नगरमधील शिंदेशाही धोक्यात, गड येईल पण सिंह जाईल?

कर्जत – जामखेड – जिल्ह्यात युतीचे भाजपाचे वारे जोरात आहेत. येथे विखेंनी १२ – ० ची वल्गनाही केली आहे. मात्र, त्यात काही प्रमाणात यश आले तरी सध्याच्या परिस्थितीतून कर्जत – जामखेडची जागा धोक्यात असल्याने नगरमध्ये गड आला पण सिंह गेला, अशी अवस्था होते की काय? अशी भिती आता भाजपातूनच व्यक्त केली जात आहे. ना. राम … Read more

विधानसभा निवडणुकीच्या वादातून राडा

कर्जत : विधानसभा निवडणुकीच्या वादातून कर्जत तालुक्यात राडा झाला असून, यासंदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी संध्याकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास धांडेवाडी येथे घडलेल्या घटनेबाबत कर्जत पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत कर्जत तालुका भाजपचे अध्यक्ष अशोक खेडकर यांनी म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी धांडेवाडी येथे बैठक झाली. बैठकीनंतर बाहेर … Read more

पालकमंत्र्यांचा स्टाईल करण्यात वेळ जातो मग विकास कधी करणार ?- अजित पवार

कर्जत : सत्ताधाऱ्यांकडुन जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. परिसरातील रस्त्यांची खुपच दयनीय अवस्था आहे. अंबालिकाने नगर जिल्ह्यात उसाला सर्वाधिक बाजार भाव दिल्क.कर्ज फिटले तर आणखी जास्त भाव देणार. मुखमंत्र्यांच्या बगलबच्यांनी त्यांच्याकडील कारखान्यांची काय अवस्था करून टाकली आहे. मात्र स्वत:चे ठेवायचे झाकून अन् दुसऱ्याचे बघायचे वाकून हे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. पालकमंत्र्यांचा स्टाईल करण्यात वेळ जातो मग … Read more

धनगर आरक्षणासाठी राम शिंदे कधीच भांडले नाहीत…

जामखेड – सामान्य जनतेच्या मागणीवरून शरद पवार यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाणारा व कर्जत-जामखेडचा चेहरामोहरा बदलू शकणारा तगडा उमेदवार दिला आहे. तुम्ही रोहित पवार यांना एकदा संधी देऊन पहा, पुन्हा तुम्ही त्यांना आयुष्यभर सोडणार नाही, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या वतीने नान्नज येथे सोमवारी झालेल्या सभेत … Read more

रोहित पवारांनी साधला मंत्री राम शिंदेंवर निशाणा

जामखेड – मंत्री असुन शेतकऱ्यांना हक्काचे पाणी देऊ शकले नाहीत.कुकडीमधून कर्जतसाठी नमुद केले गेलेले पाणी आपल्याला आणायचे आहे.तुम्हाला जेवढी भूक लागली आहे तेवढीच विकासाची भूक मलाही लागलेली आहे.जनता अडचणीत असताना त्यांना ते आठवत नाहीत निवडणुक आली की लगेच आठवण होते. आता गावागावातील उत्तुंग प्रतिसाद पाहता माझी जबाबदारी वाढली आहे.असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी … Read more

राम शिंदे, रोहित पवारांसह सहा उमेदवारांच्या हिशेबात त्रुटी !

कर्जत – राशीन भाजपचे राम शिंदे, राष्ट्रवादीचे रोहित पवार, मनसेचे अप्पासाहेब पालवे यांच्यासह अपक्ष बजरंग सरडे, ज्ञानदेव सुपेकर यांच्या निवडणूक खर्चाच्या तपशिलात त्रुटी व अनियमितता आढळून आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी त्यांना नोटीस बजावली.  विहित नमुन्यात खर्चाचा सर्व हिशेब ठेवणे बंधनकारक आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्व उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी शुक्रवारी खर्च निरीक्षक नागेंद्र … Read more

कर्जत-जामखेडमध्ये पवार-विखे सत्तासंघर्ष

कर्जत – जामखेड मतदारसंघात पालकमंत्री प्रा. राम शिंदे व रोहित पवार यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीतील विजयानंतर प्रा. शिंदे यांची हॅट्ट्रिक होणार तर पवार यांचा विजय राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे. या लढतीला विखे आणि पवार यांच्यातील सत्ता संघर्षाचीही झालर आहे. त्यामुळे भाजप तसेच राष्ट्रवादीसाठी हा … Read more

पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकता आल्या असत्या, तर टाटा-बिर्ला या पदांवर असते !

कर्जत :- सामान्य घरात जन्मलेल्या राम शिंदे यांना कर्जत-जामखेडच्या जनतेने नेता बनवले. ते लादलेले नेतृत्व नाही, तर घडवलेले आहे. समोरचा उमेदवार जरी धनधांडगा असला तरी लोकशाही धनधांडग्यांची नाही. पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकता आल्या असत्या, तर टाटा-बिर्ला या पदांवर असते.  मतदारांनी शिंदेंसारख्या सामान्य नेतृत्वाला संधी देऊन मावळच्या जनतेने जसे पार्थचे पार्सल परत पाठवले, तसे रोहितचे पार्सल … Read more

डॉ. प्रकाश आंबेडकर यांची उद्या जाहीर सभा

जामखेड | वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण जाधव यांच्या प्रचारार्थ आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सभा रविवारी (१३ ऑक्टोबर) दुपारी ४ वाजता कर्जत येथील बाजारतळावर होणार असल्याची माहिती कर्जत तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांनी दिली. जाधव यांनी वंचित बहुजन जोडो अभियानाच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्व गावांतील कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधला आहे. … Read more

कर्जत -जामखेड मतदारसंघात बारामतीचं अतिक्रमण होवू देऊ नका

जामखेड : ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. महिलांना आपल्या हक्काचा रोजगार उपलब्ध करण्यासाठी आपण या भागातील महिला बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. तसेच मतदारसंघात मोठ मोठे उद्योग सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे महिलांना आपल्या हक्काचा रोजगार उपलब्ध होईल.हे सर्व पूर्णत्वास येण्यासाठी याभागात बारामतीचे अतिक्रमण होवू देऊ नका. असे … Read more

Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट कर्जत-जामखेड मतदारसंघ

रोहित पवार-प्रा.शिंदे यांच्यातला सामना रंगणार लक्षवेधी लढत: कर्जत-जामखेड मतदारसंघ कर्जत-जामखेड मतदारसंघावर गेल्या 25 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे. त्याला कारणही इथली समाजरचना. नगर जिल्ह्यात पहिलं कमळ फुलविण्याचा मान याच मतदारसंघाकडं जातो. मतदारसंघ आरक्षित असतानाही इथं भारतीय जनता पक्षाचाच आमदार होता आणि मतदारसंघ खुला झाल्यानंतरही भाजपचंच वर्चस्व कायम राहिलं. लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत या मतदारसंघातून प्रा. राम … Read more

पालकमंत्री राम शिंदेंचा मतदारांशी थेट संवाद

जामखेड  – भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रचाराचा संपूर्ण भर मतदारांशी थेट संवाद साधण्यावर ठेवला आहे. प्रचार रॅलीतून फिरतानाही समस्या, सूचना आणि अडचणींचा थेट मागोवा घेण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसतात. पहाटे पाच वाजल्यापासून शिंदे यांचा दिनक्रम सुरू होत असला, तरी रात्री उशिरापर्यंत त्यांची कामे चालूच असतात. रॅली, चौकसभा, कार्यकर्त्यांशी भेटी, बैठका, अशा सगळ्याच माध्यमांद्वारे कार्यकर्त्यांशी … Read more

कर्जत-जामखेडसोबत माझे मागील जन्माचे काही तरी नाते असावे म्हणूनच मी येथून विधानसभेची निवडणूक लढवित आहे..

कर्जत : ‘मी राज्याचा भूमिपुत्र असून, कर्जत-जामखेडसोबत माझे मागील जन्माचे काही तरी नाते असावे. म्हणूनच मी येथून विधानसभेची निवडणूक लढवित आहे. जनतेच्या आशिर्वाद आणि प्रेमामुळे हमखास विजय मिळवणार असा विश्वास मला आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी केले. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पवार यांनी कर्जत शहरातून भव्य रॅली काढली. त्यात युवकांची मोठी संख्या … Read more

पवार कुटुंबाला मोठा धक्का,कर्जत – जामखेडमध्ये रोहित पवार अडचणीत !

कर्जत :- राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात महत्वाचे स्थान असलेल्या बारामतीच्या पवार कुटूंबातील रोहित पवार हे नगरच्या कर्जत – जामखेड मतदार संघातून पालकमंत्री ना. राम शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. मात्र, काल – परवाच नगरमध्ये आलेल्या बारामतीच्या पाहुण्यांना नगकरकर स्वीकारणार का? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या निवडणुकीत स्थानिक विरोधकांनी बारामतीचे पार्सल परत … Read more

डेंग्यूचे थैमान ; दवाखाने हाऊसफुल्ल!

कर्जत : कर्जत शहरात डेंग्यूने थैमान घातले असताना नगरपंचायतचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढल्याने शहरातील दवाखाने हाऊसफुल्ल आहेत.  नारिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नगरपंचायतनेे लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. पावसाळयात साथ रोगांचे प्रमाण वाढत असते, त्यामुळे या काळात प्रशासनाने विशेष काळजी घेणे आवश्यक असते.  सध्या कर्जत शहरात सर्वत्र डेंग्यूचे … Read more

खासदार सुजय विखेंची जीभ घसरली !

अहमदनगर ;- ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात भरलेले दोन हजार रुपये चालतात, तर मग त्यांचे कमळ का चालत नाही,’ असे वक्तव्य नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी कर्जत येथील प्रचारसभेत केले. कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारासाठी कर्जतमध्ये शुक्रवारी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विखे यांनी हे वक्तव्य केले. विखे म्हणाले, … Read more

रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज बाद!

अहमदनगर :- राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत – जामखेड मतदार संघातील रोहित राजेंद्र पवार या अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान बाद झाला आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार यांचा अर्ज वैध ठरला आहे. मात्र, दोघांचीही नावे सारखीच असल्यामुळे रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या चर्चेने खळबळ उडविली आहे. कर्जत जामखेड … Read more

रोहित पवार म्हणतात राम शिंदेंविरोधात लढत नाही, तर…

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघातील उमेदवार रोहित पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या 77 जणांच्या पहिल्या यादीत रोहित पवार यांचं नाव आहे. भाजप नेते आणि मंत्री राम शिंदे यांच्याविरोधात रोहित पवार मैदानात उतरले आहेत कर्जतचे ग्रामदैवत गोधड महाराजांचे दर्शन घेऊन रोहित पवार अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. … Read more