ग्रामपंचायतींनी निवडणूका बिनविरोध कराव्यात; या महिला पदाधिकाऱ्यांनी केली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :-निवडणूक दरम्यानचे वाद, कटुता आदी गोष्टींना आळा बसावा यासाठी कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतींनी निवडणूका बिनविरोध कराव्यात, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती अश्विनी कानगुडे यांनी केले आहे. गावातील पुढाऱ्यांना आपल्या गावात विकास व्हावा असे वाटत असते. प्रत्येक पक्षाचे नेते सत्ता हस्तगत करण्यासाठी धडपड करत असतात. सध्याच्या परिस्थितीत निवडणुका पार पाडताना कार्यकर्त्यांमध्ये … Read more

डिझेलची चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :-कर्जत तालुक्यातील नगर-सोलापूर रस्त्यावर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना हायवा गाडीतून डिझेल काढून चोरी करताना दोन जणांना पकडले. नगर-सोलापूर रस्ता हा चोरट्यांचा अड्डा झाला होता. नुकतेच कर्जत येथे उपनिरीक्षक म्हणून हजर झाले पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त व्हावा म्हणून गस्ती पथक तयार केले. याच गस्ती पथकातील … Read more

आमदार रोहित पवार यांच्या पवार पॅटर्नला यश

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या व अनेक जिल्ह्यांना जोडणाऱ्या नगर-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या (५१६ अ) चौपदरीकरण कामाची ई-निविदा नुकतीच जाहीर झाली. त्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. नगर-मिरजगाव-करमाळा-टेंभुर्णी या महामार्गाच्या नगर ते घोगरगाव या ३८.७७५ किलोमीटर कामासाठी ५४७.१६ कोटी, तर … Read more

अखेर ‘या’ राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणार! ई-निविदा निघाल्याने आ.रोहित पवारांनी मानले ना. गडकरींचे आभार

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या व अनेक जिल्ह्यांना जोडणाऱ्या नगर-सोलापुर या राष्ट्रीय महामार्ग क्र.५१६ (अ) या चौपदरी महामार्गाच्या कामाची इ-निविदा नुकतीच जाहीर झाली. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानले आहेत. नगर-मिरजगाव-करमाळा-टेंभुर्णी क्र.५१६(अ) महामार्गाच्या नगर ते घोगरगाव या ३८.७७५ कि.मी. कामासाठी ५४७.१६ कोटी एवढा निधी … Read more

संशय वाटल्याने पोलिसांनी भरधाव वेगाने जाणारी कार अडवली आणि सापडली ‘ही’ वस्तू !

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-  ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने कर्जत तालुक्यात पोलिस गस्त करीत असताना दि.१८ रोजी सायंकाळी साडे आठच्या सुमारास बारडगाव-राशीन रस्त्यावर टाटा सफारी (एम. एच.१२ जीके ३७७१) ही भरधाव वेगाने राशीनच्या दिशेने जाताना पोलिसांना दिसली. याबाबत संशय वाटल्याने पोलिसांनी धुमकाई फाटा या ठिकाणी सदरचे सफारी वाहन अडवले असता या गाडीत फक्त वाहन चालवणारा … Read more

अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे सोमवार पासून जिल्हा दौऱ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष व कार्याध्यक्षांच्या मागील महिन्यात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांनी श्रीगोंद्याचे युवानेते स्मितल भैय्या वाबळे यांची जिल्हाध्यक्षपदी तर उत्तर नगर कार्याध्यक्षपदी सुभाष सांगळे व दक्षिण नगर कार्याध्यक्ष पदी राहुल उगले यांची नियुक्ती करून सदर निवडीचे पत्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब … Read more

आमदार रोहित पवार यांच्याकडून कर्जत-जामखेड पोलिसांना अत्याधुनिक चारचाकी वाहने गिफ्ट !

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-कर्जत-जामखेड पोलीस दलासाठी एकात्मिक विकास संस्थेमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मिळालेली वाहने या दोन्ही तालुक्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होऊन गुन्हेगारी रोखण्यास तसेच सर्वसामान्यांना, माता भगिनींना दिलासा देण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे व्यक्त केला. कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेमार्फत कर्जत-जामखेड येथील पोलीस बांधवांना देण्यात येणाऱ्या … Read more

कर्जतच्या स्वच्छता अभियानाला आता तंत्रज्ञानाची जोड

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  कर्जत शहराच्या कचरा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करून कर्जत कचरामुक्त करण्यासाठी आता आमदार रोहित पवारांनी चांगलीच शक्कल लढवली आहे. कचरा व्यवस्थापनासाठी त्यांच्या संकल्पेतून सॉफ्टवेअर प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.मध्यप्रदेशातील इंदौरच्या धर्तीवर या सॉफ्टवेअर प्रणालीची निर्मिती केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून शहरातील ओल्या व सुक्या कचऱ्यावर ही प्रणाली काम करणार … Read more

उसाचा ट्रॅक्टर रस्त्याच्यालगत कोसळला

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- कर्जत तालुक्यातील करमनवाडी येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात झाला असल्याची घटना घडली आहे. मंगळवार (दि१५ डिसेंबर) रोजी सर्कलच्या सुमारास हा अपघात घडला होता. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर खड्ड्यात जाऊन कोसळला. या अपघातातून चालक गजानन चव्हाण (रा. पुसद, … Read more

कर्जतमधील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी यांच्या खांद्यावर

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- जिल्हा पोलीस दलात बदल्यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. नुकतेच कर्जत पोलीस ठाण्याचा पदभार चंद्रशेखर यादव यांच्या हाती सोपविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांची कर्जतहून अहमदनगरच्या नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागेवर चंद्रशेखर यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यादव यांनी यापूर्वी सेवाग्राम, … Read more

नागरिकांना होतोय दूषित पाणी पुरवठा; प्रशासनाला दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- कर्जत तालुक्यातील मिरजगाव मध्ये गेले तीन महिन्यापासून वार्ड क्रमांक 3 पिण्याच्या पाण्याच्या नळकनेक्शन मध्ये गटारीचे पाणी येत आहे. यापूर्वी केवळ मोटार जळाली म्हणून गावात दहा दिवस पाणी सोडले नाही. यात ग्रामपंचायत प्रशासनाला गावच्या पाणी पुरवठ्याचे काही देणेघेणे नाही. गावचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला तेव्हा ग्रामपंचायतीचे अधिकारी व प्रशासक … Read more

चक्क दिरानेच केला भावजयीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- कर्जत तालुक्यातील होलेवाडी येथील ३८ वर्षीय विवाहित महिलेवर सख्ख्या दिरानेच बलात्कार केला. याबाबत पिडीत महिलेने कर्जत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, पिडीत महिला ही कर्जत तालुक्यातील होलेवाडी येथे पती व मुलगा यांच्याबरोबर राहते. गुरूवारी रात्री ७.३० वाजता पती हे रानात जनावरांना चारा आणण्यासाठी गेले … Read more

खासदार डॉ. सुजय विखे म्हणतात हीच खरी संपत्ती

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-उपेक्षितांचे आशीर्वाद हीच खरी मौलिक संपत्ती आहे. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी एसएनआरच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमात प्रवरा परिवार खंबीरपणे पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. कर्जत येथे एसएनआर लघु व मध्यम उद्योग विकास समूहाच्या वतीने प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संकल्पनेतून “आपले गाव, … Read more

‘त्या’ वृद्धाचा संशयास्पद मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- कर्जत तालुक्यातील भोसे येथील वृद्धाचा संशयास्पद मृत्यूबाबत कर्जत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गुरूवारी रात्री साहेबराव मुक्ताजी चव्हाण (वय ७०) हे पडवीत झोपले होते. पहाटे तीन वाजता त्यांची सून पाणी पिण्यासाठी उठली असता चव्हाण हे खाली पडलेले दिसले. त्यांच्याजवळ जाऊन पाहिले असता नाका-तोंडाजवळ रक्त दिसल्याने त्यांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलीस पाटलांच्या वडिलांचा संशयास्पद मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हे पुन्हा एकदा वाढले आहेत, खून बलात्कार व विनयभंग ह्या घटनांनी जिल्हा रोजच हादरत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एका व्यक्तीचा (वय ७०) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. साहेबराव मुक्ताजी चव्हाण असे मयत व्यक्तीचे नाव … Read more

आणि रोहित पवारांनी स्वत: हातात काठी घेतली!

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे,आमदार रोहित पवार यांच्या कर्जत तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याचा आदेश झाला असला तरी पोलिस आणि वन अधिकऱ्यांना तो सापडत नाही. त्याचे हल्ले सुरूच असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात दिराचा भावजयीवर बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- कर्जत तालुक्यातील होलेवाडी येथील ३८ वर्षीय विवाहित महिलेवर सख्ख्या दिरानेच बलात्कार केला याबाबत पिडीत महिलेने कर्जत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, होलेवाडी येथे पिडीत महिला ही पती व मुलगा याच्या बरोबर राहते. गुरूवारी रात्री ७.३०वा.पीडितेचे पती हे रानात जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. … Read more

रावसाहेब दानवे यांच्या ‘त्या’ विधानावर रोहित पवार म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा रोहित पवारांनी चांगलाच समाचार घेतला आहे. विरोधी पक्षातले लोक नुसतेच वक्तव्य करतात, त्याला काही आधार नसतो, असा टोला रोहित पवारांनी दानवेंना लगावला आहे. शेतकरी स्वतःच्या हितासाठी लढत आहेत, जर त्याला तुम्ही भारताच्या बाहेरून पाकिस्तान आणि चीनमधून काही जण येऊन या लोकांना प्रेरित करतात, … Read more