Ahmednagar News : रुग्णाच्या मृत्यूस जबाबदार धरत नातेवाईकांनी केली हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : सावेडीतील डौले हॉस्पिटल शेजारील हार्टबीट हॉस्पटलच्या दोन डॉक्टरांना रुग्णाच्या मृत्यूस जबाबदार धरत नातेवाईकांनी मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. ६) पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी डॉक्टर चंद्रकांत साहेबराव कदम यांनी फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत फिर्यादीनुसार पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की,

नेवासा तालुक्यातील रांजणगाव येथील बबन रामभाऊ वाघचौरे यांना मंगळवारी (दि.५) रात्री औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वाघचौरे यांचा पहाटे २ च्या सुमारास मृत्यू झाला.

ही बाब डॉक्टर कदम यांनी रुग्णाचा मुलगा अप्पासाहेब बबन वाघचौरे, काकासाहेब बबन वाघचौरे व अन्य तीन नातेवाईकानना दिली होती. मात्र बबन वाघचौरे यांच्या मृत्यूस जबाबदार धरत त्यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली.

हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाची तोडफोड केली. तसेच वैद्यकीय उपकरणे खुर्च्या, बेड आदींचेही नुकसान करण्यात आले. फिर्यादीनुसार तोफखाना पोलिस ठाण्यात भादविकच्या ३२३, ५०४, ४२७, १४३, १४७, १४८, १४९ सह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था नुकसान प्रतिबंधक कायदा कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान या प्रकरणी शहरातील डॉक्टरांनी तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांची भेट घेवून कारवाई करण्याची मागणी केली आहे