सर्वसामान्य जनता हीच शिवसेनेची ताकद : अंबादास पंधाडे

अहमदनगर भगवा या मराठी मातीचा इतिहास आहे. तुमचा आमचा श्वास भगवा, तुमचा आमचा ध्यास भगवा आहे. सवर्सामान्य मावळे ही शिवाजी महाराजांची ताकद होती. शिवसेनेची ताकद ही सर्वसामान्य जनताच आहे. येत्या निवडणुकीत 75 टक्के मतदान शिवसेनेच्या उमेदवाराला होणार आहे, असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे यांनी व्यक्त केला. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ … Read more

नगर मध्ये आरपीआय सेनेच्या अनिल राठोड यांच्या सोबत

नगर :  महायुतीतील भाजप व शिवसेना पक्षाच्या नगर जिल्ह्यातील उमेदवारांचा प्रचार करून आयपीआय युतीचा धर्म पाळणार आहे, अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशानुसार आरपीआय पक्ष युतीचा धर्म पाळणार असून नगर जिल्ह्यातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराचाच प्रचार आम्ही करणार आहेत. पक्षातील काही नाराज असतील तर त्यांची नाराजी … Read more

भिंगारचा ‘ड’ वर्ग नगरपालिकेत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करणार

भिंगार : लोकप्रतिनिधीच्या नाकर्तेपणामुळे भिंगार शहर मागे पडले आहे. येत्या काळात येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी व भिंगारचा ‘ड’ वर्ग नगरपालिकेत समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांनी सांगितले.  पुढे बोलताना राठोड म्हणाले की शिवसेना-भाजपा युतीच्या काळात भिंगारमध्ये अनेक कामे झाली. आपण आमदार असताना भिंगारच्या विकासासाठी स्मशानभूमीची संरक्षक भिंत, विविध भागात हँडपंप, हायमॅक्स, बाजारतळावर … Read more

नगर शहराच्या विकासासाठी अनिल राठोड यांनाच मंत्रीपद !

अहमदनगर :- शिवसेनेचे उपनेते माजी आ.अनिल राठोड यांना मातोश्रीवरून गुलाल घेवून या अन मंत्रीपद घेवून जा असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे,  त्यामुळे नगर शहरातील जनतेने अनिल राठोड यांनाच विजयी कराव आणि शहर विकासासाठी अनिल राठोड यांना मंत्रीपदाची संधी मिळवण्यास सहकार्य करावं असे आवाहन प्रथम महापौर भगवान फ़ूलसौंदर यांनी केले.    नगर शहरात वैद्यकीय … Read more

अनिल राठोड यांच्या प्रचारातील सहभागाबाबत अद्याप निर्णय नाही

नगर – केंद्र व राज्य शासनाने प्रत्येक शहराला व जिल्ह्याला भरीव निधी दिला आहे. नगर शहरालाही तो दिला.मात्र येथील त्यावेळचे महानगरपालिकेचे सत्ताधारी अर्थात शिवसेना कमी पडली. शहराच्या उड्डाणपुलाच्या कामात तर शिवसेनेने अडथळे आणत मला वारंवार त्रास दिला असा आरोप भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांचे नाव न घेता केला.  राठोड … Read more

सत्ता नसल्याने पवारांच्या डोळ्यात पाणी : ठाकरे

अहमदनगर : सत्तेच्या काळात पवारांना जनतेच्या डोळ्यातील अश्रु दिसत नव्हते परंतू आता पाच वर्षे विरोधात राहिल्यानंतर त्यांना अश्रु फुटत आहे. पण हा नादानपणा आहे. अशी परखड टिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर केली. धरण कोरडे पडल्याची व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला ते काय म्हणाले हे जनता विसरली नाही. याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. नगर … Read more

पाच वर्षात त्यांनी फक्त विकासाच्या थापा मारल्या – उपनेते अनिल राठोड

नगर : नगरची जनता हुशार आणि सुज्ञ आहे. त्यांना कुणी कितीही विकासाच्या थापा मारून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्याचे उत्तर जसे लोकसभेच्या निवडणूकीत दिले तसेच उत्तर हया विधानसभेच्या निवडणूकीत देतील.  या लोकप्रतिनिधींनी आपल्या घराच्या जवळ असणारे सारसनगर भागातील नागरीकांना पिण्याचे पाणी देऊ शकले नाही आणि टँकर मुक्तही करू शकले नाही, त्यांनी विकासाच्या खोटया वल्गना करू … Read more

पाच वर्षांत नगर शहराचा बिहार झाला….

अहमदनगर :- गेल्या  ३० ते ३५ वर्षांपासून शिवसेनेचे विचार घेऊन काम केले. प्लॉट, खंडणी, दहशत २५ वर्षे बंद होती, पण मागील पाच वर्षांत शहराचा चेहरा बदलून त्याचा बिहार झाला आहे.अशी टीका माजी आमदार अनिल राठोड यांनी केली.   नंदनवन लॉन येथे आयोजित प्रचार सभेत राठोड बोलत होते, शहराला संरक्षण देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. विकास हा … Read more

Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट अहमदनगर शहर मतदारसंघ

युतीत बेकी, राष्ट्रवादीत दुही अहमदनगर  विधानसभा मतदारसंघात साठच्या दशकानंतर तीन दशकं कोणतीही व्यक्ती दुस-यांदा आमदार होत नव्हती; परंतु शिवसेनेच्या अनिल राठोड यांनी ही परंपरा मोडीत काढली. अहमदनगरची सामाजिक रचना, धार्मिक विभागणी लक्षात घेऊन बहुसंख्याकांच्या मनात अल्पसंख्याकांविषयी सातत्यानं दुहीची बीजं पेरून त्यावर आपली मतांची पोळी भाजून घेण्यात राठोड सातत्यानं यशस्वी होत गेले. त्याला कारण ही अन्य … Read more

अनिल राठोडांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची तोफ नगर मध्ये  धडाडणार!

अहमदनगर :- शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार व माजी आमदार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ अहमदनगर मध्ये आज (बुधवारी) संध्याकाळी सहा वाजता उद्धव ठाकरे यांची सभा नंदनवन लॉन्स येथे होणार आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नगर मध्ये तोफ धडाडणार असून उद्धव ठाकरे काय बोलणार, कोणता संदेश देणार याकडे लक्ष लागले आहे. या सभेत ठाकरे काय बोलतात याची नगर वासियांना उत्सुकता … Read more

माझी शेवटची निवडणूक आहे सहकार्य करा – अनिल राठोड

अहमदनगर – विधानसभा निवडणकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करुन प्रचाराला सुरुवात झाली असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झड़ लागल्या आहेत. उपनेते अनिल राठोड समर्थक माजी खासदार दिलीप गांधी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. शनिवारी राठोड यांनी भाजपाचे नेते वसंत लोढा याची भेट घेतली. ही माझी शेवटचीच निवडणक आहे, मला सहकार्य करा अशी भावनिक साद त्यांनी घातली. … Read more

नगर, पुणे, मुंबई येथे मालमत्ता…अशी आहे अनिल राठोड यांची संपत्ती !

अहमदनगर :- माजी आमदार अनिल राठोड यांच्याकडे ३ कोटी ५९ लाख ७० हजार १६७ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी शशिकला यांच्याकडे ६३ लाख ७५ हजार ४८८ रुपयांची संपत्ती आहे. राठोड यांनी काल निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे उमेदवारी अर्जासह संपत्ती विवरणाचे शपथपत्र सादर केले. त्यानुसार त्यांच्याकडे १ कोटी २० लाख ६५ … Read more

अनिल राठोड यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरला येणार !

अहमदनगर :- नगर शहर विधानसभा मतदार संघात शिवसेनेत प्रवेशाबद्दलच्या काही अफवा होत्या, पण त्यात काहीच तथ्य नव्हते, असे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी सांगितले. नगर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा एबी फॉर्म आणल्यानंतर उपनेते राठोड यांचे केडगावकरांनी रंगोली चौकात स्वागत केले. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, अंगत महानोर, नगरसेवक आमोल येवले, विजय पठारे, सुनील सातपुते, आबा सातपुते,पप्पू ठुबे, … Read more

नगर मध्ये रंगणार भैय्या VS भैय्या लढत

अहमदनगर :- नगर शहर विधानसभा मतदारसंघात मागील २०१४च्या निवडणुकीतही या दोन्ही भय्यांमध्येच प्रमुख लढत झाली होती. त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेस या चारही पक्षांचे उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे या चारही पक्षांच्या उमेदवारांमध्ये मते विभागली गेली, व त्याचा फायदा जगतापांना झाला. २५ वर्षे आमदारकी केल्यानंतर राठोडांचा त्यावेळी पराभव झाला. या पार्श्वभूमीवर यंदा युती व आघाडी … Read more

गुलाल घेऊन या आणि कॅबिनेट मंत्रिपद घेऊन जा !

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेमुळे नगर शहर मतदारसंघात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी माजी आमदार अनिल राठोड यांना सोमवारी पक्षाचा एबी फॉर्म दिल्याने चित्र स्पष्ट झाले. ‘गुलाल घेऊन या आणि कॅबिनेट मंत्रिपद घेऊन जा’, असा शब्दही ठाकरे यांनी त्यांना दिला आहे. त्यामुळे … Read more

उमेदवारी दिली नाही तर काय करणार ?

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत नगर शहरातून शिवसेनेकडून लढण्याची तब्बल पाचजणांनी इच्छा दर्शवली आहे. मुंबईत बुधवारी झालेल्या पक्षाच्या मुलाखतींमध्ये या सर्वांनी आपली बाजू मांडली व शेवटी, ‘पक्षादेश आमच्यासाठी महत्त्वाचा राहील’, असेही आवर्जून स्पष्ट केले. शहरातून मुलाखती देणारांमध्ये माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह माजी महापौर भगवान फुलसौंदर व शीला शिंदे तसेच नगरसेवक बाळासाहेब बोराटे व माजी शहरप्रमुख … Read more

माजी आमदार अनिल राठोडांची वाटचाल बिकट

नगर: नगर शहर विधानसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी ठराव केलेला आहे. नगर शहराची जागा भाजपलाच मिळावी, अशी आमची मागणी आहे. दरम्यान, शिवसेनेला जागा दिली, तरी राठोड यांच्या उमेदवारीला आमचा विरोध असेल असे माजी खासदार तथा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी स्पष्ट केले आहे. निमित्ताने शिवसेना व भाजपचा संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवंद्र … Read more

माजी आमदार अनिल राठोड अस्वस्थ, अहमदनगर शहर शिवसेनेत उभी फूट !

अहमदनगर :- शिवसनेचे उपनेते अनिल राठोड हे नगर शहर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या उमेदवारीचे दावेदार आहेत. मात्र असे असताना शिवसेनेच्या माजी महापौर शीला शिंदे त्याचप्रमाणे माजी महापौर सुरेखा कदम यांचे पती शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजीराजे कदम हेदेखील विधानसभेची तयारी करत आहेत. उपनेते राठोड यांच्या बरोबरीने शिंदे व कदम यांनी वरिष्ठांकडे शहर विधानसभेवर शिवसेनेच्या उमेदवारीचा हक्क सांगितला. … Read more