निर्भयाला न्याय मिळेपर्यंत माघार नाही

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौनव्रताच्या चौथ्या दिवशी म्हसणे फाटा येथील समर्थ अकॅडमीच्या विद्यार्थिनींसह वाशिम व मालेगाव येथील विद्यार्थ्यांनी राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. दरम्यान, दिल्लीतील निर्भयाला न्याय मिळेपर्यंत माघार नाही, असा निर्धार विद्यार्थ्यांना दिलेल्या लिखित संदेशाद्वारे हजारे यांची जाहीर केले. जेथे अन्याय अत्याचार होतो, त्या विरोधात आजवर हजारे यांनी आवाज उठवून … Read more

त्या  आरोपींना फासावर द्या 

पारनेर :   दिल्लीतील निर्भया अत्याचार प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा होऊन सात वर्षे झाली, तरी अद्याप शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी त्वरित करून निर्भयाला न्याय मिळावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे २० डिसेंबरपासून मौन आंदोलन सुरू करणार आहेत.  यासंदर्भात हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रात … Read more

अण्णा हजारे यांची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

पारनेर :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी अवमानकारक वृत्त प्रसिद्ध केल्याने समर्थकांनी बुधवारी संताप व्यक्त करत त्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्याकडे केली. २० नोव्हेंंबरपर्यंत कारवाई न झाल्यास पोलिस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील एका दैनिकाने रामजन्मभूमीच्या निकालानंतर हजारेंच्या तोंडी काही आक्षेपार्ह विधाने घातली. … Read more

आता देशात मंदिर-मशिदीवरून राजकारण होणार नाही : अण्णा हजारे

पारनेर – अयोध्येतील राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय संवैधानिक व लोकतांत्रिक दृष्टीने ऐतिहासिक असल्याचे सांगतानाच या निर्णयानंतर आता आजपर्यंत अनेक वर्षे मंदिर, मशिदीवरून जे लोक राजकारण करत होते, ते आता होणार नाही, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला. राममंदिरावरून अनेक वर्षे वाद विवाद चालले होते. त्यावर आता पडदा पडला आहे. न्यायव्यवस्था सर्वोच्च … Read more

भाजप-सेनेतील वादाबाबत आण्णा हजारे म्हणतात…

पारनेर :- राज्यात भाजप-सेनेमध्ये सुरू असलेला संघर्ष केवळ सत्ता व पैशांसाठी असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी केली. राज्यात सत्तास्थापनेबाबत भाजप व सेनेेमध्ये एकमत होत नसल्याचे हजारे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, निवडणुकीत तर त्यांनी गळ्यात हात टाकले होते ना? मग आता भांडण कशासाठी सुरू आहे? याचा अर्थ … Read more

अण्णांनी दिला आमदार लंकेना विधानसभेत अभ्यासपूर्ण कामगिरी करण्याचा सल्ला

पारनेर :- सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचवण्यासाठी विधानसभेत अभ्यासपूर्ण कामगिरी करण्याचा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवनिर्वाचित आमदार नीलेश लंके यांना दिला. राज्यातील निकाल पाहता मतदार जागा झाल्याचे दिसून आले. हे निकोप व सदृढ लोकशाहीचे लक्षण असल्याचे हजारे यांनी यावेळी सांगितले. विजय संपादन केल्यानंतर लंके यांनी राळेगणसिद्धीत जाऊन हजारे यांचे आशीर्वाद घेतले. हजारे यांनी त्यांचे … Read more

राजकीय पक्ष आणि पार्ट्यांमुळे देशाच्या विकासाला खीळ- अण्णा हजारे

पारनेर : राजकीय पक्ष आणि पार्ट्यांमुळे खेड्यांचा विकास थांबला आहे. पर्यायाने देशाच्या विकासाला खीळ बसली प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. राळेगणसिद्धी येथे पार पडलेल्या सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या कार्यक्रमप्रसंगी हजारे बोलत होते.  या वेळी महासंघाचे अध्यक्ष नामदेव घुले, सरचिटणीस अशोक सब्बन, सहचिटणीस दत्ता आवारी, उपाध्यक्ष कैलास पटारे, उपाध्यक्ष रोहिणी गाजरे, संघटक प्रवीण साठे, खजिनदार … Read more

..तर अण्णा ‘पद्मभूषण’ परत करणार

पारनेर :- लाेकायुक्त, लाेकपाल नियुक्तीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेल्या ५ दिवसांपासून राळेगण सिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपाेषण सुरू आहे. …केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही ! जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी त्यांची भेट घेऊन चर्चा केली व उपाेषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आता केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही, जाेपर्यंत निर्णय हाेत नाही ताेपर्यंत … Read more