तीन तोळ्यांचे गंठण लांबवले

अहमदनगर : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण दुचाकीवरील चोरट्याने हिसकावून नेले. नगर-कल्याण रस्त्यावरील माधवनगर बोर्डाजवळ ही घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कविता सुनील बाचकर (वय ३२, रा. माधवनगर, नगर-कल्याण रोड) या नगर-कल्याण रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून एकजण आला. त्याने बाचकर यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून … Read more

तरुणाची दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या

संगमनेर: तालुक्यातील कनोली येथील किरण रंभाजी वर्पे (वय २५) या तरुणाने आपल्या राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. आश्वी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कनोली येथील किरण वर्पे या तरुणाने सकाळी नेहमीप्रमाणे जनावरांना चारापाणी केला होता. यावेळी घरात कोणीही … Read more

बेवारस मृतदेहामुळे उलगडले दोन खुनांचे रहस्य

नेवासा : वर्षभरापूर्वी प्रियसीच्या पतीचा खून केल्यानंतर तो पचला असतानाच तिच्या नात्यातील महिलेला याबाबत कुणकूण लागली. सदर महिलेने या दोघांना ब्लॅकमेलिंग करत पैशांची मागणी केली. तिचा वाढणारा तगादा आणि पहिल्या खूनाचे बिंग फुटण्याच्या भितीने आरोपी अमीन रज्जाक पठाण याने ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा काटा काढला. जोगेश्वरी – वाळुंज रस्त्यावर खून करून मृतदेह नेवासा तालुक्यातील जवळे खुर्द … Read more

डॉक्टरकडे मागितली दहा लाखांची खंडणी

श्रीरामपूर : शस्त्रक्रिया झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टरकडे दहा लाख रूपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर माळवे, रमेश गायकवाड, माधवी गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी : दि. २१ ऑक्टोबर रोजी उर्मिला रमेश गायकवाड या महिलेला पोटदुखीचा त्रास होवू लागल्याने बेलापूर … Read more

तरुण तलाठ्यावर प्राणघातक हल्ला 

राहुरी: तालुक्यातील कात्रड- गुंजाळे येथील तलाठी सतीश सुभाष पाडळकर (वय 35) या तरुण तलाठ्यावर चार तरुणांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना उंबरे-कात्रड-गुंजाळे रस्त्यावर काल मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. तलाठी सतीश सुभाष पाडळकर हे  वांबोरीमार्गे जात … Read more

अन्नातून विषबाधा एकाच कुटुंबातील सख्ख्या भावा – बहिणीचा मृत्यू

संगमनेर : अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील सख्ख्या भावा – बहिणीचा मृत्यू झाला. संगमनेरमध्ये रविवारी ही धक्कादायक घटना घडली. कृष्णा दीपक सुपेकर (वय ६), श्रावणी दीपक सुपेकर (वय ९) अशी या भावंडांची नावे आहेत. या दोघांची मोठी बहीण वैष्णवी दीपक सुपेकर (वय १३) हिच्यावर संगमनेरमधील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. मूळचे नांदूर खंदरमाळ येथील दीपक … Read more

चायना बनावटीच्या मांजा वापरावर बंदी असताना ही वापर सर्रासपणे सुरू

नगर – शहरात चायना बनावटीच्या मांजा वापरावर बंदी असली तरी त्याचा वापर सर्रासपणे सुरू आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या मकर संक्रातीच्या उत्सवामुळे शहरातील पतंगबाजीला सुरुवात झाली आहे. मात्र त्यासाठी चायना बनावटीच्या मांजाचा वापर केला जात असल्याने नागरिक व पक्षी यांच्या जीविताला अपाय होऊ लागला आहे. अशाच दोन घटनांत शहरातील दोन नागरिक जखमी झाले. नालबंदखुंट येथील सय्यद … Read more

अल्पवयीन मुलीला  पळवून नेलेल्या आरोपीला ३ वर्षे सक्त मजुरी 

श्रीगोंदा : आरोपी बंडू उर्फ प्रकाश पोपट चौधरी रा. शिंदे ता. कर्जत जि. अहमदनगर याने शाळेतील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणी श्रीगोंद्याचे जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. व्ही.व्ही. भांबर्डे यांनी आरोपीस  ३ वर्षे सक्त मजुरी व ५००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दि. १८ आक्टोबर २०१६ रोजी पिडीत अल्पवयीन मुलगी दुपारी दीड वाजता पेपरला जात … Read more

भाचीने गळफास घेत संपविले जीवन, धक्का सहन न झाल्याने मामाचा झाला असा शेवट

अहमदनगर :- भाचीने गळफास घेतल्याचे घटना मामाला कळताच त्या धक्क्याने त्यांचाही मृत्यू झाला. मामाचे ह्यदयविकाराने निधन झाले. महिलेच्या गळफासप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कॅलिस्टा ग्रॅहम रॉक (वय-३२, रा. सौरभनगर, भिंगार) असे गळफास घेतलेल्या युवतीचे नाव आहे. भिंगारमधील सौरभनगर येथे रॉक या युवतीने मंगळवारी पहाटच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. … Read more

मुलीस फूस लावून पळवून नेत बलात्कार करणारा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला,पण…

श्रीरामपूर :- येथील ग्रामीण रुग्णालयात वैैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन धूम ठोकली. रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारत आरोपी पसार झाला. राहुल गणेश शिंदे (वय २०) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. एक वाजेच्या दरम्यान तो बेड्यांसह पसार झाला.मात्र पोलिसांनी त्याला पाच तासात पुन्हा अटक केली. तिघा पोलीस कर्मचा-यांनी त्याला वैैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. … Read more

लग्नाळु तरुणांची फसवणुक करणाऱ्या अहमदनगरच्या टोळीचा पर्दाफाश

श्रीरामपूर – बनावट नवरी, आई- वडील, नातेवाईक दाखवून लग्नाच्या बंधनात अडकवून तरुणांना फसवून लाखो रुपयाला गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे टोळके देशभर कार्यरत असून ते श्रीरामपूर येथील असल्याचे समोर येत आहे.  याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बनावट मुलगी उभी करुन बनावट नातेवाईक दाखवून काहींना फसवल्याचा असाच प्रकार श्रीरामपूरमध्ये उघड झाला होता.याबाबत कार्यवाही करून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग – महिलेचा खून करून मृतदेह खड्ड्यात फेकला !

नेवासा-  एका ३० ते ४० वर्ष वयाच्या महिलेचा खून करून मृतदेह खड्ड्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना नेवासा खुर्द परिसरात असलेल्या जळके गावच्या शिवारात राजू जानकू सोनकांबळे यांच्या शेती गट नं.१२९ /१ मध्ये असलेल्या कॅनॉललगत मृतदेह फेकून देण्यात आला. या महिलेच्या तोंडावर जखमा असून गळा दाबून मारहाण करुन सदर महिलेचा खून करण्यात आला … Read more

श्रीगोंद्यात पोलिस निरीक्षकालाच गंडा ! 

श्रीगोंदे – ठाणे जिल्ह्यात नोकरीला असलेल्या पोलिस निरीक्षकाच्या पत्नीच्या नावे श्रीगोंदे तालुक्यातील कोथूळ येथे जमीन होती. काही लोकांनी बनावट आधार कार्ड बनवून ही शेतजमीन परस्पर विकली.  या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वेल्हा (पुणे) येथील किशोर चंद्रकांत पासलकर हे ठाणे जिल्ह्यात पोलिस निरीक्षक असून त्यांच्या पत्नी मीना पासलकर यांच्या नावे … Read more

लाच मागणारा जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक गजाआड

नगर – वैद्यकीय खर्चाचे बिल मंजूर करण्यासाठी १३ हजारांची लाच मागणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास अटक करण्यात आली. राजेंद्र सुधाकर नेहूलकर असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. तक्रारदाराच्या मुलाचे वैद्यकीय खर्चाचे बिल मंजूर करण्यासाठी त्याने दहा टक्क्यांप्रमाणे १३०० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर १२०० रुपये स्वीकारताना लाचलुचपतच्या पथकाने ही कारवाई … Read more

ताब्यात घेतलेले जेसीबी, डंपर तस्करांनी पळवले

पारनेर : गौण खनिजाची चोरी केल्याप्रकरणी जापनीज हबमध्ये ताब्यात घेतलेले दोन जेसीबी व एक डंपर कंपनीचा पत्रा तोडून मध्यरात्री कारवाई सुरू असतानाच पळवून नेण्यात आला. एक पोकलेन पळवून नेण्याचा प्रयत्न पथकाने हाणून पाडला. मायडीया, कॅरीअर व मिंडा या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उभारणीचे काम सुरज बिल्डकॉन व ईसीआर या नामांकित बांधकाम कंपन्यांकडे आहे. या कंपन्यांनी गौण खनिजाचा … Read more

एटीएम फोडण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला

राहुरी : शहरातील  नगर-मनमाड मार्गावरील राहुरीच्या बसस्थानकासमोरील काॅम्प्ल्केसमधील स्टेट बँक शाखेचे एटीएम फोडण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. पोलिस आल्याचा सुगावा लागताच टोळीतील ५ चोरांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. पळून जाणाऱ्यांपैकी एक जण पोलिसांच्या हाती लागला. रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बसस्थानकासमोरील गाळ्यात असलेले एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली. पाच चोरांच्या टोळीने एटीएम केबीनमध्ये प्रवेश करून … Read more

नापिकी, दुष्काळी परिस्थितीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

जामखेड: सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती, परतीच्या पावसामुळे पाण्याखाली गेलेली पिकं यामुळे अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली असलेल्या तालुक्यातील सरदवाडी येथील अप्पासाहेब रावसाहेब गंभिरे (वय ४८) या शेतकऱ्याने कुसडगाव शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या मुळे परिसरात शोककळा पसरली. अप्पासाहेब गंभिरे हे गुरुवारी जामखेडवरून सरदवाडी येथे दुपारी घरी गेले होते. आपला मोबाइल घराबाहेर ठेवला … Read more

विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी ; एक बेशुद्ध

राजुरी : प्रवरा परिसरातील एका शाळेत गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शाळा भरण्याच्या वेळेस मुलांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. यामध्ये एक विद्यार्थी बेशुद्ध पडला असून याप्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. प्रवरानगर येथील एका शाळेत गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शाळा भरण्याच्या अगोदर शाळेतील मुलांमध्ये चांगल्याच हाणामारी झाल्या असून यामध्ये मारहाण झालेला मुलगा बेशुद्धावस्थेत पडला … Read more