रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याने चालक ठार

अहमदनगर :- रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याने त्यावरील चालक ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी फिर्याद देण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब धोंडीराम घोडके (रा. सम्राटनगर, दत्तनगर, श्रीरामपूर) हे आपल्या ॲक्टिव्हा दुचाकीवरून श्रीरामपूरहून बाभळेश्वरच्या दिशेने चालले होते. नांदूर गावच्या शिवारातील ग्रामपंचायतीच्या विहिरीजवळील कॉर्नरला समोरून येणाऱ्या ॲपे रिक्षाने त्यांना जोराची धडक दिली. यात घोडके ठार झाले. … Read more

पोलीस स्टेशन जवळच चोरट्यांचा धुमाकूळ

संगमनेर  – संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. शनिवारी रात्री चोरट्यांनी चक्क पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहत असलेल्या कॉलनी जवळच चोरीचा धुमाकूळ माजवला. या मुळे संगमनेर तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आश्वी-प्रतापपूर रस्त्यावर दोन ठिकाणी तर पोलीस स्टेशनपासून थोड्याच अंतरावर असलेले दोन बंद बंगले, अशा एकूण आठ ठिकाणी चोर्‍या करून 1 … Read more

पोलिसाची नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या

श्रीरामपूर :– तालुक्यातील टाकळीभानमध्ये पोलीस दलात सेवेत असलेले बापुराव कारभारी रणनवरे यांनी टाकळीभान येथील आपल्या राहत्या घरात नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एक उत्कृष्ठ कब्बडी खेळाडू म्हणून 1994 साली पोलीस सेवेत बापुराव रणनवरे रुजू झाले होते. कब्बडी खेळातून पोलीस दलात सेवा करीत असताना व त्यापूर्वीही त्यांनी खेळाचे मैदान गाजविले होते. रविवारी दुपारी येथील लक्ष्मीवाडी … Read more

मुलाने आत्महत्या केल्याचे समजताच पित्याचाही मृत्यू

श्रीगोंदे :- मुलाने केेलेल्या आत्महत्येचा धक्का सहन न होऊन वडिलांचाही मृत्यू झाला. ही घटना शेडगाव येथे शनिवारी घडली. नापिकी, सोसायटीचे कर्ज व सावकारांच्या जाचाला कंटाळून शेडगाव येथील धनाजी संपत धेंडे (वय ४६) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्याचा धक्का बसल्याने त्यांचे वडील संपत नामदेव धेंडे (वय ६२) यांचाही मृत्यू झाला. धनाजी धेंडे हे शेतात … Read more

मंगल कार्यालयातून दीड लाखाचे दागिने चोरीस !

श्रीगोंदा : तालुक्यातील घारगाव येथील अक्षदा लॉन्स मंगल कार्यालयातून दि.१२डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने शांताबाई कासार या वृद्ध महिलेजवळील कापडी पिशवीला कशाने तरी काप मारून त्यातील १लाख ४७ हजार १६७ रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल असे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या चोरीबाबत वृद्ध महिलेचे नातू निशिकांत … Read more

अहमदनगर : नगर-कल्याण रस्त्यावर चालत्या मोटारसायकलवरून गंठण ओरबाडले !

अहमदनगर : नगर-कल्याण रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीवरील पाठीमागील बाजूस बसलेल्याने महिलेच्या गळ्यातील सव्वाचार तोळ्याचे दोन गंठण चालत्या दुचाकीवरून ओरबाडून नेले. चालत्या दुचाकीवरून दागिने ओरबडल्यामुळे खाली पडून महिला जखमी झाली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, सुनील परसराम कदम (वय ५१रा.जामगाव, ता. नगर) हे त्यांची पत्नी उषा हिच्यासमवेत दुचाकीवरून चालले होते. … Read more

श्रीगोंद्यातील या सहकारी सेवा संस्थेत झाला तब्बल सव्वा दोन कोटींचा अपहार

 श्रीगोंदा : तालुक्यातील पेडगाव येथील पेडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेत दि.१/०४/१८ ते ३१/३/१९ या दरम्यान २ कोटी २३ लाख ४१ हजार ६९९ रुपये एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. सदर अपहार व संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी द्वारकानाथ जनार्दन राजहंस यांनी श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. या फिर्यादीवरून तत्कालिन सचिव व एका कर्मचाऱ्याविरूध्द गुन्हा … Read more

संतापजनक : फार्महाऊसवर राखणदार म्हणून काम करणार्या तरुणाने चौथीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करून तिच्यासोबत केल हे कृत्य

कोपरगाव :- तालुक्याच्या पश्चिम भागातील वेळापूर येथील चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे शुक्रवारी सायंकाळी अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अत्याचार करणारा पीडित मुलीला सोडून फरार झाला आहे. पोलीस त्याच्या शोधात आहेत. पीडित मुलगी सुरेगाव येथे चौथीत शिक्षण घेत आहे. ती शुक्रवार दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घराकडे जात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरधाव कंटेनरच्या धडकेत युवती ठार

कोपरगाव :- सिन्नर – शिर्डी रोडवर देर्डे कोहाळे शिवारात भरधाव वेगाने जात असलेल्या कंटेनरने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत किरण संतोष गडाख (वय १८) हिचा मृत्यू झाला, तर विकास निरगुडे हे जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. घटना घडल्यानंतर कंटेनर चालक पळून गेला. यासंबंधी अधिक माहिती अशी की, फिर्यादी अशोक अर्जुन निरगुडे याचा चुलतभाऊ विकास व त्यांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चौथीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार !

कोपरगाव :- तालुक्यातील सुरेगाव येथे इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीचे शाळा सुटल्यानंतर अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धककादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी याच गावातील तरुण अमोल अशोक निमसेविरुध्द बलात्कार, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, अपहरण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी  आरोपीने मोटारसायकलवरुन मुलीचे अपहरण केले होते. शनिवारी मुलगी गावामध्येच आढळून आली. त्यानंतर तिने तिच्याबरोबर … Read more

सराफाला अडीच लाखांना लुटले !

कोपरगाव : काळ्या रंगाच्या मोटारसायकवरील तीन अज्ञात इसमांनी गाडी आडवी लावून तालुक्यातील जवळके येथे सराफ व्यवसाय करणाऱ्यास त्याच्या जवळील रोकड व सोन्याचे दागिने यांसह अडीच लाख रुपयांना लुटल्याची घटना गुरुवार, दि. १२ रोजी सायंकाळी हॉटेल माईलस्टोन जवळ, कोपरगाव येथे घडली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसात काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरील तीन संशयित चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

क्षुल्लक कारणावरुन महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण

 अहमदनगर : नगर-सोलापूर रोडवरील दरेवाडी येथील यशवंत कॉलनीत क्षुल्लक कारणावरुन तीन महिलांनी एका महिलेस शिवीगाळ, दमदाटी करुन लोखंडी साखळी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घडली. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, ममता दीपक पातारे (रा.यशवंत कॉलनी, दरेवाडी) या दुधाची पिशवी आणायला जात असताना जया देविदास पातारे व तिच्या दोन मुली महिमा व श्रद्धा (सर्व रा.यशवंत कॉलनी, दरेवाडी) … Read more

धक्कादायक : दुपारच्या सुट्टीत वर्गात शिरून विद्यार्थिनीचा विनयभंग !

नेवासा : तालुक्यातील शिरसगाव येथे एकाने शाळेत दुपारच्या सुट्टीत वर्गात शिरून एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना दि. ६ डिसेंबर राजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. यावर मुलीचे वडील समजाऊन सांगण्यासाठी गेले असता, त्यांना मारहाणही करण्यात आली आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की तुषार राजेंद्र पोटे याने या विद्यार्थिनीच्या वर्गात जाऊन तिला लज्जा उत्पन्न होईल, … Read more

पूरग्रस्तांच्या नावे साडे चार लाखांची फसवणूक

अहमदनगर- सावेडी परिसरातील गुलमोहोर रोडवर नवलेनगर येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तुम्हाला पैसे पाठवतो, असे सांगून अज्ञात इसमाने साडे चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना दि.५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाऊसाहेब विष्णू डमाळे (वय ४१, रा.गजानन कॉलनी, नवलेनगर, सावेडी) यांना अज्ञात इसमाने ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान कँरोल डायन … Read more

शिक्षक म्हणून नोकरी देतो असे सांगुन अहमदनगर जिल्ह्यातील या संस्थेने केली तब्बल 15 लाखांची फसवणूक !

अहमदनगर : शिक्षक म्हणून नोकरी देतो असे सांगुन सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठाणने दोघांची १५ लाख रूपयांची फसवणुक केल्याची घटना भिंगार परिसरातील सैनिक नगर येथे घडली. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद गुरुवारी (दि.१२) करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिंगार परिसरातील बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, खजिनदार … Read more

शिर्डी – कोपरगाव राज्यमार्गावर मृतदेह आढळला

कोपरगाव : तालुक्यातील तीनचारी येथे शिर्डी- कोपरगाव दरम्यान राज्यमार्गावर शेती महामंडळाच्या जमिनीत काटेरी झुडपात अंदाजे ५८ वर्षे वय असणाऱ्या इसमाचा मृतदेह आढळला आहे. शुक्रवारी (दिनांक १३) दुपारी ४ वाजेच्या सुमारास या भागात शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीला हा मृतदेह दिसला. त्याने आसपासच्या नागरिकांना याबाबत सांगितले. ही माहिती पोलिसांना कळविताच पोलीस घटनास्थळी आले. या इसमाच्या डाव्या हाताच्या नसा … Read more

जामीनदार न झाल्याने आतेभावाचा खून करणार्या आरोपीस जन्मठेप !

अहमदनगर :- जेलमध्ये असताना जामीनदार झाला नाही.याचा राग धरून आरोपी ज्ञानेश्वर चंद्रकांत काळे, रा.वडुले बु. काळे वस्ती ता.शेवगाव.याने त्याचा आतेभाऊ मयत संदिप दत्तात्रय जर्गे याचा चाकूने भोसकून खून केल्याच्या आरोपावरून जिल्हा न्यायाधीश क्र. २ श्री.अशोककुमार भिल्लारे यांनी आरोपी ज्ञानेश्वर काळे याला जन्मठेप व १०,००० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील … Read more

साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधून महिला, पुरुष आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण भयावह !

औरंगाबाद: शिर्डी येथे साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधून महिला, पुरुष आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण भयावह असल्याची भीती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केली आहे. व्यक्ती गायब होण्याच्या अशा प्रकारातून मानवी तस्करी किंवा मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत काय, असा प्रश्नही खंडपीठाने उपस्थित केला. खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एस. एम. … Read more