आ. निलेश लंके म्हणतात आमदार ही पदवी नसून जबाबदारी ! अडचणी समजुन घेऊन…

Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार ही काही वेगळी पदवी नाही. शेवटी तो त्या कुटूंबाचा कुटूंबप्रमुख म्हणून ती जबाबदारी देण्यात आलेली असते. कुटूंबातील वेगवेगळ्या अडचणी समजुन घेऊन त्या कशा सोडविल्या जातील याचा प्रयत्न केला पाहिजे. या भावनेतून मी काम करतो. असे मत आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले. जिल्हा सामान्य रूग्णालय, नीलेश लंके प्रतिष्ठाणचा दिव्यांग सेल, पारनेर … Read more

पाथर्डी तालुक्यातील त्या’ तोतया डॉक्टरावर कारवाई करण्याची मागणी !

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील चितळेवाडी येथील एक बोगस डॉक्टर वैद्यकीय परवाना तसेच डिग्री नसताना देखील खेड्यापाड्यातील भोळ्या भाबड्या लोकांवर चुकीचे उपचार करून जीवाशी खेळत असल्याने या तोतया डॉक्टरावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेवगाव येथील शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचार मंचाचे पदाधिकारी तसेच संस्थापक, अध्यक्ष अशोक शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश … Read more

भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये चिलापीमुळे गावराण माशांची पैदास थांबली, मच्छिमारी व्यवसाय अडचणीत

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये वाढत असलेल्या चिलापी माशांमुळे इतर माशांवर गंडातर आले असून गावरान माशांना भंडारदरा धरण मुकले आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या मच्छिमारी व्यवसायाला खिळ बसली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये पांढरा, कोंबडा, फिनिश, वाम, मरळ, ओंबळी, अशा प्रकारचे गावरान मासे मोठ्या प्रमाणात आढळत होती. मात्र चार-पाच वर्षापूर्वी कुणीतरी अज्ञात … Read more

शेवगाव तालुक्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! पाण्याचे आवर्तन सुटले

Ahmednagar News

Ahmednagar News : पैठण येथील जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून खरीप पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सुटले असून, या आवर्तनामुळे शेवगाव तालुक्यातील खडके, मडके, खामपिंप्री, पिंगेवाडी, मुंगी, हातगाव, कांबी, या गावांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पैठण जायकवाडी धरण हे शेवगाव तालुक्यातील अनेक गावे विस्थापित होऊन तयार झालेले धरण असून, या धरणातून दोन कालवे तयार करण्यात आलेले आहेत. एक … Read more

अहमदनगर दौंड रेल्वेमार्गावर चोरट्यांची भलतीच चोरी ! चक्क साखरेचे १२३ पोते चोरले

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर- दौंड कॉर्डलाईन रेल्वे मार्गावर सारोळा कासार (ता. नगर) रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या डब्यांचे लॉकर तोडून अज्ञात चोरट्यांनी साखरेची तब्बल १२३ पोती लंपास केली. चोरलेली साखरेची पोती चोरट्यांनी रेल्वेमार्गालगत असलेल्या शेतातील मकाच्या पिकात लपवून ठेवल्याचे समोर आले आहे. रेल्वे पोलिसांनी ते हस्तगत केले आहेत. नगर-दौंड रेल्वेमार्गावरील सारोळा कासार स्टेशन जवळ मालगाडीचे डबे फोडून … Read more

Ahmednagar News : नगर-मनमाड महामार्गावर दोन अपघातात दोघांचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. योगेश दिलीप जाधव (वय २८ रा. मानोरी ता. राहुरी) असे मयत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी आण्णासाहेब यशवंत वाघ (वय ५३ रा. मानोरी ) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ३० ऑगस्ट रोजी रात्री … Read more

अहमदनगर व बीड जिल्ह्याच्या हद्दीवर वाळूमाफियांच्या दहशतीखाली राजरोस वाळूउपसा

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील घुमरी येथील होणाऱ्या वाळूउपशाबाबत गेली अनेक वर्षे ग्रामस्थ लढा देत असताना प्रशासन कोणतीच दखल घेत नसून गावातील नागरिकांना वाळूमाफिया थेट खुनाची धमकी देत राजरोस वाळूउपसा करत आहेत. महसूल अधिकारी व पोलीस गावातील नागरिकांचा खून होण्याची वाट पाहत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत वाळूमाफियांच्या हाताने मरण्यापेक्षा आम्ही प्रशासनाच्या नावाने आत्मदहन … Read more

आमदार काय करू शकतो हे जनतेने माझ्या कामातून पाहिले : आ. काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : दुर्दैवाने ४० वर्षात मतदार संघात अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित राहिले. त्यामुळे सत्ताधारी आमदार काय करू शकतो, हे आपण अवघ्या अडीच वर्षांत करून दाखविल्याचे मतदारसंघातील जनतेने पाहिले असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले. काल गुरुवारी वारी येथील २९ कोटी निधीतील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शंकरराव कोकाटे अध्यक्षस्थानी … Read more

शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम मिळणार

Ahmednagar News

Ahmednagar News : अवर्षणप्रवण भाग असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी स्वतः प्रयत्न करून शेतकऱ्यांना गावांमध्ये जाऊन मोफत पिक विमा संरक्षण उतरवून दिले. त्याचाच फायदा हा मतदारसंघातील शेतकऱ्यांना होत असताना आता पाहायला मिळत … Read more

Ahmednagar News : रस्त्याच्या कडेचे दगड काढण्यास विरोध,शिवीगाळ करत मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : रस्त्याच्या कडेचे दगड काढण्यास मज्जाव केल्याने सहा जणांनी मिळून तिघांना शिवीगाळ करत विळ्याचा वार करुन कुदळीच्या दांड्याने मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथे नुकतीच घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास नवनाथ गाडे ( वय ४५) हे राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथे राहत आहेत. त्याच ठिकाणी लक्ष्मण ऊर्फ संदिप … Read more

Ahmednagar News : रुग्णाच्या मृत्यूस जबाबदार धरत नातेवाईकांनी केली हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : सावेडीतील डौले हॉस्पिटल शेजारील हार्टबीट हॉस्पटलच्या दोन डॉक्टरांना रुग्णाच्या मृत्यूस जबाबदार धरत नातेवाईकांनी मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. ६) पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी डॉक्टर चंद्रकांत साहेबराव कदम यांनी फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत फिर्यादीनुसार पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, … Read more

अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती ! दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्ह्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात यावा, याबाबतचे निवेदन शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यामध्ये बहुतांशी तालुक्यांमध्ये यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. अनेक तालुक्यात … Read more

अहमदनगरमध्ये बेडीसह पलायन केलेला आरोपीस पुन्हा अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : पोलिस व्हॅनमधून बेडीसह पलायन केलेला आरोपी पुन्हा पकडण्यात आला आहे. ऋतीक उर्फ सनी रमेश लिपाने (रा. तपोवन रोड) असे आरोपीचे नाव आहे. बुधवारी (दि. ६) पहाटे सबजेलसमोर हा प्रकार घडला. पलायन केलेल्या आरोपीला सिद्धार्थनगर परिसरात पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली … Read more

Ahmednagar News : धनगर आरक्षणासाठी चौंडीत आमरण उपोषण !

Ahmednagar News

Ahmednagar News : संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनु. जमाती (एस.टी. प्रवर्ग) समावेश करण्यासाठी वटहुकूम काढावा, या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने दि. ६ रोजी जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथील स्मारकस्थळी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत वटहुकूम निघत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा यशवंत सेनेचे माजी … Read more

संगमनेर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

Ahmednagar News

Ahmednagar News : पावसाने पाठ फिरवल्याने संगमनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे संगमनेर तालुक्याला तर कोरडा दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत तहसीलदारांना नुकतेच निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की, पावसाने दडी मारल्याने बाजरी, सोयाबीन, मका, कापुस, भुईमूग हे पिके पुर्णपणे जळाली आहे. … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंप्री येथील नरेंद्र सयाजी वाबळे यांचा खून केल्याप्रकरणी गुन्ह्यातील आरोपी राजू बबन शिरवाळे रा. म्हातारपिंप्री याला श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब एस. शेख यांनी जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २० जुलै २०२० रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास मयत नरेंद्र सयाजी … Read more

कुकडी आवर्तनाचे पाणी सीना धरणात पोहचले !

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील निमगाव गांगड या कायम जिरायती भाग म्हणून ओळख असलेल्या या भागाला वरदान ठरलेल्या सीना धरणाने यंदा पाण्याची पातळी गाठली आहे. या भागात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. तर या धरणावर अवलंबून असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मागांवर असल्याचे चित्र निर्माण झाल्याने अखेर कुकडी ओव्हरफ्लो … Read more

अहमदनगर मध्ये शेतकऱ्यांच्या मुगाला मिळतोय असा भाव…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर बाजार समितीतील भुसार बाजारात मंगळवारी (दि.५) शेतकऱ्यांच्या मुगाला पुन्हा एकदा चांगला भाव मिळाला आहे. पाच शेतकऱ्यांचा मुगाचा प्रति क्विंटल १२ हजार ४४० रुपये या चांगल्या दराने लिलाव झाला आहे. उच्च प्रतिच्या मुगाला एवढा बाजारभाव मिळण्यांची ही बाजार समितीमध्ये पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २४ ऑगस्ट रोजी एका शेतकऱ्याचा मुग प्रति क्विंटल ११ … Read more