रोहित पवारांना कर्जत जामखेड मध्ये कॉंग्रेसकडून ‘नो एंट्री’ !

अहमदनगर :- कर्जत-जामखेड विधानसभेची जागा राष्ट्रवादीसाठी न सोडण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबईत झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत झाला आहे. ह्या जागेवर शरद पवार यांचे नातू रोहित पवार लढण्यास इच्छुक आहेत, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ही जागा आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पवारांची अडचण होणार आहे. जिल्ह्यात काँग्रेसकडे पाच जागा असून शिर्डी, श्रीरामपूर, संगमनेर, नगर शहर व कर्जत-जामखेड अशा या … Read more

रोहित पवार यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राष्ट्रवादीतील राजकारण तापणार

जामखेड :- आगामी काळात कर्जत-जामखेडमधील राष्ट्रवादीतील राजकारण आणखी तापणार असल्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीच्या एका गटाचा रोहित पवार यांना विरोध असून एका गटाचा पवारांशिवाय पर्याय नसल्याचा दावा होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी बाकी असताना कर्जत-जामखेड मतदारसंघात पवार यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापले आहे. या ठिकाणी पवार यांच्याऐवजी स्थानिकांना संधी मिळावी, असा राष्ट्रवादीच्या एका … Read more

ब्रेकिंग : गच्चीवर खेळणाऱ्या बहीण-भावाचा शॉक बसून मृत्यू

कर्जत :- तालुक्यातील गवंडी गल्लीत घराच्या गच्चीवर खेळत असताना विजेचा धक्का बसून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. आयर्न विनय कुमार निषाद (वय ७ वर्ष) व जानवी विनय कुमार निषाद (वय ३) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी कि रात्री घराच्या गच्चीवर खेळत असताना आयर्न (वय ७ वर्ष) व जान्हवी(वय ३ वर्ष) या दोघांना विजेच्या … Read more

ब्रेकिंग : कर्जत तालुक्यात राजकीय भूकंप

कर्जत : पंचायत समितीच्या होणाऱ्या सभापती निवडीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्या साधना कदम यांना गळाला लावून भाजपाने राष्ट्रवादीला सुरुंग लावला. कर्जत तालुक्यात ना.प्रा. राम शिंदे यांनी पुन्हा एकदा आपला करिष्मा दाखवून देत राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक केले असून, सभापतीपदावर कोणाची वर्णी लागते याकडे तालुक्याचे लक्ष राहणार आहे. कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड असून, यावेळी बहुमतातील … Read more

कर्जत-जामखेडमधून रोहित पवार यांची उमेदवारी निश्चित

जामखेड : साहेब रोहितदादांना उमेदवारी द्या, ते निवडून येतील,’ असे साकडे जामखेडमधील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांना घातले. यावर पवारांनी दिलेली दिलखुलास दाद कार्यकर्त्यांमध्ये योग्य तो संदेश देणारी ठरली. यावेळी गाडीत मागे बसलेल्या रोहितकडे कटाक्ष टाकत ‘तुझी मागणी झाली’ असे पवार म्हणताच कार्यकर्त्यांना कामाला लागा असाच संदेश गेला. पवारांची भेट अन् कार्यकर्त्यांच्या मागणीवर पवारांनी दिलेली … Read more

पालकमंत्री राम शिंदेनी घेतला पवारांचा धसका,विधानसभेची तयारी सुरु !

जामखेड प्रतिनिधी :-शरद पवार यांचे नातू रोहित पवार कर्जत – जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेनंतर आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास अवधी असतानाच पालकमंत्री राम शिंदे यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. पालकमंत्री शिंदे यांनी विधानसभेची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. याचे कारण म्हणजे कर्जत, जामखेड तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने शरद पवार यांचे नातू … Read more

पालकमंत्री राम शिंदेंच्या मतदारसंघातच सबसे बुरे दिन !

कर्जत :- भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांना अच्छे दिन’चे गाजर दाखवून देशाची व राज्याची सत्ता काबीज केली.  पण सामान्य माणूस, शेतकरी, व्यावसायिक मेटाकुटीला आला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातत मूलभूत सुविधांची समस्या आहे. सीतपूर गावात तीन महिन्यांपासून अंधार आहे. वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचा टँकर पोहोचत नाही. हे अच्छे दिन नसून आतापर्यंतचे सबसे बुरे दिन’ आहेत, अशी … Read more

भाजपच्या जिल्हापरिषद सदस्याला अटक.

कर्जत :- जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल घोडके यांना मंगळवारी स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाने स्पेशल सेल वॉरंटप्रकरणी अटक केली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, राशिन येथील जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल घोडके यांची जगंदबा कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स प्रमोटर्स या नावाने पुणे येथे बांधकाम क्षेत्रात काम करणारी संस्था होती.  २०१२ साली या संस्थेच्या माध्यमातून पुणे येथील मांगलेवाडी परिसरात घोडके … Read more

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या.

कर्जत :- तालुक्यातील रजपूतवाडी येथील शेतकरी लक्ष्मणसिंग विठ्ठलसिंग परदेशी (वय ४८ वर्षे) या शेतकऱ्याने दुष्काळामुळे बँकेचे कर्ज थकले असून शेत नापीक राहिले. तसेच कामाचा आतिरिक्त ताण आल्यामुळे अखेर त्यांनी राहत्या घरामध्ये फाशी घेतली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे कोरेगाव व रजपूतवाडी परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. … Read more

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

कर्जत :- तालुक्यातील रवळगाव येथे तीन वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे. हा प्रकार दि.१७ रोजी सायं. साडेसहाच्या सुमारास घडला. याबाबतची माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील रवळगाव येथे दि.१७ जाने रोजी सायं साडेसहाच्या दरम्यान गावात असलेल्या एका किराणा दुकानाज़वळील रस्त्याच्या कडेला असलेल्या पडक्या … Read more

कर्जत जामखेड मधून रोहित पवार निवडणूक लढवणार ?

जामखेड :- पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात आता खासदार शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणूक लढविणार असल्याचे संकेत त्यांनी कर्जत – जामखेडच्या दौर्यात केले आहेत. पवार घराण्यातील चौथ्या पिढीचे राजकीय नेतृत्व करत असलेले पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे जामखेड तालुक्‍यातील चोंडी दौऱ्यावर आले होते. कर्जत – जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवाल का असे … Read more