शेतीच्या बांधावरून लाकडी दांड्याने आणि कुन्हाडीने मारहाण

शिर्डी :  कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात राहणाऱ्या शेतकरी महिला मिराबाई उत्तम देवकर यांच्या शेताच्या सामाईक बांधावर शेजारील आरोपींनी बांधावरील शेत नांगरताना मोडल्याने मिराबाई देवकर या आरोपींना समजावून सांगत असताना त्यांना पाच आरोपींनी लाकडी दांड्याने व कुन्हाडीने मारहाण केली. मुलगा सोमनाथ उत्तम देवकर हा सोडविण्यासाठी आला असता त्याला पण बेदम मारहाण केली. मिराबाई उत्तम देवकर या … Read more

‘त्या’ मुलांच्या शोधासाठी पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान

अहमदनगर : विशेष पोलिस महानिरीक्षक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र, मुंबई यांनी ऑपरेशन मुस्कान दि.२८ नोव्हेंबर रोजी हरविलेल्या बालकाच्या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार ऑपरेशन मुस्कान-७ ही शोधमोहिम दि.१ ते ३१ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र राज्यात दरवर्षी प्रमाणे राबविण्याचे आदेश पारीत केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात मुस्कान-७ शोधमोहिम दि.१ पासुन सुरू केली असल्याची माहिती अनैतिक मानवी … Read more

लोणी गोळीबार व हत्या प्रकरणातील पाच आरोपींना अटक

लोणी : रविवारी लोणीत गोळी घालून तरुणाची हत्या करणाऱ्या व पसार झालेल्या सात पैकी पाच आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पाचवा आरोपी शुभम कदम याला शुक्रवारी लोणी पोलिसांनी बाभळेश्वर येथून अटक केली. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. गेल्या १ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता राहाता तालुक्यातील लोणी बु. येथील हॉटेल साईछत्रपतीमध्ये श्रीरामपूर येथील … Read more

भरदिवसा डोळ्यात मिरचीपूड टकून लुटले

श्रीरामपूर : कोल्हार-बेलापूर रोडवर उक्कलगाव गळनिंबच्या दरम्यान महिला बचत गटांना कर्ज देणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटण्यात आले. शुक्रवारी (दि. ६) डिसेंबर ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विकास धोंडीराम कदम (रा. मल्हारवाडी रोड, राहुरी) हे फिनकेअर स्मॉल फायनान्स कंपनी राहुरी येथे वसुलीचे काम करतात. ते वसुली करून बेलापूरमार्गे राहुरीकडे … Read more

शाही विवाह सोहळ्यातून 17 तोळे सोने लंपास

शिर्डी – राहाता शहरात एका शाही विवाह सोहळ्यातून चोरट्याने 17 तोळे सोने आणि दहा हजार रुपये रोख असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना  सीसीटीव्हीत कैद झाला आहे. श्रीरामपूर येथील उद्योजक मूळे यांच्या कुटुंबातील विवाह सोहळा, राहाता येथील कुंदन लॉन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यासाठी औरंगाबाद येथील डॉ. मंजुषा … Read more

पत्नीचा साडी धरुन विनयभंग, तर पतीला पट्ट्याने मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी!

शिर्डी – राहाता शहरात पिंपळवाडी रोड भागात राहणारे एका २८ वर्ष वयाच्या विवाहित तरुणीचा मागील भांडणाच्या कारणावरुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन साडी धरुन विनयभंग केला.  तसेच तरुणीस व तिच्या पतीस लाथाबुक्क्याने व पट्ट्याने मारहाण करून शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. पिडीत विवाहित तरुणीने राहाता पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन नातेवाईक असलेले आरोपी अक्षय … Read more

भरदिवसा अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवले !

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला ५ च्या सुमारास भरदिवसा तिच्या रहात्या घराजवळून अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेले.  याप्रकरणी मुलीच्या आईने संगमनेर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली आहे. मुलीचा व आरोपीचा हे.कॉ. औटी हे … Read more

भरधाव वाहनाच्या धडकेत अज्ञात इसम जागीच ठार

सुपा  – नगर – पुणे रस्त्यावर सुपा शिवारात हॉटेल शिवनेरी समोर रस्त्याने पायी चाललेल्या अज्ञात इसमाला भरधाव वेगातील वाहनाने धडक देवून उडविले.  या अपघातात अनोळखी पुरुष जागीच ठार झाला. वाहन चालक आरोपी गाडीसह फरार झाला. हे.कॉ. सुनील कुटे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहन चालक आरोपीविरुद्ध सुपा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे.कॉ. कुटे हे अज्ञात … Read more

दुचाकी घसरून अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंपरी परिसरात दुचाकी रस्त्यावर स्लीप – घसरुन गाडी वरील विद्यार्थिनी निर्मला दुराजी कांबळे, वय १४, रा. म्हातारपिंपरी, ता. श्रीगोंदा ही तरुणी गाडीवरुन पडून डोक्याला मार लागून जबर जखमी झाली.  तिला गंभीर स्थितीत पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना डोक्याला मार लागलेली निर्मला कांबळे ही मुलगी … Read more

श्रीगोंदा : नवजात पुरुष जातीचे अर्भक विहीरीत फेकले !

श्रीगोंदा – शेतातील विहिरीत नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे अर्भक अज्ञात स्त्रीने बाळंत होवून ते लपविण्याच्या उद्देशाने फेकले असावे असा संशय पोलीसांनी व गावकर्यांनी आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील शेती गट नं. ३५९ मधील रोहिदास टकले यांच्या शेतातील विहिरीत नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे अर्भक विहिरीत मृतावस्थेत मिळून आले आहे. … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू

राहुरी  – नगर – मनमाड रस्त्यावर डिग्रस शिवारात मुळा उजव्या कालव्याजवळ भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक देवून उडविले.  ही धडक इतकी जोराची होती की, दुचाकीवरील तरुण राजू संजय पवार, वय ३०, रा. धामोरी बु., ता. राहुरी हा तरुण जागीच ठार झाला. काल ६:४५ वाजता हा भीषण अपघात झाला. अपघात करुन चालक गाडीसह फरार … Read more

भरधाव पिकअपच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

श्रीगोंदा  –  दौंड रस्त्यावर काष्टी परिसरात शिवनेरी चौकात भरधाव पिकअपच्या धडकेत पादचार्याचा जागीच मृत्यू झाला. पोपट विलास माने, वय ३८, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा असे पद्चार्याचे नाव आहे.  भरधाव वेगातील पिकअप गाडी नं. एमएच १५ एफव्ही ३६९५ हिच्यावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात गाडी चालवून पायी चाललेले पोपट माने यांना धडक देत उडविले. … Read more

चारित्र्यावर संशय घेऊन छळ, विवाहित तरुणीने स्वतःला संपवलं !

नगर  –  नगर तालुक्यात केडगाव परिसरात जयहिंदनगर, भूषणनगर भागात विवाहित तरुणी सौ. प्रियंका सुनील कांबळे, वय ३२ हिने सासरच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केली.  नवरा, सासू व सासरच्या लोकांनी प्रियंका या तरुणीस सासरी नांदत असताना तुझ्या बापाने लग्नात काही दिले नाही, असे म्हणत घालून पाडून बोलून तसेच तू मोबाईल वापरायचा नाही, ड्रेस घालायचा नाही, प्रियंकाच्या चारित्र्यावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दहावीच्या विद्याथ्र्याचे अपहरण !

श्रीरामपूर ;- श्रीरामपुरातून इयता दहावीत शिकणाऱ्या आबासाहेब राजधर बाळापूरकर (वय १५) याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची फिर्याद वडील राजधर बाळापूरकर यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, दि. २ डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास श्रीरामपूर एस.टी. स्टँड येथे मुलगा आबासाहेब बाळापूरकर यास बसमध्ये बसवले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी कशाचीतरी … Read more

जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामाऱ्या

अकोले :- तालुक्यातील कोतूळ येथे जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीतून अकोले पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. याबाबत अकोले पोलिसांत गेणू धोंडिबा भुजबळ (वय ८६) यांनी दिलीप काशिनाथ भुजबळ, प्रविण काशिनाथ भुजबळ, आशिष सुनील भुजबळ, विजय भाऊसाहेब मंडलिक, सखुबाई काशिनाथ भुजबळ, दुर्गा सुनील भुजबळ, सुनील गेणू भुजबळ (रा. कोतूळ), रत्नप्रभा भाऊसाहेब मंडलिक (रा.उंचखडक) अशांनी संगनमत करून … Read more

अडीच लाखांच्या दागिन्याची चोरी

लोणी :- लोणी खुर्द येथील संजय सोपान आहेर (वय ५३) हे व कुटुंबिय घरात झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले सोन्याचे दागिने व टायटन कंपनीचे मनगटी घड्याळ असा दोन लाख ४२ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. दि. २ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा ते दि. ३ डिसेंबर पहाटे तीन वाजेच्यादरम्यान ही … Read more

चारचाकी वाहन चोरणाऱ्या दोन तरुणांना अटक

अहमदनगर :- नगर शहरातून चारचाकी वाहन चोरुन नेणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडले. या कारवाईत पोलिसांनी गणेश शिवाजी लोखंडे (वय २०, रा.लोंढे मळा, केडगाव), संकेत सुनील खापरे (वय २१, रा.विनायक नगर, अ.नगर) यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीची स्विफ्ट कारही जप्त केली. याबाबतची माहिती अशी की, विजय प्रभाकर लटंगे (रा.सिडको, औरंगाबाद) हे यांनी … Read more

धक्कादायक : शिपायाने केला 12 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग

अहमदनगर – नगर शहरातील रेसिडेन्शियल हायस्कूलमधील शिपायाने 12 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिपायाविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकाकडून त्या शिपायावर कडक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. सविस्तर असे की, 12 वर्षीय विद्यार्थिनी रेसिडेन्शिअल हायस्कूल येथे शिक्षण घेत आहे. तेथे काम करणारे शिपाई लगड (पूर्ण नाव माहित … Read more