श्रीगोंदा तालुक्याला परत एकदा लाल दिवा मिळणार का ?

श्रीगोंदा : अतिशय चुरशीच्या झालेल्या श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत अगदी शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये भाजपचे बबनराव पाचपुते यांनी आघाडी मिळवली आणि पाचपुते हे अटीतटीच्या लढाईत विजयी झाले. पाचपुतेंच्या विजयामुळे श्रीगोंद्यात पहिल्यांदाच विधानसभेला कमळ फुलले आहे. निकाल लागल्यानंतर बबनराव पाचपुते व त्यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते या दोघांनी तातडीने मुंबईला जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील … Read more

महाजनादेश यात्रेमध्ये कोण कोण भाजपमध्ये प्रवेश करणार ?

संगमनेर :- भाजपच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा नगर जिल्ह्यात पुन्हा सुरू होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी मंडपाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. येत्या शुक्रवारी अकोले येथून दुपारी १२ वाजता यात्रेचे संगमनेरमध्ये आगमन होईल. अकोले नाक्यावर यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून, जाणता राजा मैदानावरील जाहीर सभेत मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे … Read more

भाजपने अष्टपैलू नेता गमावला

अहमदनगर :- भारतीय जनता पक्षाने अलीकडच्या काळात तीन बहुमोल हिरे गमावले आहेत. यातील अरुण जेटली हे अर्थतज्ज्ञ, अभ्यासू व विचार प्रगल्भ विचारवंत नेते होते. अशा महान नेत्याच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने पक्षाने अष्टपैलू नेता गमावला आहे, अशा शब्दांत शहर भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी स्व.अरुण जेटली यांना श्रद्धांजली … Read more

आमदार वैभव पिचड राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भाजप – सेनेच्या वाटेवर…

अकोला :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पूत्र आमदार वैभव पिचड भाजपमध्ये जाणार, अशी अफवा मागील काही दिवसांपासून होती. आज अखेर तीच अफवा खरी ठरू पाहत आहे. अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड भाजपचा गळाला लागले असून, आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दिवसभर खलबते सुरू असल्याचे … Read more

अकोल्याची जागा भाजपला मिळाल्यास नक्की जिंकणार

अकोले :- अकोले विधानसभा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून ही जागा शिवसेना लढवते. मागील निवडणुकीत युती नसताना भाजप तीन नंबरवर राहिला. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत यश भाजपला मिळाले. लोकसभेत जरी तालुक्यातून पीछेहाट झाली असली, तरी खासदार सदाशिव लोखंडे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी घेतलेली भूमिका आदिवासी जनतेला मान्य झाली नाही. अकोल्याची जागा … Read more

माजी आमदार अनिल राठोडांना आमदारकी नाही ?विधानसभेसाठी भाजप नेत्यांकडून निवडणुकीची तयारी

अहमदनगर :- लोकसभेच्या निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपला मिळालेल्या दणदणीत यशानंतर स्थानिक पातळीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. आतापासूनच त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या पाच विद्यमान आमदारांबरोबरच अन्य विधानसभा मतदारसंघातही भाजपची ताकद वाढवण्यासाठी या मतदारसंघातून विधानसभेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. लोकसभेत नगर शहर मतदार संघातून डॉ. सुजय … Read more

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंसमोरील अडचणीत वाढ होणार

अकोले :- शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उभे असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षशिस्तभंगाची कारवाई म्हणून पक्षातून हकालपट्टी केली. आता त्यांच्या पदरात भाजपकडून दान म्हणून टाकलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदाचा राजीनामा त्यांनी द्यावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चाने केली आहे. त्यामुळे वाकचौरेंसमोरील अडचणीत वाढ होणार आहे. साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदाचा राजीनामा … Read more

निष्ठावंत भाजप करणार संग्राम जगतापांचे काम !

श्रीगोंदा :  भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वेगळी वागणूक देत पक्षाच्या कार्यक्रमातून कायमच बाजूला ठेवले. तालुक्यातील नेत्यांच्या या वागण्याला पालकमंत्री व खासदार यांनीही एक प्रकारे पाठबळच दिल्याने निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप करीत लोकसभा निवडणुकीप्रसंगी काँग्रेस आघाडीचे काम करण्याचा निर्णय करणार असल्याचे निष्ठावंत भाजप पदाधिकार्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची  शहरातील बालाजी मंगल कार्यालयात बैठक झाली . त्यात … Read more

भाजपच्या व्यवस्थापन समितीतून खा. गांधीना वगळले!

नगर : भारतीय जनता पक्षाच्या नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या व्यवस्थापन समितीची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा निवडणूक प्रमुख राम शिंदे यांनी केली. या समितीतून खा. गांधी यांना वगळण्यात आले. संयोजकपदी प्रसाद ढोकरीकर, निवडणूक सहप्रमुखपदी अभय आगरकर, प्रचार प्रमुखपदी नामदेव राऊत, आचारसंहिता प्रमुखपदी (कायदेशीर) अ‍ॅड.युवराज पोटे यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून नगर दक्षिण … Read more

अहमदनगर भाजपा कार्यालयाला जागा मिळेना !

अहमदनगर :- सत्तेवर असलेल्या भाजपच्या जिल्हा ग्रामीण कार्यालयासाठी गेल्या पाच वर्षांपासून जागेचा शोध सुरू आहे. काही जागा पाहून झाल्या, मात्र पक्षाकडे आर्थिक बजेट नसल्याने हे व्यवहार फिसटकले. त्यामुळे पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर कुणी पक्ष कार्यालयासाठी जागा देता का जागा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. नगरमध्ये गांधी मैदान येथे पक्षाचे कार्यालय आहे. या पक्षाची कार्यालयाची चावी विद्यमान … Read more

भाजपा कार्यकर्त्यांचा लोकसभा प्रचारावर बहिष्कार !

कोपरगाव :- जोपर्यंत भाजपाच्या निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या (नरेंद्र मोदी विचार मंच) भावना समजावून घेत नाहीत, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाग घेणार नसल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकाद्वारे दिली. कोपरगाव शहर व तालुक्‍यातील नरेंद्र मोदी विचार मंच व निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रहितासाठी नरेंद्र मोदींना … Read more

निष्ठावंत भाजप कार्यकर्ते डॉ. सुजय विखेंच्या प्रचारापासून दूर.

अहमदनगर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत.  डॉ. सुजय यांना भाजपकडून दक्षिणेची उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून ही उमेदवारी देण्यात आली.  या पार्श्वभूमीवर गांधी यांनी मेळावा घेतला. या मेळाव्यात गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करत अपक्ष … Read more

डॉ . सुजय विखेंना भाजपचे ‘ टेन्शन ‘

अहमदनगर :- डॉ . सुजय विखे यांना भाजप प्रवेशाच्या आदल्या दिवशीच टेन्शन मध्ये असल्याचे दिसून आले . विखे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधून जोरदार विरोध सुरू झाला आहे.  त्याचवेळी विखे यांचे समर्थकही भाजपमधील प्रवेशाबाबत चिंताजनक आहे . विखेसमोरच काही कार्यकर्त्यांनी नव्या पक्षात गेल्यानंतर पुढील वाटचालीबाबत काळजी व्यक्त केली.  नगरजवळील विळद घाट येथील विखे यांच्या कार्यालयात डॉ … Read more

लवकरच नगरला ३०० कोटी मिळणार !

  अहमदनगर – सरकार महापौरांच्या पाठीशी असून मनपाला ३०० कोटी देणार आहोत. नगरला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. आगामी काळातील लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दानवे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ३६ मतदारसंघांत दौरे केले आहेत. बुथस्तरापासून संघटन करण्याचा त्यांचा उद्देश आहे. आम्ही जेथे शब्द दिले ते पाळले आहेत.शुक्रवारी … Read more