माजी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांचे उपोषण अल्पावधीतच स्थगित;’हे’आहे कारण

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 : कुकडी कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे सोमवारी सकाळी ११ वाजता कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. काही वेळातच तहसीलदार नानासाहेब आगळे, कुकडीचे कार्यकारी अभियंता रामदास जगताप आदींनी येवून त्यांच्याशी चर्चा केली. सकारात्मक चर्चेनंतर प्रा.शिंदे यांनी आंदोलन स्थगित केले. प्रा. राम शिंदे यावेळी म्हणाले, … Read more

दिलासादायक बातमी : ‘त्या’ चिमुरडीची कोरोनावर यशस्वी मात

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- आजीसह मुंबईहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेली सहा वर्षीय चिमुरडी कोरोनाचा लढा यशस्वीपणे लढून आणि त्याच्यावर मात करुन सुखरुप घरी परतली आहे. आज येथील बूथ हॉस्पिटलमधून या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेसइतर स्टाफही गहिवरला. कोरोना वॉर्डमधून बाहेर येताच त्यांनी या मुलीला पुष्पगुच्छ देत तिचे … Read more

एकाच कुटुंबातील तिघाजणांना झाली कोरोनाची बाधा !

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील एकाच कुटुंबातील तिघाजणांना कोरोना ची बाधा झाली आहे तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता सहा झाली आहे. कर्जत तालुक्यातील राशीन येथील पुणे येथून पत्नीस भेटून आलेल्या व्यक्तीला कोरोना ची बाधा झाली असल्याचे निष्पन्न होताच आरोग्य विभागाने तात्काळ त्याच्या कुटुंबातील चार जणांना नगर येथे जिल्हा रुग्णालयांमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ तरूणाचा उपचारा दरम्यान मृत्यू

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-  कर्जत तालुक्यातील खांडवी येथे परवा झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या काकासाहेब मच्छद्रिं तापकीर वय ३० या तरूणाचा काल दुपारी नगर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. खांडवी येथे हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी (९ एप्रिल) दोन गटात वाद झाला. त्यावेळी दोन्ही गटांनी कर्जत पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या वादात … Read more

…तर अहमदनगर मध्ये आलेल्या ‘त्या’महिलेचा जीव वाचला असता …

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- राशीन येथे लेकीच्या घरी आलेल्या महिलेचा मृत्यु झाल्यानंतर अहवाल कोरोना पॉझिटिव आला. मात्र याच महिलेला 16 मे रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते त्यावेळी आरोग्य यंत्रणेने त्या महिलेच्या घशाचा स्त्राव घेतलाच नसल्याची माहिती हाती आली आहे. हा हलगर्जीपणा आता कर्जतकरांचा अंगलट येण्याची भीती आहे. मुंबईच्या वाशी येथून ही महिला … Read more

कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना राज्य सरकार निष्क्रीय

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करून करोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन सुरू आहे. राज्यातील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे. या राज्यव्यापी आंदोलनात भाजपाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्याकडून जिल्हाधिकारी, तहसिलदारांना यांना निवेदन देण्याची मोहीम राबविण्यात … Read more

माजीमंत्री राम शिंदेनी सांगितले उमेदवारी न मिळाल्याचे कारण !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- पक्षांतर्गत कोणत्याच वादावर कधीही जाहीर भूमिका न घेणाऱ्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी देखील या विषयावर सोशल मिडीयातून आपली नाराजी व्यक्त केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत वेळी पक्षाने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रा. राम शिंदे आदी नेत्यांना उमेदवारी डावलण्यात आली होती तेव्हापासून पक्षांमध्ये अंतर्गत वाद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार,मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांना कुऱ्हाडीने मारहाण !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-  जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात नराधमाने अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार करत मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांना कुऱ्हाडीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कर्जत तालुक्यातील आनंदवाडी परिसरात राहणारी एक १७ वर्षाची अल्पवयीन विद्यार्थिनी घरात एकटी असताना काल संध्याकाळी आरोपी संतोष बिराजी खरात हा घरात घुसला, तरूणीला बळजबरी … Read more

पवार घराण्याला विरोधासाठी राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी ?

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- राम शिंदे मंत्री असताना जिल्ह्यात भाजपचे पारडे जड होते. आता पक्षाचे तीन आमदार आहेत, परंतु राज्यातील सत्ता जाताच जिल्ह्यातील भाजप दिसेनाशी झाली आहे. जिल्ह्यात भाजपला ऊर्जितावस्था आणण्यासाठी व पवार घराण्याला प्रबळ विरोधासाठी राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने त्यांची जुळवाजुळव सुरू आहे. शिंदे यांच्यासह … Read more

प्रा.राम शिंदे यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड करण्यात यावी !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ बहुजन समाजाचे ओबिसी समाजाचे महाराष्ट्र राज्याचे नेते कर्तव्य दक्ष माजी कॅबिनेट मंत्री प्रा.राम शिंदे यांची विधान परिषेदेवर आमदार म्हणून निवड करुन बहुजन समाजाला तसेंच ओबिसी व धनगर समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील समाज बांधवांच्या वतीने पांडुरंंग माने यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

रोहित पवार म्हणाले कर्जत-जामखेडला कोणत्याही वेगळ्या पॅटर्नची गरज नाही …कारण

अहमदनगर Live24 :- आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जामखेड शहरातील प्रत्येक कुटुंबीयांचा सर्वे करुन आरोग्य तपासणी करण्याचे काम सुरू आहे. नगर जिल्ह्यातील जामखेड शहरात सर्वात जास्त रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे सर्वे होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. जामखेड शहरातील कोरोना बाधीतांची संख्या ही आता १७ वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या … Read more

…म्हणून ‘या’ तालुक्यात अद्याप कोरोनाचा एकही रूग्ण आढळला नाही !

कर्जत : तालुक्यात अद्याप कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. परंतु खबरदारी म्हणून आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय व नगर पंचायत यांनी पोलिसांच्या मदतीने तयारी केली आहे. तालुका आरोग्य विभागात ५ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३५ आरोग्य उपकेंद्रांतर्गत एकूण ३८१ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात १२ वैद्यकीय अधिकारी, १५४ आरोग्य कर्मचारी व २१५ आशा सेविका … Read more

रोहित पवारांच्या मतदारसंघात ८ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

अहमदनगर Live24  :- कर्जत तालुक्यात आठ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून या गावात टँकर सुरू करणे आवश्यक असल्याने सभापती सौ. अश्विनी कानगुडे यांनी पंचायत समितीमध्ये याबाबत आढावा घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असताना काही गावात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या गावात शासकीय टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत पंचायत समितीमधून … Read more

अचानक कोरोनाचा एक रुग्ण सापडल्याची जोरदार अफवा वाऱ्यासारखी पसरली….

कर्जत :- तालुक्यातील एका महिलेस सारी आजाराच्या संशयावरून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. यानंतर मात्र कर्जतमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्याची जोरदार अफवा पसरली. त्यामुळे चुकीची माहिती प्रसारीत केल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड यांनी दिली. कर्जत तालुक्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्वांनीच सुस्कारा सोडला असताना … Read more

रोहित पवारांचा कर्जत-जामखेडसाठी पुन्हा ‘मदतीचा हात’ ! १५ हजार कुटुंबांसाठी ४ ट्रक कांदा-बटाटे

अहमदनगर – कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनच्या वाढलेल्या कालखंडात कर्जत-जामखेडसाठी आमदार रोहित पवार यांच्याकडून पुन्हा एकदा ‘मदतीचा हात’ पुढे आला आहे. मतदारसंघातील गोर-गरीब शिधापत्रिका नसणाऱ्या, भूमीहीन, मोलमजुरी करणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या, ज्यांना शिधापत्रिका आहेत परंतु त्यांची शासनस्तरावर नोंदणी नसल्याने धान्य मिळत नसलेल्या लोकांना आता एक किलो कांदा व एक किलो बटाटा देण्यात येणार आहे. … Read more

प्रा. राम शिंदे झाले मतदारसंघात सक्रीय !

कर्जत – विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवली होती. पराभवानंतर त्यांनी मतदारसंघाचा दौरा करून मतदारांच्या गाठीभेटीही घेतल्या नाहीत. मात्र, करोनामुळे अडचणीत असलेल्या काळात त्यांनी सक्रिय होत जनतेला आधार द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्जत – जामखेड मतदारसंघातील जनतेतून बरे झाले, प्रा. राम शिंदे सक्रिय झाले अशी लोकभावना उमटत … Read more

आ. रोहित पवारांतर्फे मतदारसंघात पाच मालट्रक धान्य !

अहमदनगर :-  कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनमुळे अल्पकालावधीसाठी स्थलांतरीत झालेल्या व निराधार, मजुर, हातावर पोट असणाऱ्या कर्जत-जामखेडच्या लोकांना आमदार रोहित पवार यांनी दिलासा दिला आहे. त्यांच्याकडून रविवारी पाच ट्रक धान्य कर्जत येथे पोहोच करण्यात आले आहे. मतदारसंघातील हजारो गरजू लोकांना गहू व डाळ असे जीवनावश्यक धान्य कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडे पोहोच करण्यात आले आहे. ज्यांना आवश्यता … Read more

यमराज म्हणतोय नियम पाळा; अन्यथा मी घेऊन जाईन…

अहमदनगर / कर्जत :- लॉकडाऊन काळात कोणीही घराबाहेर पडू नका, संचारबंदीचे नियम पाळा; अन्यथा मी घेऊन जाईन. त्यामुळेच घरात रहा आणि सुरक्षित रहा, असे आवाहन स्वतः यमराज कर्जत शहरात करताना दिसत आहे. कर्जत नगर पंचायतीच्या वतीने कोरोनाच्या जनजागृतीसाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. कर्जत शहर आणि तालुक्यात आजतागायत कोरोनाच्या लढाईत स्थानिक प्रशासनाने चांगले यश … Read more