लष्करात खोटी कागदपत्रे देवून सैन्यदलाची फसवणूक

अहमदनगर : लष्करात भरतीच्यावेळी खोटी कागदपत्रे सादर करुन सैन्यदलाची फसवणूक केल्याप्रकरणी कोमलप्रसाद पन्नालाल शर्मा रा.बिसारा जि.सीतापूर,उत्तरप्रदेश याच्या विरुध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याबाबत पोलिस सुत्राकडून समजलेली माहिती अशी की,एमआयआरसी सेंटर येथे दि.१ जुलै ते दि. २८ नोव्हेंबर २०१९ दरम्यान कोमलप्रसाद शर्मा याने लष्करात भरतीच्यावेळी रहिवासाची खोटी कागदपत्रे सादर करुन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत उडी घेऊन पती-पत्नीने जीवन संपविले !

अहमदनगर :- भिंगार येथे शेतातील विहिरीत उडी घेऊन पती-पत्नीने आपले जीवन संपविले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२९) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बादल हरिचंद्र वाल्मिकी (वय २६), बबली बादल वाल्मिकी (वय १९) असे या दाम्पत्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाल्मिकी दाम्पत्य हे भिंगार … Read more

तृतीयपंथीय व्यक्तीला झालेल्या मारहाणीत मृत्यू

श्रीरामपूर ;- बाजार समिती परिसरातील जगदंबा सर्व्हिस या दुकानाच्या गाळ्यासमोर तृतीयपंथीय व्यक्तीला झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला असून श्रीरामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. १७ ऑक्टोबर रोजी अश्विनी नुरजहाँ शेख (वय ४५, रा. श्रीरामपूर) तृतीयपंथीयाला अज्ञात व्यक्तीकडून मारहाण केली होती. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या … Read more

नवरा व सासऱ्याकडून विवाहितेचा दुचाकी, चारचाकीसाठी छळ !

नगर – जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण तसेच पुणे येथे सासरी नांदत असताना विवाहित तरुणी नंदिनी प्रविण खंदारे, वय ३० हिला नवरा व सासऱ्याने तुझा पगार आमच्याकडे दे, तुझे एटीएम आम्हाला दे, तुझी दुचाकी आम्हाला दे,  तुझ्या आई वडिलांकडून माहेरी चारचाकी गाडी घेण्यासाठी ५ लाख रुपये घेवून ये, असे म्हणून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून … Read more

नगर जिल्ह्यात एकाच दिवसात या पाच जणांचा मृत्यु

नगर –  भिंगार, धनगरवाडी (ता. नगर), खातगाव टाकळी (ता. पारनेर) व आंबड (ता. अकोले) येथील वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच  जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमध्ये नगर जिल्ह्यासाठी ब्लॅक फ्राय-डे ठरला आहे. भिंगार येथे पती-पत्नीने आत्महत्या केली आहे. आसमा वाल्मिक ऊर्फ बबली (वय १९) व शुभम हरिश वाल्मिक ऊर्फ बादल (वय २६) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नींचे नावे … Read more

BREAKING – ग्रामपंचायत कार्यालयातच महिला सरपंचाच्या साडीसोबत केले ‘हे’ कृत्य

नगर –  नगर तालुक्यातील एका गावच्या ग्रामपंचायत कार्यालयातच महिलेच्या साडीचा पदर ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. याप्रकरणी आरोपी बाळासाहेब शंकर शेळके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील एका गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात एक ४२ वर्षाची विवाहित महिला सरपंच असून तेथे काल ९. ३० च्या सुमारास सदर सरपंच महिला कार्यालयात कामकाज करत असताना … Read more

मजुरीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने ठेकेदाराने गवंड्यास बेदम मारले

संगमनेर- फोन करून मजुरीच्या पैशाची मागणी केल्याने  राग येऊन ठेकेदाराने दुचाकीवर बसवून पळवून नेऊन लाकडी दांड्याने व लोखंडी गजाने बेदम मारहाण जखमी केले. ही घटना  संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे घडली.  सविस्तर माहिती अशी की, सुरेश जगन्नाथ शेळके हे आरोपी प्रदीप आनंदा दशिंग, रा. लोहारे, ता. संगमनेर याच्याकडे गवंडी म्हणून कामास होते. शेळके यांचे मजुरीचे … Read more

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

शिरसगाव – देणेदारांना आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शिरसगाव येथील अण्णासाहेब अर्जुन दौंड या ३८ वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.  विशेष म्हणजे मुंबईला बहिणीकडे निघून राहुरीत उतरुन या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. त्यामुळे खळबळ उडाली असून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या अवस्थेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, अण्णासाहेब दौड हे … Read more

घरात घुसलेल्या चोरट्यांचा प्रतिकार केल्याने चोरट्यांनी केला कुऱ्हाडीने हल्ला

श्रीगोंदे – घराचा दरवाजा तोडून घरात घुसलेल्या चोरांवर प्रतिकार केल्याने चोरट्यांनी डोक्यात कुर्हाडीचा जबरी घाव घालून जखमी केले. ही घटना श्रीगोंदा परिसरात मांडवगण रोड, तरटे वस्ती, शाडूचा मळा येथे घडली. सविस्तर माहिती अशी की,  भगवान तरटे यांच्या बंगल्यात रात्री १. ४५ च्या सुमारास तोंडाला फडके गुंडाळलेले चोरटे घराचा दरवाजा तोडून घरात घुसले. घरात सामानाची उचकापाचक … Read more

शिर्डीत रेल्वेरुळावर महिलेचा मृतदेह आढळला

शिर्डी ( प्रतिनिधी ) – शिडीं परिसरात रेल्वे रुळावर काल एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर महिलेचे वय ५५ ते ६० वर्षाचे आहे.   याप्रकरणी पो.कॉ. वेताळ यांच्या खबरीवरुन शिडी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  सदर महिला कोण ? तिचा मृत्यूकसा झाला? काही घातपात आहे का ? याचा पुढील तपास हे.कॉ पवार हे करीत … Read more

ग्रामसेवकाने दोन ग्रामपंचायतीत तब्बल ९३ लाखांना चुना लावला!

संगमनेर – अकोले तालुक्यातील आंबेवंगण ग्रामपंचायत व शेणीत ग्रामपंचायत या दोन ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून काम करताना आरोपी भाऊसाहेब महादेव रणशिंग याने तब्बल ९३ लाखाहुन जादा रकमेचा अपहार केला. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.  पहिली फिर्याद काशीनाथ धोंडिराम सरोदे, धंदा नोकरी, रा. श्रद्धा कॉलनी, गुंजाळवाडी, संगमनेर यांनी राजूर पोलिसांत दिल्यावरुन आरोपी ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव … Read more

वृद्ध महिलेस मारहाण करून गळ्यातील डोरले पळवले

अहमदनगर : एका ६० वर्षीय वृद्ध महिलेस हाताच्या चापटीने मारहाण करुन तिच्या गळ्यातील साडेतीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले बळजबरीने चोरुन नेले. ही घटना नगर तालुक्यातील बाराबाभळी परिसरातील मोरे वस्ती, कवड्याची खोरी येथे मंगळवार दि.२६ रोजी ७ वाजता घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बेबीबाई भानुदास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मायलेकीने विहिरीत उडी घेत संपविले जीवन !

अहमदनगर :- धनगरवाडी (ता. नगर) येथे मायलेकीची विहिरीत उडी घेऊन, आत्महत्या केल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना कशामुळे घडली, हे अद्यापही कळू शकलेले नाही. नीता उर्फ कविता सचिन कापडे (वय- २७) व मुलगी प्रणाली (वय- ४) यांनी विहिरीत उडी घेऊन, आत्महत्या केली. गुरुवारी (दि.२८) रात्री नीता कापडे … Read more

त्या नराधम मुख्याध्यापकास अटक !

जामखेड :- तालुक्यातील दत्तवाडी (धोंडपारगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संभाजी सरोदे (रा.जामखेड) याने शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जामखेड पोलिसांनी मुख्याध्यापकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. संभाजी कोंडीबा सरोदे तालुक्यातील दत्तवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. दि 23 नोव्हेंबर रोजी … Read more

अहमदनगर राष्ट्रवादीचा हा नगरसेवक पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजर्‍यात

अहमदनगर :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुकुंदनगर परिसरातील नगरसेवक समदखान पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजर्‍यात उभे ठाकले आहेत. बेकायदा होर्डिग्ज लावल्याने महापालिकेनेच हा गुन्हा नोंदविला आहे. याबाबत महापालिकेचे प्रभाग अधिकारी अशोक साबळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. नगर-औरंगाबाद रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत लावलेला फलक हा बेकायदा असल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. वाढदिवसाच्या फलकावर … Read more

सहा हजाराची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यास झाली इतक्या वर्षाची शिक्षा

संगमनेर :- जमिनीच्या हद्द मोजणीची कागदपत्रे तहसील कार्यालयात पाठविण्यासाठी सहा हजारांची लाच घेणाऱ्या दौलत नामदेव डामरे यांना चार वर्षांची साधी कैद व २४ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली या खटल्याची सुनावणी संगमनेर न्यायालयामध्ये सुरू होती.दौलत डामरे हे ऑक्टोबर २०१० मध्ये अकोले येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कार्यरत होते. या वेळी एका व्यक्तीकडून जमिनीची हद्द कायम मोजणीची … Read more

कर्जबाजारी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पारनेर :- कर्ज तसेच आर्थिक विवंचनेतून तालुक्यातील वनकुटे येथील सुनील तुळशीराम भगत (वय ३४) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. सुनील भगत हा वनकुटे येथे दुचाकी दुरुस्तीचे काम करीत होता. मंगळवारी सकाळी न्यायालयात काम असल्याने तो सकाळीच वनकुटे येथून निघाला. वडिलांकडे तीन हजार रुपयांची मागणी केल्यानंतर वडिलांनी त्यास … Read more

जामखेड मध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जामखेड :- रस्त्याच्या कारणावरून तालुक्यातील भवरवाडी येथे दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत बाराजण जखमी झाले असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या वेळी दोन्ही गटांकडून दगड व काठयांचा सर्रास वापर करण्यात आला. ही घटना मंगळवारी सकाळी आठच्या ते दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून बावीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही गटांतील दहा जणांना पोलिसांनी … Read more