळम चित्रपटात काम केले आहे. मोहनलाल हे दाक्षिणात्य मल्याळम चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानलेले जातात. सुमारे … Read more

Ahilyanagar News : कुंभमेळ्यासाठी शनिशिंगणापूर देवस्थान रेडी ! कुंभमेळ्यासाठी 18 कोटींचा विकास आराखडा, प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर

त्रंबकेश्वर कुंभेळ्यानिमित्ताने श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. शनिशिंगणापूर देवस्थान न्यासाकडे भाविकांसाठी असलेल्या मुलभूत सुविधा अपुऱ्या पडणार आहेत. त्यामुळे मुलभूत सुविधा शासनामार्फत निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी सरकार मार्फत कामासाठी 18 कोटी 57 लाख रुपये खर्चाचा विकास आराखडा प्रस्ताव शनिशिंगणापूर देवस्थान समितीने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे सादर केला आहे. … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर मध्ये भाविकांना मिळणार उसाचा रस, ४० टन उसाचे होणार गाळप

Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र चिचोंडी शिराळ येथे जैन धर्माचार्य राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये अक्षय्यतृतीयेच्या दिवशी राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या सुमारे ४०० तपस्वी साधकांच्या तपाचे पारणे विविध साधू-साध्वींच्या उपस्थितीत संपन्न होणार असून, उसाचा रस घेत उपवासाची सांगता होणार आहे, या वेळी आलेल्या भाविकांना उसाचा रस दिला जाणार असून, यासाठी जिल्ह्यातून सुमारे ४० टन … Read more

वीज सलग ९ तास खंडित, महावितरणकडून देखभाल व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

Ahilyanagar News : शनिवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा ३३ के.व्ही. लाईनच्या शिगवे, एकरूखे व पुणतांबा येथे मेंटेनन्स कामासाठी सलग ९ तास खंडित करण्यात आला होता. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे वीज खंडित झाल्याने घरातील व बाहेर काम करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहे. महावितरणकडून वीजपुरवठा शनिवारी खंडित होणार असल्याची पूर्वसूचना शुक्रवारी सर्व व्हॉट्सअॅप ग्रुपवर महावितरण … Read more

उन्हाच्या चटक्याने लिंबू सरबताची गोडी महागली ! फळांच्या उत्पादनावर परिणाम

Ahilyanagar News : सध्या उन्हाची काहिली वाढत असल्याने या उन्हाच्या कडाक्यातून शरीराला थंडावा देणाऱ्या कलिंगड, लिंबू, ऊस आणि काकडीला मागणी वाढत आहे. परंतु यंदा वातावरणाचा या फळांच्या उत्पादनावर देखील विपरीत परिणाम झाला असून दर्जाही खालावला आहे. फळांचे भाव वाढल्याने या फळांचे भाव पाहून सर्वांना घाम फुटला आहे तर स्थानिक कलिंगडाचा गोडवा कमी झाला आहे. निसर्गाची … Read more

पैसे भरूनही सोलर कृषिपंप मिळेनात, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष

Ahilyanagar News : शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या मागेल त्याला सौर कृषीपंप योजना अत्यंत संत गतीने राबवली जात आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरून दोन महिने उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना सौर कृषिपंप उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. यामध्ये वीज वितरण कंपनीकडून … Read more

खुशखबर ! ‘मुळा’तील गाळ काढणार, ३ टीएमसी अतिरिक्त पाणी वाढणार; उजव्या कालव्याच्या नूतनीकरणाचेही काम सुरु

महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील जुन्या असलेल्या कालव्यांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मुळा धरणातील गाळ काढण्याच्या कामास … Read more

तक्रारींबाबत प्रक्रिया पूर्ण, लवकरच शनि देवस्थानचे प्रशासन बरखास्त होणार ! महसूल मंत्री बावनकुळेंची महत्वाची माहिती..

शनिवारी (दि. २६) रात्री दहा वाजता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे सहकुटुंब दर्शनासाठी आले होते. कन्या पायल बावनकुळे यांचा वाढदिवस असल्याने शनिशिंगणापूरला शनी देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी सहकुटुंब आलो असल्याचे बावनकुळे म्हणाले. 33 वर्षापासून शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येत असल्याचे ते म्हणाले. तसेच देवस्थानच्या कारभाराविषयी आलेल्या तक्रारींबाबत सर्व बाबी पूर्ण झाल्याने देवस्थानचे … Read more

 Ahilyanagar news : जिल्ह्यातील जुन्या कालव्यांच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar news :अहिल्यानगर, दि.२७ – महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील जुन्या असलेल्या कालव्यांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. … Read more

सापांचा प्रणयकाल सुरू, शेतकऱ्यांनी कसे राहावे सुरक्षित ? वाचा महत्वाच्या टिप्स

Ahilyanagar News : एप्रिल ते मे या कालावधीत सर्व सर्पजातींचा मिलन व वंशवाढीचा प्रणयकाल सुरू असून, अनेक ठिकाणी उघड्यावर एकत्रित दिसणारे जुळे सर्प सहज नजरेस पडत आहेत. त्यामुळे त्यांना न मारण्याचे व त्यांच्या हालचालींविषयी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सर्पमित्र संतोष बोरुडे यांनी केले आहे. सर्पाच्या या नैसर्गिक प्रक्रियेबाबत माहिती देताना बोरुडे यांनी सांगितले की, साप हे … Read more

कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांसाठी दिलासा : आ. रोहित पवार यांच्या पुढाकाराने सीना कालव्याचे आवर्तन सुरू होणार

Ahilyanagar News : कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात वेळेवर आणि भरपूर पाणी मिळावे यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. पुण्यातील सिंचन भवन येथे आयोजित झालेल्या बैठकीत त्यांनी सिंचन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सीना व कुकडी कालव्यांच्या आवर्तनासंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या रविवार, २७ एप्रिलपासून सीना … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पशुहत्या होणाऱ्या यात्रेत ऐतिहासिक निर्णय ! यंदा पशुहत्येवर संपूर्ण बंदी

Ahilyanagar News : सर्पदंश, विचू दंश झाल्यास ज्या देवापुढे साकडे घातले जाते, असे पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी गावचे ग्रामदैवत सालसिद्ध बाबा तीन दिवस यात्रोत्सव आहे. पाथर्डी तालुक्यातील मढी नंतर सर्वांत मोठी यात्रा म्हणून या यात्रेकडे बघितले जाते. भगवानगडाचे महंत डॉ नामदेव शास्त्री यांच्या हस्ते मूर्तीला जलाभिषेक करून यात्रेला प्रारंभ होणार आहे. दरम्यान सर्वाधिक पशुहत्या होणाऱ्या यात्रेमध्ये … Read more

अहिल्यानगर : चौंडीतील ऐतिहासिक बैठक रद्द ! मुंबईकडे वळले सरकार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता मुंबईतच होणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या बैठकीचे आयोजन 31 मे रोजी नियोजित होते. या निर्णयामुळे अहिल्यादेवींच्या जन्मस्थानावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमाला बदल करावा लागला आहे. चौंडी येथे होणाऱ्या … Read more

काश्मीरमधील पर्यटकांना खा. लंके यांचा मदतीचा हात सर्वतोपरी मदतीची ग्वाही

काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील २५ ते ३० पर्यटकांशी संपर्क करून त्यांना परतण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही खा. नीलेश लंके यांनी दिली. नगरसेवक योगीराज गाडे यांच्यामार्फत या पर्यटकांनी खा. लंके यांच्याशी संपर्क केला. खा. लंके यांनी सर्व पर्यटकांची आस्थेने चौकशी करून आपण त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांना ठार मारल्यानंतर तेथील … Read more

मुर्दाबाद.. मुर्दाबाद.. पाकिस्तान मुर्दाबाद… घोषणाबाजी करत पाकिस्तानचा झेंडा शिवसेना ठाकरे पक्षाने जाळला ;

जम्मू कश्मीरच्या पहेलगाम मध्ये निष्पाप भारतीय हिंदू पर्यटकांवर भ्याड हल्ला करत मृत्यू तांडव घडवून आणणाऱ्या अतिरेक्यांचे, पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर्स अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करत जाळण्यात आले. मुर्दाबाद.. मुर्दाबाद.. पाकिस्तान मुर्दाबाद… अशी जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी दिल्ली गेट परिसर दणाणून सोडला. हा हल्ला पाकिस्तानचच षडयंत्र आहे. केंद्र सरकारने करारा जवाब देत पाकड्यांची … Read more

Ahilyanagar News : कोतकर कुटूंबानी केले मांजरीच्या पिल्लांचे पाचवी पूजन ; अन दिले गावाला पुरणपोळीचे जेवण!

अहिल्यानगर : यांत्रिक व धावपळीच्या युगात एकीकडे माणूस माणुसकी विसरल्याचे अनेक उदाहरणे आपण पाहतो ऐकतो आहोत. मात्र दुसरीकडे काहीजण आजही आपली संस्कृतीत टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याकडे जुन्या रूढी, परंपरानुसार बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी पाचवी पूजनाची प्रथा आजही टिकून आहे. या दिवशी सटवाई देवी बाळाला आशीर्वाद देऊन त्याच्या नव्या आयुष्याची सुरवात करते. त्याला उदंड … Read more