विवाहितेचा छळ करून घराबाहेर हाकलले !

कोपरगाव : ‘तू आम्हाला आवडत नाहीस, तू आम्हाला नको आहे, मला दुसरे लग्न करायचे आहे’, असे म्हणून विवाहितेचा छळ करून तिला मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून तिला घराबाहेर काढून दिल्याच्या प्रकरणात पती व सासरा यांच्याविरोधात कोपरगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंजिरी शार्दुल देव (वय ३०, रा. श्रीराम मंदिराच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत १२ मुले ताब्यात

साकुरी : शिर्डी शहरात दि. १ डिसेंबरपासून ‘ऑपरेशन मुस्कान ७’ ही मोहीम राबविण्यात येत असून, दि. १२ डिसेंबर रोजी साईबाबा मंदिर परिसरात अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, श्रीरामपूर विभागाच्या अपर अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील पोलीस पथकाच्या माध्यमातून मोठी कारवाई करण्यात आली. यात जवळपास दहा ते पंधरा या वयोगटातील … Read more

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 8 जणांनी बेदम मारहाण करत महिलेला ठार मारले !

श्रीगोंदा : तालुक्यातील सुरेगाव शिवारातील मनीषा दत्तात्रय भोसले वय २५ या गरोदर महिलेला दि.२४/११/१९ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ती बाजार करून घरी जात असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून तिला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तोंडात कापड कोंबून आठ जणांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली होती. यात मनीषा गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र दि.९/१२/१९रोजी उपचारादरम्यांन तिचा … Read more

वाळू तस्करांना दणका तब्बल ६४ लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीगोंदा : पोलिसांनी सध्या वाळूतस्करांकडे आपला मोर्चा वळवला असून, गत दोन दिवसात पोलिसांनी चोरटी वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर,चार ट्रक, एक डंपर जवळपास १७ ब्रास वाळू असा एकूण ६३ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या फिर्यादीवरून चोरटी वाळू वाहतूक केल्याप्रकरणी सात जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर … Read more

सावधान ! महागडी चारचाकी स्वस्तात देवून ऑनलाईन गंडा घालणारे रॅकेट सक्रीय 

अहमदनगर :- अत्यंत कमी वापरलेली महागडी चारचाकी स्वस्तात देतो. म्हणून ऑनलाईन गंडा घालणारे रॅकेट सक्रीय झाले आहे.या रॅकेटने अनेकांना गंडा घातला असून, नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही स्वस्तातल्या गाडीच्या अमिषाने अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे ऑनलाईन गुन्हेगार स्वत: लष्करात सेवेत असल्याचे भासवत आहेत. संगमनेर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील एका युवकाला चारचाकी घ्यायची … Read more

महानगर पालिका कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

नगर : महापालिकेच्या आरोग्य विभागात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या नामदेव दत्तात्रय गाढवे (वय ५६, रा. सबजेल चौक, नगर) याने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काल सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. गाढवे यांनी नेमकी कशामुळे आत्महत्या केली, हे समजू शकले नाही. ड्युटी संपल्यानंतर गाढवे यांनी सबजेल चौकातील घरी दोरीने गळफास घेतला. काही वेळातच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गर्भवती तरुणीचा शुल्लक कारणातून खून

श्रीगोंदा :- तालुक्यात गर्भवती विवाहित तरुणीचा शुल्लक कारणातून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरेगाव शिवारात राहणारी विवाहित तरुणी मनिषा दत्तात्रय भोसले ही विसापूर येथून आठवडे बाजार करुन घरी येत असताना विसापूर शिवारात रेल्वे रुळालगतच्या रस्त्यावर तीन वर्षांपूर्वी झालेल्या मागील भांडणाच्या कारणातून ८ आरोपींनी संगनमत करून रिव्हॉल्व्हर दाखवून लाथाबुक्क्याने मारहाण करुन तोंड कपड्याने … Read more

अल्पवयीन तरुणीची श्रीगोंदा बसस्थानकात छेडछाड!

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीची छेडछाड काढण्याचा प्रकार दि. ९ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा बसस्थानकात घडला. याप्रकरणी अल्पवयीन तरुणीच्या फिर्यादीवरून किशोर बाळू गोडसे याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार श्रीगोंदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तरुणी श्रीगोंदा शहरातील एका महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेते. ती … Read more

ऑनलाईन मटक्याचा सुळसुळाट

भंडारदरा :- पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भंडारदरा धरणाच्या परिसरात ऑनलाईन मटक्याचा सुळसुळाट झाला आहे. या मटक्याच्या मोहामध्ये तरुणाई अडकली आहे. भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये सध्या मोबाइल मटक्याचा जोरदार बाजार सुरु आहे. मोबाइलवरच तीन सट्टेबाजारांचे गेम मेसेजद्वारे अज्ञात व्यक्ती पोलिसांची नजर चुकवून घेत आहेत. विशेष म्हणजे मोबाइलवर समोरील सट्टेबाजाला ज्या बाजाराचे गेम आहेत, त्याचे मेसेज टाकून सट्टा … Read more

 तरुणास मारहाण करत पत्नीला ही धक्काबुक्की

संगमनेर: मागील वादाचा राग मनात धरुन आदिवासी तरुणास जातीवाचक शिवीगाळ करत त्याच्या पत्नीला धक्काबुक्की केल्याप्रकरणी आंबीखालसा येथील शेतकरी सर्जेराव गुलाबराव ढमढेरे याच्यावर घारगाव पोलिसांनी अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला. ही घटना मंगळवारी आंबी खालसा येथे घडली. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला. भिल्ल समाजाच्या स्मशानभूमीलगत विकास गोरक्ष बर्डे हे पत्नी व मुलांसमवेत राहतात. मंगळवारी सकाळी बर्डे … Read more

सहायक फौजदार याच्यासह पाच जणांना जुगार खेळताना पकडले 

श्रीरामपूर : वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलिस ठाण्यासमोरील जुगार अड्ड्यावर औरंगाबाद येथील पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून सहायक फौजदार हनुमान पालेपवाड याच्यासह पाच जुगाऱ्यांना पकडले. ८ डिसेंबरला रात्री १२ च्या सुमारास औरंगाबाद येथील विशेष पथकातील हवालदार त्र्यंबक बनसोड, पोलिस नाईक योगेश खमाद, कॉन्स्टेबल अभिजित डहाळे, भरत कमोदकर, अपसर बागवान यांना वीरगाव पोलिस ठाण्यासमोर असलेल्या हॉटेलमध्ये काहीजण … Read more

युवक दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता; आत्महत्या केल्याचे उघड

राहुरी: राहुरी तालुक्यातील वांबोरी व वरवंडी येथे दोन वेगवेगळ्या घटनांत दोघा तरूणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी मध्यरात्री या घटना घडल्या. वांबोरी येथील प्रमोद गोरक्षनाथ भोसले (वय २३, राहणार ससे गांधले वस्ती) हा महाविद्यालयीन युवक दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. बुधवारी सकाळी वांबोरी परिसरातील गणपती घाट येथील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा … Read more

पोलिओ निर्मूलन मोहिमेसाठी जाणाऱ्या स्वयंसेवी कार्यकर्तीची हत्या

पेशावर: पाकिस्तानमध्ये पोलिओ निर्मूलन मोहिमेसाठी जाणाऱ्या एका स्वयंसेवी कार्यकर्तीची हत्या करण्यात आली. मुलांना पोलिओ डोस देण्यासाठी जात असताना तिच्या वाहनावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला. या गोळीबारात बिस्ताज बीबी नामक ही महिला मृत्युमुखी पडली, तर तिचा चालक जखमी झाला. हल्लेखोर पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पाकमध्ये पोलिओ निर्मूलन मोहिमेच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या घटना … Read more

अल्पवयीन मुलीस नेले पळवून; अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

कोपरगाव : कोपरगाव येथील एका अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले की, आपली मुलगी ब्युटी पार्लरच्या क्लासला गेली असता परत घरी आलीच नाही. शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही. म्हणून कोणा अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी आपल्या मुलीला पळवून नेले … Read more

अल्पवयीन तरुणीला भरदिवसा पळविले

पारनेर :- तालुक्यातील हंगा भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील, १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन तरुणीला भरदिवसा आरोपी अजित राजेंद्र आल्हाट, रा. हंगा याने काहीतरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. मुलीच्या वडिलांनी सुपा पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अल्पवयीन मुलीस पळविणारा आरोपी अजित आल्हाट याच्याविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून हेकॉ साळवे हे आरोपीचा व … Read more

एकाच दिवशी दोन जणांनी गळफास घेऊन केली आत्महत्या

राहुरी :- तालुक्यातील वांबोरी व वरवंडी या दोन ठिकाणी दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १० डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे. वांबोरी येथील घटना नाजुक प्रकरणातुन घडली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. याबाबत राहुरी पोलिसांत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून राहुरी पोलिस पुढील तपास करीत आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे प्रमोद गोरक्षनाथ … Read more

घरात घुसून महिलेचा विनयभंग

अकोले :- तालुक्यातील गंथला घाट परिसरात डोंगरगाव भागात एक २५ वर्षाची तरुणी घरात एकटी असताना आरोपी गोविंद गंगाधर मधे, रा. मुधवळे, ता. अकोले, कचरू संतु गारले, रा. घोडसरवाडी, ता. अकोले हे दोघे तरुणीच्या घरात घुसले व तिला धरुन पाणी मागत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग केला. तू जर आम्हाला विरोध केला तर तुला … Read more

श्रीगोंद्यात कोंबड्यांवरून बेदम मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी

श्रीगोंदा :- तालुक्यातील मांडवगण येथील शेतकरी महिला लवंगाबाई विश्वनाथ घोगरे यांच्या शेताजवळ राहणाऱ्या आरोपीच्या कोंबड्यांनी घाण केली तसेच मेथीच्या पिकाचे नुकसान केले. याबाबत लवंगाबाई घोगरे यांनी कोंबड्यावाल्या आरोपींना तुमच्या कोंबड्या आवरा त्यांनी नुकसान केले. याचा जाब विचारल्याने त्यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण करुन हात फॅक्चर करण्यात आला. लाथाबुक्क्याने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. … Read more