अहमदनगर ब्रेकिंग : चौकातून युवकाचे अपहरण; कोयत्याने मारहाण

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : प्रोफेसर चौकात मैत्रिणीबरोबर कॅफेतून बाहेर आल्यावर अज्ञात चौघांनी युवकाचे अपहरण करून त्याला कल्याण महामार्गावर नेऊन दांडक्याने व कोयत्याने मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. सलमान फारुक शेख (वय २२, रा. सर्जेपुरा) असे जखमीचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तींविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान हा तिच्या मैत्रिणीबरोबर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मंगळसूत्र चोरणारी सराईत टोळी पकडली

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : बस स्टॅण्ड, यात्रा, सभेचे ठिकाण, धार्मिक कार्यक्रम, अशा गर्दीच्या ठिकाणी मंगळसूत्र चोरी करणारी महिलांची सराईत टोळी जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सात महिला व दोन पुरूष आरोपींना गजाआड करून त्यांच्याकडून २० तोळे सोन्यासह सुमारे १७ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : पेटवून दिलेला अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह तालुक्यातील पठार भागातील रणखांब गावामध्ये काल शनिवारी (दि.१६) दुपारी आढळला आहे. संगमनेर तालुक्यातील रणखांब गावामध्ये बाळासाहेब दिघे यांच्या शेतालगत वनविभागाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह अर्धवट जळालेला आढळला. या मृतदेहाच्या अंगावर कपडे नव्हते. डोक्याचे केस अर्धवट जळालेले होते. चेहरा, छाती आणि कमरेवर भाजून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनेक ठिकाणी फॅक्चर, लिव्हरला जखम.. रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Ahmadnagar Breaking : रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची फिर्याद दाखल झाली होती. १ ऑगस्ट रोजी विशाल नागनाथ धेंडे (३५, रा. केडगाव, नगर) या तरुणाचा मृतदेह रेल्वे स्थानकाजवळ रुळाच्या कडेला आढळला होता. त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी फॅक्चर, लिव्हरला जखम होती. त्याचा मृत्यू रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबासह रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला होता. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या २४ तासात जेरबंद !

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : एमआयडीसी परिसरात गुरुवारी (दि.७) सकाळी उघडकीस आलेल्या परप्रांतीय कामगाराच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या चोवीस तासांत यश आले असून, खून करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी तपोवन रोडवर पाठलाग करुन पकडले आहे. विश्वास नामदेव गायकवाड (वय २४, रा. श्रीस्टाईल चौक, एमआयडीसी), अक्षय उर्फ शंभो प्रकाश सकट (वय २३, रा. पिंपळगाव कौडा ता.नगर), … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एमआयडीसीत एकाच खून ! हत्याराने वार आणि…

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : अहमदनगरच्या एमआयडीसी परिसरात परप्रांतीय कामगाराच्या डोक्यात कोणत्या तरी हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि.७) सकाळी उघडकीस आली आहे. ओमप्रकाश रामबच्चन महतो (वय ३५, रा. शिवालय कंपनी, दत्त मंदिरासमोर, एमआयडीसी, मूळ रा. बिहार) असे या मयत कामगाराचे नाव आहे.खुनाची ही घटना एमआयडीसी परिसरात असलेल्या प्लॉट नं एफ ७१ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सावकारीबाबत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : अवैध सावकारीबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे आलेल्या तक्रारीची चौकशी होऊन दोन सावकारांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकार अधिकारी शेख अल्ताफ अब्दुलकादर (वय ४१ रा. आलमगीर, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. सचिन आदिनाथ ताठे (रा. ताठे मळा, बालिकाश्रम रस्ता, सावेडी) व दत्तात्रय मच्छिंद्र कजवे (रा. बाभुळगाव, ता. राहुरी) अशी गुन्हा दाखल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहमदनगरमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नगर उत्तर (नगर विधानसभा) मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे (शिर्डी लोकसभा), शिर्डी लोकसभा प्रचारप्रमुख सुहास वहाडणे (कोपरगाव, राहाता, संगमनेर, अकोले), राजेंद्र पठारे (श्रीगोंदा, नेवासा, राहुरी); सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यावरून हार्वेस्टरच्या डिपरचे चाक गेल्यामुळे जागीच मृत्यू

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : शेतात ऊस तोडणी यंत्राच्या मागे उसाची टिपरे गोळा करणाऱ्या महिलेच्या डोक्यावरून हार्वेस्टर डिपरचे चाक गेल्याने मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव- हरेगाव रस्त्यावरील शेती महामंडळाच्या शेतात घडली. श्रीरामपूर तालुक्यातील महाजनवाडी येथील शकुंतला दादा सोनवणे (वय ६२) या शेती महामंडळातील कराराने दिलेल्या शेतात हार्वेस्टर सुरू असताना पडलेली उसाची टिपरे गोळा करून ट्रॉलीमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दिंडीतील चार वारकऱ्यांना ट्रकने चिरडले

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या भाविकांच्या पायी दिंडीत भरधाव वेगाने जाणारा ट्रक शिरला. यात ट्रकने चिरडल्याने ४ वारकरी जागीच ठार तर ८ जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल रविवारी (दि. ३) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील घारगावपासून जवळ असलेल्या नांदूर खंदरमाळजवळील सातवा मैल परिसरात घडली. मयत कोपरगाव व राहाता तालुक्यातील आहेत. शिर्डी येथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जमिनीच्या वादातून सरपंचाच्या मुलावर प्राणघातक हल्ला

Ahmednagar breaking

Ahmadnagar Breaking : जमिनीच्या वादातून तालुक्यातील आदर्शगाव वडुले ग्रामपंचायतीचे सरपंच दिनकर गर्जे यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि. ३०) घडली. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रल्हाद दिनकर गर्ने (रा. वडले. ता. नेवासा) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे. वडील दिनकर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मुलीची गळफास घेवून आत्महत्या

Ahmednagar Breaking

Ahmadnagar Breaking : एका सोळा वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरात फॅनच्या हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२८) रात्री ११.३० च्या सुमारास नगर तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली. या मुलीचे कुटुंबीय मंगळवारी रात्री झोपल्यानंतर तिने रात्री ११.३० च्या सुमारास घरातील छ्ताला असलेल्या फॅनच्या हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब तिच्या वडिलांच्या निदर्शनास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी !

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : नवनागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशन संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केटची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या (शरद पवार गट) त्या पदाधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी असोसिएशनच्या अध्यक्षा तथा भाजप महिला आघाडी अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा शारदा अंतोन गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. नगर-मनमाड रोड, नवनागापूर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर तो मुक्त संचार करणारा बिबट्या जेरबंद !

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी परिसरात अनेक दिवसांपासून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून, Ahmadnagar Breakingएक मादी व तिची दोन पिल्ले या परिसरता फिरत असल्याचा संशय परिसरातील गावाकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यातील वडळी परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या अनेक तक्रारी वन विभागाकडे येत, बिबट्याला जेरबंद करण्याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लाच घेणाऱ्या जिल्हापरिषेच्या लिपिकाला अटक

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : जिल्हा परिषदेतील सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभागातील कनिष्ठ सहाय्यक असलेले लिपिक संतोष जाधव यास २२ हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने शुक्रवारी (दि.१) ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती. या संदर्भात अॅन्टी करप्शनच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तक्रार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भक्तांना मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : राहुरी तालुक्यातील कनगर येथील कनकावती देवीच्या यात्रेनिमित्त गंगाजल आणण्यासाठी गेलेल्या कावड नेणाऱ्या भक्तांना शहरातील सिंधी मंदिरासमोर मारहाण झाल्याने राहुरी तालुक्यातून संताप व्यक्त होत आहे. अशा प्रवृत्तींवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी तालुक्यातील कनगर येथील कनकावती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कापूस चोरणारी टोळी २४ तासांत जेरबंद

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : सध्या कापसाचा हंगाम चालू आहे. त्याचबरोबर राहुरी तालुक्यात कापूस चोरीच्या घटनेत वाढ झाली. राहुरी पोलिसांनी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात कापूस खरेदी केंद्रातील कापूस चोरी करणारी सहा जणांची टोळी अवघ्या २४ तासांच्या आत गजाआड केली; मात्र चारजण पळून जाण्यात यशस्वी झाले. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अतुल नानासाहेब … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अघोरी उपाय करण्यास नकार देणाऱ्या सुनेचा पती, सासू आणि नणंदेकडून छळ

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : जादूटोणा करणाऱ्या महिलेने सांगितलेले उतारे टाकण्यास, सरबत पिण्यास नकार देणाऱ्या सुनेस मारहाण करणाऱ्या, मानसिक त्रास देणाऱ्या पती, सासू, नणंदेसह एका महिलेच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पीडित सून शुभांगी साईनाथ औटी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सासू सुवर्णा विलास औटी यांचा दम्याचा आजार … Read more