महा’शिव’आघाडी बद्दल खा. सुजय विखे म्हणतात…

अहमदनगर : ”शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाशिवआघाडी करून सत्तास्थापन करत आहेत. मात्र युतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेचा फॉर्म्युला ठरवून दिला आहे. तो शिवसेनेने आठवायला पाहिजे. त्यानुसार ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, असे युती असताना दिलेला हा फॉर्म्युला आहे. तो शिवसेनेने जपला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. खा. डॉ. सुजय … Read more

भिशीच्या नावाखाली ५३ लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघावर गुन्हा

अहमदनगर :- भिशीच्या नावाखाली तब्बल ५३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मॅक्सस्वेअर क्युरिज इंडिया प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चंद्रकांत आनंदा गवळी (५०, वाकोडीफाटा, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन कारभारी साळुंके (प्रेमदान चौक) व युवराज सोपान रणसिंगे … Read more

नगर शहरातून २८८ जण हद्दपार, ५७ जण अटी, शर्तीत; उल्लंघन केल्यास कारवाई

अहमदनगर : अयोध्या निकाल, ईद आणि गुरुनानक जयंतीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने नगर प्रांताधिकारी तथा नगर उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी तब्बल २८८ जणांना हद्दपार केले आहे.  याचबरोबर ५७ जणांना अटी, शर्ती लादून शहरात वास्तव्याची मुभा दिली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ (२) अन्वये श्रीनिवास यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करीत हे … Read more

जे प्रेम दिले त्याबद्दल मी ऋणी राहील : आ. जगताप

नगर – कुंदनलाल गुरुद्वारा या ठिकाणी भाविकांनी जे प्रेम दिले त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील, तसेच या ठिकाणाच्या कामासाठी भविष्यात भरीव मदत उभी करून देऊन सदरच्या परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकणासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार संग्राम जगताप यांनी दिली. आमदार जगताप हे विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांनी येथील कुंदनलाल गुरुद्वारा या ठिकाणी भेट … Read more

मनापा कर्मचार्‍यांना अखेर कामवाटप

नगर : नगररचना विभागात महापालिकेने महिनाभरापूर्वी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना अखेर कामकाजाचे वाटप करण्यात आले आहे. महिनाभर हे कर्मचारी बदलीच्या ठिकाणी केवळ बसून होते. आयुक्तांनी ही बाब गांभीर्याने घेतल्यानंतर कामकाज वाटपास वेग आला. यामुळे येथील कामाला वेग येण्याची शक्यता आहे. नगररचना विभागात गेल्या अनेक वर्षांपासून काही कर्मचारी तळ ठोकून बसले होते. काही कर्मचारी तीस तर काही … Read more

सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल, मतदारांइतकाच शहरवासीयांचा ऋणी : लंके

नगर – नगर शहरातील पारनेर तालुक्यातील रहिवाशांच्या वतीने पारनेरचे आमदार लंके यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी नवनिर्वाचित आ. निलेश लंके म्हणाले, नगर शहरातील पारनेर तालुक्यातील रहिवाशांचे माझ्या विजयात मोलाचे योगदान आहे. शहरातील प्रत्येक रहिवाशांनी पारनेर तालुक्यात आपले नाते, आप्तेष्ट व कुटुंबाच्या माध्यमातून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यास विजयी केले. मी पारनेर तालुक्यातील मतदारांइतकाच शहरवासीयांचा ऋणी आहे,असे … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्या पूर्वी नगर मनपावर प्रशासक नेमावा – किरण काळे

नगर : शहरातील खड्ड्यांमध्ये हरवलेले रस्ते, जागोजागी साचलेला कचरा आणि आरोग्य या तीन विषयांमुळे सध्या नगरकर नागरिक हैराण झालेले आहेत. महानगरपालिकेतील नेते आणि अधिकारी यांनी पाऊस थांबला की लागलीच कामाला सुरुवात करू अशा वल्गना केल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष कामे सुरु केली नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी राजकीय अस्थिरता मुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यापूर्वी नगर … Read more

दोन गटात हाणामारी; १८ जणाविरूध्द गुन्हा दाखल

नगर – सावेडीत दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील १८ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तिघे जखमी झाले आहेत. लाकडी दांडके, लोखंडी रॉड, दगड , विटाने हाणामारी करण्यात आली. याप्रकरणी विरेन मधूकर भिंगारदिवे, आकाश शालूमन जाधव, मधूकर दयानंद भिंगारदिवे, विलास दयानंद भिंगारदिवे, पदमा विलास भिंगारदिवे, कलावती … Read more

दारुड्या पतीकडून पत्नीला लोखंडी पाइपने मारहाण

नगर – दारू पिऊन आलेल्या पतीने घरातील सर्व कपडे जाळून टाकले. कपडे का जाळले, याचा जाब विचारला असता त्याने पत्नीला लोखंडी पाइपने मारहाण केली.  ही घटना जाधव पेट्रोल पंपाजवळील साईराम सोसायटीत घडली. पत्नीच्या फिर्यादीवरून दिगंबर दत्तात्रय सोनवणे याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  सुवर्णा दिगंबर सोनवणे (३२) या भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. … Read more

नगरकरांचा विश्वास उज्ज्वल भविष्याची ग्वाही देणारा ठरेल : जगताप

नगर –  मोठ्या मताधिक्याने माझी आमदारपदी पुन्हा एकदा निवड करून, आपण माझ्या विकासकामरुपी प्रयत्नांच्या प्रकाशाला साथ दिली आहे.  मतदानाच्या माध्यमातून आपण सर्वांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास, नगर शहराच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही देणारा ठरणार आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.  स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी सन्मानपत्र देऊन आमदार जगताप यांचा सत्कार … Read more

अहमदनगर मध्ये ‘या’ ठिकाणी भेटतेय अवघ्या दहा रुपयांत पोटभर जेवण !

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकी दरम्यान शिवसेनेने त्यांच्या जाहीरनाम्यात अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण देण्याचे आश्वासन दिले होते. या घोषणेची कधी अंमलबजावणी होते हे माहित नाही पण नगर शहरात संवेदनशील व्यापारी, व सेवानिवृत्त सरकारी अधिकारी यांनी एकत्र येत हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुपमार्फत अवघ्या दहा रुपयांत पोटभर जेवण देणारी सुविधा केली आहे. नगर शहरातील प्रेमदान चौकात … Read more

शहर विकासासाठी सर्वांनीच मिळून काम करणे गरजेचे : आ. जगताप

अहमदनगर :- हे शहर माझे आणि आणि मी या शहराचा एक घटक आहे,असे मानले तरच आपण शहरचा चेहरा मोहरा बदलू शकतो. शहराचा विकास साधायचा असेल तर सर्वांनीच मिळून काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. आमदार संग्राम जगताप यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने नुकतीच महनगरपालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन शहराच्या विकासासाठी … Read more

नगरकर नागरिकांना पोलिसांचे आवाहन, चावा घेणाऱ्या व्यक्ती बद्दल अफवा नकोत…

गेल्या तीन-चार दिवसांपासून तोफखाना पोलीस स्टेशनचे हद्दीत वेगवेगळ्या भागात लोकांना चावणारा एक तरूण मनोरुग्ण हा फिरत असल्याबाबत अनेक फोन कॉल्स तोफखाना पोलीस स्टेशन येथे तसेच पोलीस कंट्रोल रूम येथे प्राप्त झालेले असुन त्या फोन कॉल्सचे आधारे तात्काळ पोलिसांनी मिळाले फोन कॉल्स ठिकाणी जाऊन स्थानिक नागरिकांचे मदतीने खात्री केली असता असा कोणताही तरुण मनोरुग्ण मिळून आलेला … Read more

उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू – खा. डॉ. सुजय विखे पाटील

अहमदनगर : नगर शहरातील उड्डाणपूल हा महत्त्वाचा विषय आहे. येत्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लष्कर हद्दीतील जमिनीच्या संपादनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. ९० टक्के जमीन संपादित असेल, तर कार्यारंभ आदेश देता येतात. त्यानुसार उड्डाणपुलासाठी येत्या आठ ते दहा दिवसात आणखी जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण झाले, की उड्डाणपुलाच्या कार्यारंभ आदेश जारी केले जातील. उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू … Read more

पुढचा मुख्यमंत्री आमचाच असेल !

अहमदनगर :- ‘परशुराम सेवा संघ लवकरच व्यापक रूप घेणार असल्याने भविष्यकाळ संघासाठी चांगला राहणार आहे. त्यामुळे यापुढे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी आपला उमेदवार असेल आणि पुढचा मुख्यमंत्री परशुराम सेवा संघाचा असेल,’ असे प्रतिपादन परशुराम सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मुळे यांनी येथे केले. परशुराम सेवा संघाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक नगरच्या एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र राज्य संपर्क … Read more

अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करू : आ. जगताप

अहमदनगर : नगर – मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, जर कामास विलंब झाला आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुर्दैवाने अपघात होऊन काही दुर्घटना घडल्यास बांधकाम विभागाला दोषी धरून अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. नगर शहराच्या हद्दीतून … Read more

नगर शहराला महानगर बनवणार : आमदार संग्राम जगताप

अहमदनगर :- नगर शहर विकासाच्या संकल्पनेतून नगरकरांनी मला दुसऱ्यांदा आमदारपदी विराजमान केले. माझ्यावर आता शहर विकासाची मोठी जबाबदारी आहे. नागरिकांना बरोबर घेऊन मी शहर विकासाला चालना देणार आहे. उपनगरांच्या विकासाबरोबरच मध्यवर्ती शहराचे प्रश्न सोडवणार आहे.  विकासकामांबरोबर रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मुकुंदनगरच्या विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात कामे … Read more

वृद्ध महिलेची हत्या करणार्यास अटक

अहमदनगर : शहरातील लालटाकी भागातील भारस्कर कॉलनीत किरकोळ वादातून वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती. ही घटना एप्रिलमध्ये घडली होती. या गुन्ह्यातील फरार आरोपी करण नारायण दिनकर (वय २०, रा. कसबा पेठ, पाथर्डी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाथर्डीतून ताब्यात घेतले.  याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, १० एप्रिल २०१९ रोजी दुपारच्या सुमारास लालटाकी भागातील … Read more