BIG NEWS : मुख्यमंत्री ठाकरे आजच राजीनामा देण्याची शक्यता

Maharashtra Politics : बहुतमत चाचणी सिद्ध करण्याच्या अधिवेशनाला सामोरे जाण्याआधीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा देण्याचे ठरविले असल्याचे सांगण्यात येते. सायंकाळी होणाऱ्या सुनावणीचा निकाल काहीही लागला, तरी आज सायंकाळीच राजीनामा द्यायचा, असा त्यांचा विचार असल्याचे समजते.माझी माणसं माझ्याविरोधात गेल्याचे मी बघू शकणार नाही, अशी त्यांची भावना असल्याचे सांगण्यात येत. तर दुसरीकडे मतांचे आकडेही आणखी घटत … Read more

देहूत अजितदादांचे भाषण का नाही? महाराष्ट्र भाजपने टीकाकारांना सुनावले

Maharashtra news : देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न दिल्याबद्दल भाजपवर टीका सुरू झाली आहे. या टीकाकारांना प्रदेश भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे.प्रदेश भाजपने म्हटले आहे, देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नव्हता, तर खाजगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खाजगी कार्यक्रमाला नाही. शिवाय स्वत: … Read more

आधी खांद्यावर हात, नंतर ‘तोंड दाबले’, मोदींच्या दौऱ्यात अजितदादाच चर्चेत

Maharashtra news : देहू येथील श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आले होते. त्यांच्या या दौऱ्यात चर्चा झाली ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच. पुण्यातील लोहगाव लोहगाव विमानतळावर मोदी यांचे स्वागत करण्यासाठी गेलेल्या अजितदादांच्या जवळ येऊन मोदींच्या त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. या जवळकीची चर्चा होत असताना प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी मात्र … Read more

पुणतांब्यात आज पुन्हा ग्रामसभा, शेतकरी आंदोलनाचे काय होणार?

Ahmednagar News : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनाच हाक देणऱ्यापुणतांब्यात आज पुन्हा ग्रामसभा बोलविण्यात आली आहे. काल मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीतील चर्चेची माहिती ग्रामस्थांना देण्यात येणार आहे. त्यानंतर स्थगित केलेल्या आंदोलनासंबंधी पुढील निर्णय होणार आहे.मुंबईत १४ मागण्यांच्या ७० टक्के मुद्द्यांवर सहमती झाल्याची माहिती सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी दिली आहे. पुणतांब्यात १ पासून धरणे आंदोलन सुरू … Read more

कोरोना वाढतोय, मुख्यमंत्र्यांनी उचलले हे पाऊल

Maharashtra news : मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सरकारकडूनही आता हाचलाची सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने राज्याच्या कोरोना टास्क फोर्सची बैठक बोलाविली आहे. यामध्ये परिस्थितीचा आढावा घेऊन काही प्रतिबंधात्मक उपायासंबंधी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना कमी झाल्यानंतर मास्कसक्ती हटविण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा रुग्ण वाढू … Read more

शरद पवारांसाठी अजितदादांना दिला होता राजीनामा…

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काका-पुतण्यांची जोडी राजकारणात प्रसिद्ध आहे. काकांचा हात धरून पुतण्याचे राजकारण चालत असल्याचे सर्वजण मानतात. मात्र, एकदा अजितदादांनी आपल्या काकांसाठी सहा महिन्यांतच पदाचा राजीनामा दिला होता. ही राजकीय सोय काय होती, कोणाच्या सांगण्यावरून केली, … Read more

कोपरगावमध्ये अजितदादा सुसाट, राज ठाकरेंना सुनावलं, मतदारांनाही दिलं आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Ahmednagar Politics :- उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिर्डी व कोपरगावच्या दौऱ्यावर होते. आपल्या खास शैलीत त्यांनी राज ठाकरेंना सुनावलं तसेच मताधिक्याच्या मुद्द्यावरून कोपरगावच्या मतदारांनाही आहान दिलं. शिर्डीच्या कार्यक्रमात त्यांच्या कानात काही तरी सांगू पाहणारे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांना त्यांनी चार वेळा हात जोडून नकार दिला. शिर्डीत पोलिस … Read more

आमदारांना घरे : मंत्री चव्हाण म्हणाले, असा निर्णयच नाही

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :- ग्रामीण भागातील ३०० आमदारांना मुंबईत म्हाडातर्फे घरे देण्याच्या निर्णयावरून राज्यभर रान पेटलं आहे. यावरून होणाऱ्या टीकेला शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून उत्तरं देण्यात आली. मात्र, काँग्रेसचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे. घरं देण्याचा निर्णयच झालेला नाही, त्यामुळं त्याची अंमलबजावणी होण्याचाही प्रश्न नाही, … Read more

बिग ब्रेकिंग : शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन्ससंबंधी सरकारची मोठी घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News:- विरोधकांची आंदोलने आणि शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून महाविकास आघाडीच्या सरकाराने शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन्ससंबंधी आपली भूमिका बदलली आहे. सध्याचे पीक हातात येईपर्यंत पुढील तीन महिने शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम थांबविण्याची घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केली. मात्र, इतर ग्राहकांनी वीज बिलांची थकबाकी वेळेत भरावी, असे आवाहनही … Read more

मोठी बातमी ! पुण्यातील शाळा-महाविद्यालयांबाबत अजित पवारांची मोठी घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आता घट होताना दिसत आहे. त्यासोबतच लसीकरणही वेगाने सुरू आहे. त्यामुळे आता पुण्यातील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळा आणि महाविद्यालये येत्या १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासनाने यासंदर्भातला निर्णय घेण्याचे … Read more

नोटा मोजायला वेळ मिळतो, तर हेही काम करा; पालकमंत्र्यांकडून मेडिकल धारकांची शाळा

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- कोरोनाचा वाढता पार्दुभव पाहता खेळाडूंची होणारी गैरसोय, नागरिकांसाठी देवस्थान दर्शनाची अनुमती आणि पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची मुभा या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन महिती दिली आहे. तसेच पवारांनी कोरोना टेस्टची किट्स घेऊन जाणाऱ्यांचे नंबर नोंद ठेवण्यात वेळ जात असतो, अशी मेडिकल स्टोअर्स … Read more

अहमदनगर जिल्ह्यासाठी 540 कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- जिल्‍हा वार्षिक योजनेत (सर्वसाधारण) सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यासाठी 540 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा राज्‍याचे वित्‍त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय बैठकीत अहमदनगर जिल्ह्याची आढावा बैठक घेतांना आश्वस्त केले. राज्यस्तरीय बैठकीत मुंबई येथून दूरदृष्य प्रणालीव्दारे जिल्ह्याच्या सन 2022-23 … Read more

राज्यातील शाळा उघडण्यावर ‘या’ दिवशी निर्णय होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  कोरोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव पाहता राज्यातील शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहता यावर पुन्हा निर्णय घेण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सध्या बंद असलेल्या शाळा उघडण्यावर सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या त्यासाठी सकारात्मक आहेत. या … Read more

झेडपीचा सर्वाधिक निधी आरोग्य -ज्ञान मंदिरांसाठीच दिला

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  कोरोना काळात सर्वसामन्यांना उपचारासाठी मोठा खर्च तसेच त्रास सहन करावा लागला, कित्येकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाची परिस्थिती अतिशय भयानक असताना शासकीय व खासगी डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून कित्येकांचे प्राण वाचविले,ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचा सर्वाधिक निधी हा भविष्याच्या दृष्टीने आरोग्य मंदिरे व ज्ञान मंदिरांसाठी खर्च … Read more

अद्याप लॉकडाऊनबाबत कोणताही निर्णय झालेला नाही…

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- राज्यात वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तात्काळ लॉकडाऊन लागू करणार नसून संसर्ग रोखण्यासाठी अतिरिक्त निर्बंध कडक करणायचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार आज रात्रीपर्यंत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची शक्यता आहे. राज्यात मंगळवारी 18,466 नवीन पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली … Read more